नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्याकडे पैसा किंवा धन असावे, अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ पैश्यांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आजच्या काळात पैसा हे विनियमचे साधन बनले आहे.
आपल्याला कधी कधी चांगल्या काळात यश मिळत असतं, त्यामुळे पैसा आपल्याकडे धावत येतो. माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहते. मात्र कधीकधी वाईट वेळ जर आल्यास तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या हातांना यश मिळत नाही. पैसा मिळत नाही. मग यासाठी आपण परमेश्वराची आराधना करावी, याशिवाय काही मंत्र जप केले तर ही समस्या दूर करण्यासाठी मदत होते.
मित्रांनो काही लोक परमेश्वराच्या अस्तित्वावर टीका करतात किंवा त्याचे नामस्मरण करत नाहीत. पण एक ना एक दिवस अशा व्यक्तींना ते अस्तित्व मान्य करणे भाग पडते. त्या घरामध्ये नक्की गरिबी येते आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना किमान एकदा तरी देवाचं नाव, परमेश्वराच्या नावाचा जप आपल्याला केला पाहिजे.
मित्रांनो हे मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना कधीही म्हटल्यास आपल्या नशीबातील दोष दूर होण्यास मदत होईल. आपण रोज एक वेळ तरी भगवान श्री कृष्णाच्या नावाचा जप करावा. कारण भगवान श्री विष्णू हे जगाचे पालनकर्ता आहेत. ईश्वराच्या नावाच्या जपामुळे आपल्या अनेक समस्या नाहीशा होतील.
“हरे राम हरे राम, राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरेmantra” या अत्यंत पवित्र मंत्र जपामुळे, आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतात. याशिवाय आपण “कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेष नाशाय गोविंदाय नमो नमः” या मंत्राचा सुद्धा जप करू शकतो.
मित्रांनो त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व प्रकारची संकटे आणि दुःख, वाईट वेळ तसेच आपल्या जीवनातील क्लेष दूर होण्यास मदत होते. यासह आपल्या जीवनातून निराशा दूर करण्यासाठी “हरे राम हरे राम राम राम हरे हरे” या प्रभावी मंत्राचा जप करू शकतो.
आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची धनाशी संबंधीत समस्या असल्यास या दुसऱ्या मंत्राचा जप करावा. तसेच ज्या लोकांना पैशांच्या समस्या किंवा पैसा घरात टिकत नसेल अशा लोकांसाठी भगवान श्री कृष्णाचाच दुसरा मंत्र “गोवल्लभाय स्वाहा गोवल्लभाय स्वाहा गोवल्लभाय स्वाहा” या पवित्र मंत्राचा सव्वा लाख वेळा जप करावा.
तुम्हाला जर हे शक्य नसेल तर आपण रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी “गोवल्लभाय स्वाहा” हा मंत्र जप केला तरीही चालेल. आपल्याला जीवनात कधीच धनाची कमतरता भासणार नाही.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.