नमस्कार मित्रांनो,
प्रत्येक हिंदू व्यक्ती च्या घरात देव घर असते. आणि इतर देवी देवता बरोबर हळद कुंकू ठेवण्याचे पंच पाळ, दिवा, समई, घंटी, शंख या वस्तू असतातच. त्याशिवाय देवघर अपूर्ण असते.
प्रत्येक वस्तू चा वापर वेगवेगळा आणि वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. जसे देव पूजा करण्यापूर्वी देवा पुढे दिवा लावला जातो. देवांना स्नान घातल्यावर हळद कुंकू लावले जाते.
आणि शंकामध्ये पाणी भरून त्या शंखतील पाणी देवावर शिंपडले जाते. तसेच घरातही शिंपडले जाते. तसेच आरतीच्या वेळी घंटी वाजवली जाते.
आज आपण पाहणार आहोत की घंटी कोणकोणत्या वेळी वाजवली जाते. आपण असे बघत आली आहोत की घंटी नेहमी आरतीच्या वेळी वाजवली जाते.
इतर कोणत्या वेळी घंटी वाजवली जाते हे आपल्याला माहीत नाही आहे. शास्त्र नुसार देवपूजा करताना कितीतरी वेळा घंटी वाजवण्याची विधान आहे. प्रत्येक मंदिरात व देवघरात घंटी असली पाहिजे.
ज्या ठिकाणी घंटी नाही अशा ठिकाणी राक्षस, दैत्य राहतात. वाईट शक्ती वास्तव्य करतात. म्हणून देवघरात व मंदिरात घंटी आवश्य असावी. देव पुजेपूर्वी घंटी वाजवणे म्हणजे देवांना आवाहन करणे होय.
देव पुजेपुर्वी घंटी वाजविली तर प्रत्यक्ष भगवंत उपस्थित राहतात. राक्षसी वृत्ती, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घंटी चे पूजन करून लगेचच पूजेला सुरुवात करावी.
भगवंतांना स्नान घालता ना घंटी वाजवावी. भगवंतांना धूप दाखवताना घंटी वाजवावी. दीप ओवळताना ही घंटी वाजवावी. भगवंतांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ही घंटी वाजवावी.
<
भगवंतांना सजविताना, दागिने घालताना घंटी वाजवावी. आरती करताना घंटी वाजवावी. भगवंतांना उठविताना दुदुंभी किंवा शंख नाद करावा. जर दुदुंभि नसेल शंख नाद करता येत नसेल तर घंटी वाजवावी.
असे स्कंद पुराणात दिलेले आहे. भगवंतांना उठविण्यापूर्वी एकदा घंटी वाजवावी. स्नान घालताना घंटी वाजवावी. स्नान झाल्यानंतर भगवंतांना पोशाख, दागिने, शृंगार करताना घंटी वाजवावी.
त्यानंतर धूप दीप ओवळतान घंटी वाजवावी. पूजन झाले की नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ही घंटी वाजवावी. सर्वात शेवटी पूजन झाली की आरती करतो त्यावेळी घंटी वाजवावी.
ज्यावेळी भगवंतांना चंदनाच्या लेप लावत असतो. चंदन अर्पण करतो तेव्हा ही घंटी वाजवावी. तर आता आपल्या लक्षात आले असेल की देव पूजे दरम्यान घंटी किती वेळा आणि कोणत्या प्रकारे वाजवावी.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.