नमस्कार मित्रांनो,
आयुर्वेद सब्जाच्या बियांमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असते. सब्जामध्ये चिया बियांपेक्षा अधिक प्रोटीन आणि फायबर आहे. यामध्ये कोणतीच अधिकची कॅलरी नाही. याचा फायदा बद्धकोष्ठ, मूळव्याध आणि मधुमेह रूग्णांना होतो.
सब्जाच्या बियांना मोठ्या तुळशीच्या रुपातही ओळखले जातात. सब्जाला एक सुपरफूड म्हणून देखील ओळखलं जातं. कारण यामध्ये शरीर उत्तम प्रकारे राहावे यासाठी असणारी सर्व गुणधर्म आहेत. विभिन्न पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या सब्जाच्या बियांना पाण्यात भिजवून ठेवावे लागते.
यामध्ये फायबर आणि प्रोटीनमुळे पोट भरलेलं राहतं तसेच वजन कमी करण्यासही मदत करते. तसेच सब्जा खाल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास आणि पचन स्वास्थ उत्तम राहण्यास मदत होते.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसारने यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सब्जाचे फायदे सांगितले आहेत. सब्जामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात अशते. सब्जाचे नियमित सेवन केल्यामुळे युटीआय, किडनीला डिटॉक्सीफाय करणे, ब्लड शुगर कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मदत मिळाली असते.
वजन कमी करण्यासाठी मदत करतात
सब्जाच्या बियांमुळे भूक कमी लागते. मनाला आणि शरीराला गार वाटतं. यासोबतच वजन कमी करण्यासाठी सब्जाचा खूप मदत होते.
डायबिटिज कंट्रोल करण्यासाठी होते मदत
मधुमेहींसाठी शरीरातील साखर कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. यावर घरगुती उपाय म्हणून सब्जाचा वापर करू शकता. सब्जा तुम्हाला लागणारी सततची भूक देखील कंट्रोलमध्ये करते.
सब्जाच्या बियांमध्ये ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी मदत होते. कारण सब्जामुळे चयापचय कमी करण्यासाठी मदत देतो. ब्लड शुगरला वाढण्यापासून रोखण्यास सब्जा मदत करते.
बद्धकोष्ठता नष्ट होते
सब्जाच्या बिया फायबरने भरलेल्या असतात. सब्जामुळे बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्ती मिळते. तसेच याचं सेवन केल्यामुळे ऍसिडिटी आणि अपच सारखी समस्या दूर होते. पोटात थंडावा राहतो.
लघवीच्या त्रासापासून होते सुटका
उष्णाळ्यात लघवीचा त्रास अनेकांना जाणवतो. लघवीला गेल्यानंतर खाज येणे किंवा जळजळ होणे अशी समस्या जाणवत असेल. तर सब्जा ठरतो अतिशय फायदेशीर. सब्जाच्या बियांमुळे मुत्रवर्धक आणि यूटीआयकरता अतिशय फायदेशीर असतात. यासोबतच त्वचा आणि केसांना देखील याचा फायदा होतो.
मासिक पाळीदरम्यान होतो फायदा
मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना पोटदुखीचा त्रास होतो. तसेच काही महिलांना पोटात उष्णता निर्माण होते. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे चिडचिड देखील होते. अशावेळी तुम्ही सब्जा खाणं गरजेचं आहे.
या सब्जाच्या बिया इस्ट्रोजेनची पातळी कमी करतात. म्हणून ज्या स्त्रियांना मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होतो त्यांच्यासाठी ते उत्तम आहेत.
असा करा सब्जाचा वापर
तुम्ही 1-2 चमचे सब्जाच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवू शकता किंवा खाण्यापूर्वी किमान 20 मिनिटे भिजवून दररोज सेवन करू शक. लहान मुले आणि गर्भवती महिलांनी सब्जा खाणे टाळावे. गर्भवती महिलांच्या बाबतीत बिया शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी करू शकतात. म्हणून आहारात सब्जाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.