हे असले चाळे शोभतात का तुला…? ‘त्या’ व्हिडीओमुळे फँड्री फेम राजेश्वरी खरात ट्रोल…

अलीकडेच राजेश्वरीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर तिला नेटकरी खूप ट्रोल करत आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून ग्रामीण महाराष्ट्राचं समाजवास्तव त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडलं होतं.

या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

राजेश्वरीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अलीकडेच राजेश्वरीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर तिला नेटकरी खूप ट्रोल करत आहेत.

ती या व्हिडीओत ‘डर्टी लिटल सिक्रेट’ या गाण्यावर डान्स करता दिसत आहे. यात तिचे दोन लूक पाहायला मिळत आहेत. पहिल्या लूकमध्ये तिने जीन्स व क्रॉप टॉप घातले आहे, तर दुसऱ्यामध्ये तिने डीप नेक वन पीस घातला आहे.

या गाण्यात राजेश्वरीच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत. तिने नोरा फतेहीसारखा डान्स या गाण्यात करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडलेला दिसत नाहीये.

तिच्या या व्हिडीओवर ‘हे असे चाळे चालणार नाही शालू समजलं का नाही तर ,,,,’, ‘म्हणूनच नागराज सर तुला पुन्हा चान्स देईनात’, ‘शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं’, ‘चांगल्या करिअरसाठी ऍक्टिंगवर लक्ष दे, अशा रील्स बनवत बसू नकोस’, अशा प्रकारच्या कमेंट्स त्यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

राजेश्वरीने ‘फँड्री’ चित्रपटानंतर ‘आयटमगिरी’, तसेच ‘रेडलाइट’ नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *