नमस्कार मित्रांनो,
आपल्या घरातील महिलांनी रोज सकाळी उठल्यावर हे एक काम नक्की करावं. तसं तर प्रत्येक महिलेला या कामाची सवय लागायला हवी. यामुळे आपल्या जीवनात अमुलाग्र बदल होईल.
या एका कामामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा बरसेल. घरातील वाद विवाद, भांडणे संपतील. आरोग्य चांगलं राहील. तुम्ही जे काम करत असाल, व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, त्या सर्व ठिकाणांहून धन, पैसा येण्याचा ओघ वाढेल. तुमची आर्थिक भरभराट होईल.
मित्रांनो अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण एक चांगली सवय म्हणून हे एक काम जर आपण रोज करू लागलात, तर तुमच्या घराची बरकत होण्यापासून, प्रगती पासून कोणीही रोखू शकणार नाही.
तुमच्या जीवनात असलेले छोटे छोटे दोष जसे कुंडलीत असलेला शनी दोष, शत्रू पीडा, शत्रू पासून होणारा त्रास, यावर सुद्धा आपण उपाय पाहणार आहोत.
मुख्य दरवाजाचा
मित्रांनो वास्तू शास्त्रात आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा घरातील इतर दरवाजांपेक्षा आकाराने मोठा असावा. तो एकच दरवाजा नसावा. दोन दरवाजे म्हणजेच दोन कवाडे असलेला दरवाजा असावा.
आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवत जा. घराच्या या मुख्य दरवाजातून माता लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत असते. त्यामुळे स्वछतेची विशेष काळजी घ्या.
माता लक्ष्मी चा आपल्या घरात प्रवेश घडवायचा असेल तर वास्तू शास्त्रानुसार आपल्या घराच्या मुख्य दरवाजा बद्दल आपण काळजी घेतली पाहिजे. याने आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती येईल.
घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा
सकाळी उठल्यावर आपल्या घरातील महिलांनी आपल्या घराचा जो उंबरठा आहे, मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे, त्या उंबरठ्यावर थोडं जल अवश्य शिंपडावे. जर तुमच्या घरी गंगाजल असेल तर ते शिंपडावे. गंगाजल शिंपडले तर अति उत्तम.
मित्रांनो रोज सकाळी उंबऱ्यावर जल शिंपडण्या आधी थोडं जल पूजेच्या तांब्यात घ्या. तुमच्या घरी गंगाजल नसेल तर आपण साधे पाणी सुद्धा वापरलं तरी चालेल.
हा उपाय छोटासा आहे पण हाच छोटा उपाय आपल्या घराचे, वास्तू चे पावित्र्य टिकवून ठेवतो. या उपयामुळे आपल्या वास्तूत सुख, समृद्धीचा निरंतर प्रवेश होत राहतो. त्यामुळे रोज सकाळी स्नान वगैरे आवरल्या नंतर पूजेच्या तांब्यात जल घ्या आणि ते आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्या वर शिंपडा.
हा छोटा उपाय करा. तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्याही समस्या राहणार नाहीत. घरी धन, धान्य, संपत्ती येत राहील. आलेले धन वाढत राहील.
अंगणातील केर काढताना हे अवश्य करा
मित्रांनो आणखी एक गोष्ट रोज सकाळी उठल्यावर आपण आपलं अंगण, घर झाडून केर काढतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मित्रांनो रोज सकाळी अंगण झाडताना, किंवा घरात झाडू मारत असताना थोडंस पाणी जरूर शिंपडा. त्यानंतर झाडू मारा.
बऱ्याच वेळेला आपले शेजारी पाजारी, आपले शत्रू, ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही, आपला आनंद बघवत नाही, आणि असे लोक आपल्या घरावर बाधा आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते लोक आपल्यावर काही कर णी, काही तोटके करतात.
त्यामुळे आपल्या अंगणात झाडू मारण्या अगोदर थोडं पाणी शिंपडावे आणि त्यानंतर झाडू मारावा. मित्रांनो तुमच्या विरुद्ध कितीही मोठा तोटका, कर णी केलेली असेल तर त्याचा प्रभाव हा या छोट्याशा उपायाने कमी होतो, नष्ट होतो.
तुम्हाला हा उपाय रोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी हा उपाय नक्की करा.
फरशी पुसताना हा उपाय अवश्य करा
मित्रांनो तुम्ही घरातील लादी, फरशी पुसत असताना त्या पाण्यात एक चमचा भर खडे मीठ, खडे मीठ म्हणजेच मोठं मीठ त्या पाण्यात एक चमचा भर टाकावे. आणि त्या पाण्याने फरशी पुसावी.
मित्रांनो पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसण्याचा उपाय आपण गुरुवार वगळून इतर सर्व दिवशी करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो गुरुवारी हा उपाय करू नका.
पाण्यात मीठ टाकुन फरशी पुसल्यामुळे आपल्या घरात असलेली मोठ्यातली मोठी नकारात्मक ऊर्जा, बाधा ही कमी होते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. या पाण्यात एक चिमूटभर हळद टाकलीत तर यामुळे आपल्या कुंडलीत असणारा गुरू ग्रह मजबूत बनतो. तुमच्या कडे पैसे येण्याचे नवनवीन मार्ग तयार होतात. मोठ्या प्रमाणात धन, संपत्ती तुमच्याकडे येते.
मुख्य दरवाजाला लावा तोरण
मित्रांनो सोमवारच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावा. त्यामुळे आपल्या घरातील सर्व लोकांचे आरोग्य सुधारते. रो ग दूर होतात.
आणि गुरुवार च्या दिवशी अशोकच्या झाडाच्या पानांचे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजा ला बांधा. यामुळे सुद्धा धन प्राप्तीचे नवनवीन मार्ग तयार होतात. तुमच्या जीवनात पैशाची तंगी कधीही निर्माण होत नाही.
आपण सोमवारी जे आंब्याच्या पानांचे तोरण लावलेले असेल ते गुरुवारी बदला, आणि गुरुवारी लावलेले तोरण सोमवारच्या दिवशी बदला. बदलल्यानंतर ते तोरण आपण एखाद्या गायीला वगैरे खायला घालू शकता. पण मित्रांनो कोणत्याही तोरणाची पाने वाळल्यानंतर ते ठेऊ नका. त्वरित काढुन टाका.
वाळलेल्या पानांच्या तोरणा मुळे निगेटिव्ह ऊर्जा वाढते. त्यामुळे असे तोरण आपल्या दरवाजाला ठेवण्याची चूक अजिबात करू नका.
गणेशाची मूर्ती
मित्रांनो आपण अनेकदा पाहतो की घरात प्रवेश करताना दरवाजा वर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो असतो. पण अनेकांना हे माहीत नाही की गणेशाच्या पाठीत दारिद्रता वास करते. भगवान गणेशाच्या अंगात विविध गुण वास करतात. त्यांच्या प्रत्येक अवयवात वेगवेगळे गुण आहेत. तसाच दारिद्रता हा गुण त्यांच्या पाठीत वास करतो.
आपण जेव्हा मुख्य दरवाजा वर गणेशाची मूर्ती किंवा फोटो बसवतो तेव्हा त्या मूर्तीची, गणेशाची पाठ आपल्या घराच्या दिशेने होते. परिणाम स्वरूप आपल्या घरातून पैसा विनाकारण बाहेर पडतो. त्यामुळे आपल्या घरी दारिद्रता, पैशाची तंगी होऊ लागते.
वास्तू शास्त्रानुसार हे दोष दूर करायचे असतील तर मुख्य दरवाजावर बाहेर बसवलेली मूर्ती किंवा फोटो काढा आणि ती घराच्या आत, मुख्य दरवाजा वर लावू शकता. याने श्री गणेशाचे तोंड हे आपल्या घराच्या आत असेल. या गणेश मूर्ती वर तीन मोरपंख लावलेत तर त्यामुळे आपल्या घरात असलेला कोणताही मोठा वास्तू दोष दूर होतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा. अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.