नमस्कार मित्रांनो,
प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडलेला असतो की, आपल्या पूर्वजांचे फोटो आपल्या घरात लावावे का. आपले आजी आजोबा, पणजी पणजोबा किंवा त्यांच्या पूर्वीचीही पिढी. त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचे फोटो घरात लावले तर चालतील का? आणि जर लावायचं असेल तर कोणत्या दिशेला लावावे?
जेणेकरून घरावर शुभ परिणाम होतील. अनेक जणांचा हा सुद्धा प्रश्न असतो की देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवले तर चालते का? मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखामध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न पूर्वजांचे फोटो घरात लावावे का? तर याचे उत्तर आहे हो. पूर्वजांचे फोटो, वाडवडिलांचा फोटो आपल्या घरात लावले तर चालतात.
वास्तुशास्त्र असं मानते की, आपल्या पूर्वजांचे आपल्या वाडवडिलांचे फोटो आपल्या घरात असतील तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आता हे फोटो घरामध्ये लावायचे असतील तर कोणत्या दिशेला लावावे? मित्रांनो काही जण म्हणतात की, देवघरात आम्ही पूर्वजांचे फोटो लावले आहेत.
पण हे चुकीचा आहे. जरी आपले पूर्वज महान होते. त्यांनी खूप मोठी कामगिरी करून दाखवली होती. आपल्या घरासाठी खूप मोठे योगदान दिलं होतं, ते सन्माननीय आहेत. मात्र त्यांची बरोबरी कोणत्याही इष्ट देवतेशी होऊ शकत नाही. ज्या देवी देवतांची पूजा आपण करत आहोत त्यांच्या शेजारी म्हणजे देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटो चुकूनही लावू नका.
त्यामुळे आपल्या देवघराचे पावित्र्य नष्ट होते. आपल्या देवघरातून जी स का रा त्म क ऊर्जा बाहेर पडते तिचा नाश होतो याचा त्रास आपल्यालाच होतो असं नाही तर घरातल्या सर्व सदस्यांना होतो आणि पितरांच्या आत्म्याला सुद्धा याचा त्रास होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये आपण हे फोटो चुकूनही लावू नयेत.
तसेच वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये सुद्धा पूर्वजांचे फोटो कधीही लावणे चुकीचे आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील बेडरूममध्ये सुद्धा पूर्वजांचे फोटो चुकूनही लावू नका. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. पती-पत्नीमधील प्रेमात कमतरता येते असं म्हटलं जातं.
आता असा प्रश्न मनात येतो की, मग कोणत्या दिशेला आपण पूर्वजांचे फोटो लावायला पाहिजे जेणेकरून त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळतील. तर मित्रांनो पूर्वजांचे आ शी र्वा द प्राप्त करायचे असतील तर सर्वात उत्तम दिशा आहे उत्तर दिशा. आपल्या घराच्या उत्तर दिशेला जी भिंत आहे दिशेस आपण आपल्या पूर्वजांचे फोटो नक्की लावू शकतात.
त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळतातच पण कुटुंबाचीही भरभराट होते. जर तुम्हाला उत्तर दिशेला फोटो लावणे शक्य नसेल तर दुसरी शुभ दिशा आहे पूर्व दिशा. जर तुम्हाला पूर्वेलाही फोटो लावणे शक्य नसेल तर पूर्व आणि उत्तर यांच्या दरम्यानची दिशा आहे जो कोपरा आहे त्याला ईशान्य कोपरा म्हणतात.
या दिशेला सुद्धा आपण पूर्वजांचे फोटो लावू शकतो. मात्र तुमचे देवघर त्या दिशेला असेल तर मात्र पूर्वजांचे फोटो पूर्वेलाच लावावे. पश्चिम दिशा ज्या ठिकाणी सूर्य मावळतो त्या दिशेला चुकूनही पूर्वजांचे फोटो लावू नये. वास्तुशास्त्र अस मानत की, पश्चिम दिशेला फोटो लावल्याने घरात ताण तणाव वाढतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धन हानी होते. म्हणजेच पैसा कमी होतो, पैसा बाहेर जाऊ लागतो. धनप्राप्तीमध्ये अनेक अडचणी येतात. यापेक्षा भयंकर दिशा म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला तुमच्या पूर्वजांचे फोटो लावले तर त्याचे भयंकर परिणाम बघायला मिळतात.
अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही मात्र वास्तुशास्त्रात हे स्पष्ट केले आहे की, दक्षिण दिशेला जर पूर्वजांचे फोटो लावले असतील तर त्या घरात धन टिकत नाही. काहीजण घराच्या मधोमध जो बीम किंवा कॉलम असतो त्या कॉलमवर पूर्वजांचा फोटो लावतात.
ज्यामुळे येता जाता सर्वांना त्यांचे दर्शन घेता येईल. आपल्या घराचे मध्य स्थान याला ब्रह्मस्थान म्हणतात. हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. या ठिकाणी जर तुम्ही पूर्वजांचे फोटो लावले तर मोठा अपशकून ठरतो. घराच्या मध्यभागी पूर्वजांचे फोटो कधीही लावू नये.
मित्रांनो अजून एक प्रश्न विचारला जातो की, जीवित व्यक्तींचे फोटो लावले तर चालते का? लावले तर चालेल पण त्याच्यासाठी शुभ दिशा आहे उत्तर दिशा. पूर्व दिशा आणि ईशान्य दिशा या तीन दिशा आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जिवंत व्यक्तींचे फोटो लावू शकता.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.