नमस्कार मित्रांनो,
स्वामींची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. अनेक प्रकारचे लोक स्वामींकडे येत होते. यातच कबिरपत्तीं बुवा अक्कलकोटमध्ये आला. रोज सकाळी नानाप्रकारची टिळे, मुद्रा अंगास लावून गळ्यात नानाप्रकारच्या माळा घालून डोकीस पटका आणि हातात वीणा घेऊन मोठमोठ्याने पदे व अभंग बोलत बुवा गावभर भिक्षा मागत फिरत होता.
दिसण्याने तर साधूचा उत्तम फेहराव होता. एकेदिवशी स्वामी महाराज गणपतराव जोशी यांच्या दिवडीवर बसलेले असताना या बुवाची फेरी येथे आली. आणि संतनकी बानी, साधुराम ए संतनकी बानी..हे पद बोलत होते. इतक्यात स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि दोन्ही हाताने विचित्र खुणा करून त्या साधूकडे बगून बोले ए संतनकी बानी..साधुराम ए संतनकी बानी आणि मोठमोठ्याने पोट धरून हसू लागले.
स्वामींची असे वागणे बघून येथील मंडळींना आश्चर्य वाटले आणि हा बुवा ढोंगी असावा असे वाटून जोशीसह दोन तीन मंडळींनी बुवांच्या मुक्कामाचा शोध घेतला. तेव्हा येथे 1 बाई असल्याचे समजले आणि ती बाई एका गृहस्थाची लग्नाची बायको असून या बुवाने तिला नादी लावून पळवून आणल्याचे समजले. आता आपले हे बिंग फुटले असे त्या बाबाला समजतास त्याने तिथून लगेच पळ काढला.
स्वामी भक्तहो कोणीही कितीही ढोंग, सोंग किंवा वेष बदलून येऊ दे. स्वामींकडे प्रत्येकाचे सातबारे आहेत. स्वामींना सर्वांची सर्वच माहीत असते म्हणून स्वामींच्यासमोर कोणतीही ढोंग करण्याची गरज नाही. हे समज सर्वांना मिळाली आणि सर्वांनी एक घोषात जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची लीला त्याचा बोध तर अगदी स्पष्ट आहे. बघा तो साधु अतिशय चालाकीने लोकांना वेड्यात काढत होता. कपडे, माळा, टिळे आधी परिधान केले म्हणजे लोक भुलतात.
त्याला पक्के ठाऊक होते आणि त्याप्रमाणे तो नाटकी वागत होता. परंतु स्वामी महाराज आई आहे. या साधूच्या ढोंगात कोणी फसू नये, याच्या नादी लागून कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून जेव्हा तो स्वामींच्यासमोर आला तेव्हा स्वामींनी त्याचे पितळ उघडे पाडले. स्वामी भक्तहो आजही देवधर्माच्या किंवा जातीच्या नावाखाली अनेक लोक बाह्य दिखावा करून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि लोक सोंग, ढोंग घेऊन दिखावा करून लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे.
आणि असे लोक समाजाच्या सर्व स्तरात पसरलेली आहे. कोणी अध्यात्मिक गुरु बनतो, कोणी धर्माचा ठेकेदार बनतो, तर कोणी राजकीय स्वार्थापोटी धार्मिक बनण्याचा प्रयत्न करून स्वार्थ साधतो आहे. अर्थात सर्वच लोक ढोंगी आहे, स्वार्थी आहे. असे इथे सांगण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. समाजात आजही भरपूर चांगले, शुद्ध, निर्मळ मनाने कार्य करणारे लोक आहेत.
म्हणून आजच्या लिलेतून बोध घेता आज आपल्याला आजच्या पिढीसाठी स्वामी अशा ढोंगी लोकांपासून सतर्क राहण्याचा इशारा देत आहेत. आणि समाजात सत्कर्म करणारी व्यक्ती आणि ढोंगी व्यक्ती यांना सहज ओळखता यावे म्हणून आपल्या जवळ विवेकाची तलवार ठेवण्याचा हुकूमच देत आहेत. आणि हा विवेक जर आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला स्वामींच्या लीलांचे मनन आणि चिंतन करायचे आहे. जे जे सत्पुरुष झाले, संत महंत झाले त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करायचा आहे.
याने आपण अंतर्मुख होऊन ईश्वर आपल्या आतच आहे ही समज प्राप्त होते आणि त्या दिशेने साधना सुरू होऊन पूर्ण विवेक जागृत होतो. आणि आपल्या प्रपंचासह आपला अध्यात्मिक उद्धार होतो, विकास होतो चला तर मग आपण स्वामींना प्रार्थना करूया.
हे समर्था आज आमची तुम्हाला इतकीच प्रार्थना आहे की, आम्हाला तुमची खरी ओळख द्या. आमच्या स्वस्वरुपाची समज द्या. ह्या निसर्ग समज द्या. क्रिया, प्रतिक्रियाच्या कर्म सिद्धांतांची समज द्या. जेणे करून आम्ही ह्या मायेच्या जगात न फसता विवेकाच्या तलवारीने सत्य सत्याची पारख करत आपले कर्म हीच खरी तुमची सेवा हीच खरी भक्ती. ह्या भावनेने प्रपंच आणि परमार्थ साध्य करू आणि तुम्हाला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करू. हे परमपित्या तुम्ही माझे पिता आहात, आई आहात, गुरु आहात. मला भक्ती द्या, मला विवेक द्या, मला प्रेरणा द्या, मला मार्गदर्शन करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.