नमस्कार मित्रांनो,
रथसप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. भारतातील इतर धार्मिक सणाप्रमाणेच मोठया प्रमाणावर रथसप्तमी हा सणसुद्धा साजरी केली जाते.
रथसप्तमीला काहीजण माघ सप्तमी, आरोग्य सप्तमी, रथसप्तमी, माघ जयंती, पुत्र सप्तमी अथवा सूर्यजयंती असेही म्हणतात. सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार असल्याने या दिवशी सूर्य नारायणाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात महिला मकर संक्रातीला हळदी कुंकवाचे वाण एकमेकांना देतात.
हा समारंभ मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पध्दत आहे. दक्षिण भारतातही रथसप्तमी हा सण फार मोठया प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतुच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात सूर्यपूजा केली जाते.
दक्षिणेत या सणाला ब्रह्मोत्सव असेही म्हणतात. तिरुपती बालाजी, बिहार आणि झारखंडमध्ये या सणाचे एक वेगळे महत्त्व दिसून येते. पूजापाठ केल्यानंतर सूर्यदेवाची रथयात्राही काही ठिकाणी काढली जाते. भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाते आणि निसर्गपुजा सर्वश्रेष्ठ समजली जाते. तसेच आपण जाणून घेऊ रथसप्तमीची माहिती आणि तिची पूजा विधी.रथसप्तमी सोमवार ७ फेब्रुवारी, २०२२, शुभ मुहूर्त सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटे, तसेच मंगळवार ८ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटे पर्यंतआहे.
शुभ मुहूर्ताच्या काळात रथसप्तमीची पूजा करणे लाभदायक ठरू शकते. रथसप्तमीला सूर्यदेवाची उपासना केली जाते. पहाटे लवकर उठून सूर्योदयाच्यावेळी करण्याची प्रथा आहे. असे केल्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन दीर्घायुष्य, आरोग्य, संतती, समृद्धी आणि यशाची बरसात भक्तांवर करतात.
अशी मान्यता आहे, म्हणून रथसप्तमीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. वैज्ञानिकदृष्टीने पृथ्वीची स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा सुरू असताना ज्यावेळी पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते, तेव्हा त्याला उत्तरायण आणि दक्षिण ध्रुवाकडील बाजू जास्तीजास्त बाजू दक्षिणेकडे असते, तेव्हा त्याला दक्षिणायन असे म्हणतात.
साधारणपणे उत्तरायण हे २१ मार्च ते २१ जूनपर्यंत असते. तर दक्षिणायन हे २२ सप्टेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत असते. पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, आणि उत्तरायणला सुरुवात होते.
<
हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवाचे स्थान असून, सूर्यदेवाप्रती कृतज्ञता असण्यासाठी हा दिवस भारतात साजरा करण्यात आला असावा. सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तर असून तो स्वयंप्रकाशित आहे. शिवाय सर्व ग्रह आणि ताऱ्यांसोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःच्या प्रकाशाने आणि उष्णेतेने उजळून टाकतो.
म्हणून सूर्यदेवाची मनोभावे पूजा करण्याचा दिवस “रथसप्तमी” साजरी केली जाते. रथसप्तमीचा इतिहास, कथा आणि तिची पूजा विधी जाणून घेऊ. भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणे, सूर्यदेव हा सोन्याच्या रथातून प्रवास करतो, त्याला सात घोडे असून त्याचे सारथ्य अर्जुनाकडे असते.
रथसप्तमीपासून सूर्यदेवांच्या उत्तरायणला सुरुवात होते. हा दिवस सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते. शिवाय सूर्यदेवांच्या रथाला सात घोडे जोडलेले असतात, त्यामुळे या सणाला नाव रथसप्तमी असे पडले असण्याची शक्यता आहे.
हा हिंदू धर्मामध्ये शुभ सण मानला जातो. हिंदू मान्यतानुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता. आदिती आणि कश्यप याचा पुत्र म्हणजे सूर्यदेव. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघाले. सूर्यदेवाच्या सामर्थ्याची सर्वांना माहिती आहे.
हिंदूपुराण कथेनुसार, एका महान राजाकडे त्याचे राज्य चालविण्यासाठी त्याचा वारस नव्हता. तेव्हा त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली आणि प्रार्थनानुसार त्याला पुत्रप्राप्त झाला मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर खूपच आजारी पडू लागला तेव्हा त्याला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर पूजापाठ केल्यानंतर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले. पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी पूजापाठ केल्याने आरोग्य प्राप्ती होते म्हणूनच या रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते.रथसप्तमी याची पूजाविधी कशी करायची.
प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने पूजा करत असतो. तर ही पूजा करताना सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून नदी अथवा तलावात स्वच्छ स्नान करावे आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे, त्यामध्ये हळदीकुंकू, अक्षता, फुले अर्पित करावी.
सुर्याकडे चेहरा करून, तांब्याचा कलश हातात घेऊन दोन्ही हात उंचावून अर्घ्य द्यावे आणि नमन करावे. काहीजण बिल्डिंग मध्ये राहत असल्याने असे अर्घ्य देणे शक्य नसेल तर तांब्याने पाणी हातामध्ये सोडत आणि सूर्याकडे पाहत अर्घ्य द्यावे.
त्यानंतर अर्घ्य दिलेले पाणी एखाद्या वनस्पती किंवा तुळशीवृंदावनमध्ये वाहावे. अर्घ्य देताना गायत्री मंत्र किंवा सूर्याची उपासना करावी. पूजेच्या दिवशी देवघरात रथसप्तमीची पाटावर रांगोळी काढावी. तसेच सात धान्याचीदेखील पूजा करावी.
तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. जर तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असाल तर घराच्या बाहेर तुळशीवृंदावन असेल तिथे पाटावर रथाची रांगोळी काढावी. एका सुगड्यामध्ये दूध उकळू द्यावे आणि उकळलेले दूध ज्या दिशेकडे ते उकळू जाते तिथे आपली प्रगती होते. अशी मान्यता आहे.
रथसप्तमीच्या दिवशी ब्राह्मणांना किंवा गरिबांना दान दिल्याने पुण्य मिळते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायाणाला दुधभाताचा किंवा खिरीचासुद्धा नैवैद्य दाखविला जातो. तसेच पहाटे या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्याने सर्व रोग आणि पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे.
शिवाय पुत्रप्राप्तीसाठी निरामय आरोग्यासाठी, सौभाग्य मिळवण्यासाठीसुद्धा सूर्यदेवाची आराधना केली जाते. अशी सूर्यउपासना करणे लाभदायक ठरते. अशाप्रकारे रथसप्तमीची पूजा करावी.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.