नमस्कार मित्रांनो,
अनेकांच्या मनात हा प्रश्न पडलेला असतो की आपल्या पूर्वजांचे फोटो आपल्या घरात लावावेत का? आपले जे आजी आजोबा होते किंवा पणजी पणजोबा होतो किंवा त्यांच्या पूर्वीची पिढी यांचा मृत्यू झालेला आहे. यांचे फोटो घरात लावावेत का? आणि जर लावायचे असतील तर कोणत्या दिशेला लावावे. जेणेकरून घरावर शुभ परिणाम पडतील. अनेकांनी हा सुद्धा प्रश्न विचारला आहे की देवघरात पूर्वजांचे फोटो लावले तर चालतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
पहिला प्रश्न पूर्वजांचे फोटो घरात लावावे का?
याच उत्तर आहे हो, पूर्वजांचे फोटो, वाडवडीलांचे फोटो घरात लावावेत. का असावेत वास्तू शास्त्र असे मानते की आपल्या पूर्वजांचे आपल्या वाडवडीलांचे फोटो आपल्या घरात असतील तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपल्या येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होतो. त्यांच्या आशीर्वादामुळे एकंदरीत सर्व घराची भरभराट होते. उन्नती होते. प्रगती होते.
मित्रानो आपल्या पूर्वजांनी आपल्या फॅमिली साठी, आपल्या घरासाठी मोठ योगदान दिलेले असते. अनेक प्रकारे त्यांचं स्मरण आपल्याला करता येते. आणि म्हणून श्राद्ध असेल तरपण असेल या गोष्टी आपण करत असतो. त्याबरोबरच आपण आपल्या पूर्वजांचे फोटो आपल्या घरात नक्की स्थापन करा. त्यांच्या आशीर्वादाने आपलं नक्कीच भलं होते.
दुसरा प्रश्न असा आहे की घरात तर लावायचे आहेत पण ते कुठे लावायचे आहेत. मित्रानो काही जण म्हणतात की देवघरामध्ये आम्ही पूर्वजांचे फोटो लावलेले आहेत हे चुकीचे आहे. जरी आपले पूर्वज महान होते त्यांनी खूप मोठी कामगिरी करून दाखविली आहे. आपल्या घरासाठी खूप मोठं योगदान आहे. ते सन्माननीय आहेत मात्र त्यांची बरोबरी आपल्या इष्ट देवतेशी होऊ शकत नाही. ज्या देवी देवतांची आपण पूजा करत आहोत त्यांच्या शेजारी म्हणजे देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटो चुकूनही लावू नका. त्यामुळे आपल्या देवघराचे पावित्र्य नष्ट होत.
आपल्या देवघरातून जी सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते तिचा नाश होतो. याचा त्रास आपल्याच होतो असे नाही. परिणामी आपल्या घरातील प्रगती तर थांबते. आपल्या पितरांच्या आत्म्याला त्रास होतो. आपले हे जे पूर्वज आहेत ते पित्र लोकात राहत असतात त्यांना या गोष्टीचा त्रास होतो. आपल्या देवघरामध्ये आपण चुकूनही हे फोटो लावू नयेत. दुसरी गोष्ट आपल्या घरातील किचन. वास्तू शास्त्रानुसार किचनमध्ये पूर्वजांचे फोटो लावू नयेत.
तिसरी जी जागा आहे ती आपल्या घरातील बेडरूम. बेडरूम मध्ये सुद्धा पूर्वजांचे फोटो चुकूनही लावू नका. त्यामुळे वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अनेक अडचणी निर्माण होतात. पती पत्नी मधील प्रेमात कमतरता येते.
या तीन चार जागा सांगितल्या आहेत त्या ठिकाणी फोटो लावल्याने अपशकून घडतो. वारंवार घरावर संकट येतात. या तीन चार जागा आपण कटाक्षाने टाळायच्या आहेत. आता प्रश्न असा आहे की कोणत्या ठिकाणी आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावणं अत्यंत शुभदायी ठरेल. मित्रानो आपल्याला जर आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील.
सकारात्मक ऊर्जेने घर भरायचे असेल त्यासाठी मित्रानो सर्वात चांगली जागा आहे उत्तर दिशा. आपल्या घराच्या उत्तर दिशेला जी भिंत आहे north दिशेला त्या ठिकाणी आपण आपल्या पूर्वजांचे फोटो नक्की लावावे. त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतातच पण कुटंबाचीही भरभराट होते. जर तुम्हाला उत्तर दिशेला फोटो लावणे शक्य नसेल तर दुसरी शुभ दिशा आहे पूर्व दिशा.
<
जर तुम्हाला पूर्वेलाही लावणे शक्य नसेल तर पूर्व आणि उत्तर यांच्या दरम्यान जी दिशा येते जो कोपरा असतो तो म्हणजे ईशान्य कोपरा. या दिशेला सुद्धा आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावू शकता. यात अडचण अशी येते की आपल जे देवघर आहे हे सामान्यतः ईशान्य कोपऱ्याला असते. ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधील दिशा.
जर देवघर ईशान्य दिशेला असेल तर मित्रानो तुम्ही तुमच्या पूर्वजांचे फोटो हे पूर्व दिशेला लावावे. उत्तर, पूर्व, ईशान्य दिशा शुभ आहे. मात्र तुमचं देवघर ईशान्य दिशेला असेल तर आपण पूर्वजांचे फोटो हे पूर्व दिशेला च लावावे. जर अडचण असेल तरच हे फोटो उत्तर दिशेला लावू शकता. जर तुमचं देवघर पूर्व दिशेला असेल तर आपल्या पूर्वजांचे फोटो आपण ईशान्य दिशेला, ईशान्य कोपऱ्यात लावावेत.
वास्तू शास्त्रानुसार हेच योग्य ठरेल. पश्चिम दिशा आहे ज्या ठिकाणी सूर्य मावळतो. त्या दिशेला चुकूनही पूर्वजांचे फोटो लावू नका. वास्तू शास्त्र असे मानते की पश्चिम दिशेला फोटो लावल्याने आपल्या घरात ताण तणाव वाढतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धन हानी होते. म्हणजेच पैसा कमी होतो. पैसा बाहेर जाऊ लागतो. धन प्राप्तीमध्ये अनेक अडचणी येतात.
या पेक्षा भयंकर दिशा म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला तुमच्या पूर्वजांचे फोटो लावले तर भयंकर प्रमाणात घरात गरिबी येते दारिद्र्य येते. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र वास्तू शास्त्रात हे स्पष्ट केलेले आहे की दक्षिण दिशेला जर पूर्वजांचे फोटो लावले असतील तर त्या घरात धन टिकत नाही. काहीजण घराच्या मधोमध जो बिम असतो कॉलम असतो त्या कॉलम वर पूर्वजांचा फोटो लावतात ज्यामुळे येता जाता सर्वांना त्यांचे दर्शन घेता येईल.
आपल्या घराचे मध्य स्थान असते त्याला ब्रह्म स्थान असे म्हणतात महत्वाचा असा हा भाग असतो. या ठिकाणी जर तुम्ही पूर्वजांचे फोटो लावले तर मोठा अपशकून ठरतो. घराच्या मध्यभागी पूर्वजांचे फोटो लावल्याने पद प्रतिष्टेमध्ये मान सन्मान मध्ये घसरण होते. अशी एखादी घटना घडते की कुटुंबाचा मान सन्मान कमी होतो. समाजात जीपद प्रतिष्ठा आहे.तिला ठेच पोहोचते. म्हणून चुकूनही घराच्या मध्यभागी पूर्वजांचे फोटो लावू नयेत.
आणखी एक प्रश्न असा आहे की जीवित व्यक्तीचे फोटो लावावे का? लावले तर चालतील पण यांच्यासाठीच्या शुभ दिशा आहेत उत्तर अत्यंत शुभ आहे. पूर्व दिशा शुभ आहे. आणि ईशान्य दिशा देखील शुभ आहे. या तीन दिशा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही जीवित व्यक्तीचे फोटो लावू शकता. कोणताही प्रॉब्लेम नाही.
आणखी एक प्रश्न असा आहे की आमचा एक जवळचा मित्र आहे त्याचा फोटो घरामध्ये लावू का? तुमचा लांबचा नातेवाईक आहे, दूरचा नातेवाईक आहे किंवा तुमच्या नातेसंबंधातील सोडून दुसरा व्यक्ती आहे मग ती मैत्रीण असेल मित्र असेल यांचे फोटो चुकूनही लावू नका. ज्या व्यक्तीचा फोटो लावला आहे त्या व्यक्तीचा तुमच्या घरात चंचू प्रवेश होतो. तो व्यक्ती तुमच्या परिवारात ढवळाढवळ करू लागतो.
आणि परिणामी कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. नाते बिघडू शकतात. त्यात सगळीच नाती आली. पिता पुत्र म्हणजे वडील आणि मुलगा यांच्यात भांडण सुरू होऊ शकते. पती पत्नी मध्ये भांडण निर्माण होऊ शकते. भाऊ भाऊ एकमेकांचे वैरी होऊ शकतात. म्हणून अशा कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीचा फोटो आपण आपल्या घरात लावू नये.
काही फोटो असे असतात की ते चुकूनही आपल्या घरात लावू नयेत. पहिली गोष्ट महाभारतातील युद्ध. महाभारतात प्रचंड अशा मोठ्या प्रकारचे युद्ध घडले होते. मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. लाखो लोक मारले गेले होते. असा फोटो लोक घरामध्ये लावतात. किंवा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत. गीतेतील सार सांगत आहेत. हा फोटो घरात लावू नका.
अशाने घरातील लोकांचे मानसिक आरोग्य आहे ते बिघडते. तणावाचे वातावरण त्याठिकाणी तयार होते. हा फोटो चुकूनही लावू नका. काहीजण हिस्त्र प्राणी असतात, श्र्वापाद असतात, जंगली प्राणी असतात, भांडणारे प्राणी असतात, लचके तोडणारे प्राणी असतात असे फोटोही घरात लावू नयेत. घरातील वातावरण बिघडते. नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते.
अस एखाद जहाज की जे वादळात अडकलेले असेल, मोठमोठ्या लाटा येतात, जहाज आहे ते मोडकळीस आलेले आहे. अशा प्रकारचा फोटो घरात लावू नयेत. धन नाशाची मोठी शक्यता असते. मोठ्या प्रमाणात धन नाश होतो. कुटुंब बिखरू शकते. तसेच झरे, धबधबे, उंचावरून पडणारे पाणी अशा प्रकाराचे फोटो लावतात. पाण्याचा फोटो नक्की लावावा. पण हे पाणी स्थिर असावे. पाणी सावकाश वाहणारे असावे. अशा प्रकारचे फोटो चालू शकतात.
संथ पाण्याचे तलाव असेल किंवा नदी वगैरे असेल तर हे फोटो चालू शकतात. मात्र उंचावरून पडणारे पाणी, झरे धबधबे असे जर फोटो आपल्या घरामध्ये असतील तर त्यामुळे ज्या वेगाने पैसा आलेला आहे त्याच वेगाने तो नष्ट होतो. आपल्या घरातून पैसा निघून जातो. एक एक मार्ग बंद होत जातात. तुमचा व्यवसाय असेल, धंदा असेल त्यात बरकर येत नाही. विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो.
अनेक जणांना सूर्योदयाचे फोटो लावायचे असतात. बाजारात जे फोटो असतात. कॅमेऱ्यात टिपलेले असतात. सूर्योदय आणि सूर्यास्त यामधील बदल आपल्याला समजायला हवा. जर आपण चुकून सुर्यास्ताचा फोटो आपण लावला, जर तुम्ही सूर्य मावळतानाचा फोटो लावला तर त्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येऊ शकते. गरिबी येते. हा फोटो चुकूनही लावू नये. सूर्योदयाचा फोटो अत्यंत शुभ असतो तो लावा. त्यासाठी पूर्वेकडील भिंत आहे ती उत्तम मानली जाते. पूर्व किंवा उत्तर दिशेला हा सूर्योदयाचा फोटो आपण लावू शकता. अत्यंत शुभ प्रकारचे परिणाम दिसून येतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.