श्रावण महिन्यात सकाळी उठल्याबरोबर बोला हे दोन शब्द, इच्छा ताबडतोब पूर्ण होईल.

नमस्कार मित्रांनो,

पवित्र श्रावण महिना की ज्या श्रावण महिन्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट होतो तो सुरू झाला आहे. या श्रावणामध्ये आपण भक्तिभावाने भगवान भोले बाबांची, महादेवांची पूजा करतो. त्यांचे आशिर्वाद प्राप्त करतो.

असे म्हणतात की भोले बाबांची कृपा ज्या व्यक्तीवर बरसते त्या व्यक्तीला जीवनात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. अशा या अत्यंत पवित्र श्रावण महिन्यात आपण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द नक्की बोला.

खरंतर हा एक मंत्र आहे. असा मंत्र की जो फक्त महादेवांनाच नव्हे तर माता गौरींना सुद्धा प्रसन्न करतो आणि भगवान भोलेनाथ आणि माता गौरींच्या कृपेने मनुष्याच्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच मात्र काही मनोकामना असतील, आकांक्षा, स्वप्न, इच्छा असतील त्या सुद्धा नक्की पूर्ण होतात.

हे शब्द, हा मंत्र आपण सकाळी उठल्याबरोबर म्हणायचं आहे. श्रावण महिन्यात अगदी दररोज, नित्यनियमाने. ज्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे. लक्षात घ्या जर तुमच्या घरात विद्यार्थी वर्ग असेल किंवा एखाद्या घरातील व्यक्तीला करिअरमध्ये यश मिळत नसेल तर चांगल्या करियरसाठी, विद्या प्राप्ति साठी सुद्धा हा उपाय करू शकता.

सोबतच आपल्या घरातील जी वयोवृद्ध मंडळी आहेत ती आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी या मंत्राचा जप सकाळी उठल्याबरोबर अगदी एक वेळा किंवा तीन, सात, अकरा तुम्हाला जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा मंत्र जाप नक्की म्हणा.

ज्यांना धनप्राप्ती करायची आहे, व्यापारी आहेत आणि पैसा यावा, भरपूर धन अशी ज्यांची इच्छा आहे अशा लोकांनी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथ यांना प्रसन्न करणारा हा मंत्र बोलू शकता.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्हाला स्नान करण्याची आवश्यकता नाही. ज्या प्रकारे आपण सकाळी उठल्यानंतर एक मंत्र म्हणतो ज्या करता स्नान करण्याची आवश्यकता नसते.

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती,
करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।।

ज्याप्रमाणे या मंत्राचा जप करण्यासाठी स्नान करण्याची गरज नाहीये अगदी त्याचप्रमाणे भगवान भोलेनाथ यांना प्रसन्न करणारा हा मंत्र म्हणण्यासाठी सुद्धा आवश्यकता नाही.

आपण सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही कराग्रे वसते लक्ष्मी हा महामंत्र म्हणत असाल तर तो म्हटल्यानंतर सुद्धा हा मंत्र म्हणू शकता. हाच मंत्र आहे तो खालील प्रमाणे आहे.

‘ ॐ जूं स: ‘

मित्रांनो, हा इतका शक्तिशाली मंत्र आहे की या मंत्राचा श्रावण महिन्यात विशेष करून जप केल्यास जीवनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना यांची इच्छापुर्ती होते.

एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा या श्रावण महिन्यामध्ये किमान सोमवारी तरी श्रावण सोमवारचे व्रत भगवान भोलेनाथ यांच्या नावे नक्की ठेवा. महादेवाची पुजा करण्यास विसरू नका.

मित्रांनो, छोटासा उपाय आहे नक्की करून पहा. भगवान शिवशंकर आपल्यास नक्की प्रसन्न होतील. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *