नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्मात देव पूजा करण्याचे फार महत्व आहे. असे म्हणतात की श्रद्धा भक्ती पूर्वक भगवंतांचे पूजन केले तर आपल्यावर भगवंतांची कृपा नक्कीच होते. पूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात. परंतु आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण हे संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला भगवंतांनी दिलेले आहेत. आपल्यावर भगवंतांची कृपा आहे. आपली पूजा भगवंतांनी स्वीकारली आहे. आज त्याच संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत.
सर्वात प्रथम संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो. देवपूजा दरम्यान धूप किंवा अगरबत्ती चा धूर संपूर्ण घरात पसरला आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागले तर समजावे साक्षात् भगवंत आपल्या घरात प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असण्याचे संकेत देते. अचानक घरातील वातावरण सुखद व प्रसन्न वाटू लागते.
दुसरा संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना देवपूजा झाल्यानंतर जर आपल्या दारात भीक मागण्यासाठी एखादा भिकारी किंवा लहान बालक जर आले तर समजावे आपल्या दारात साक्षात् भगवंत आलेले आहेत. त्या भिकाऱ्याला परत जाऊ देवू नये. त्याला काही ना काही खायला द्यावे. दान केल्याने आपल्या धनात कधी कमी येत नाही तर नेहमी वाढच होते. पूजे दरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे भगवंतांना प्रसन्न करण्या चा खूप चांगला मार्ग आहे.
देव पूजा करत असताना प्रार्थना करत असताना अचानक दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण भगवंतांना करत आहोत ती मानत केली आहे. व त्याचाच हा संकेत आहे. अशा वेळी आपण भगवंतासमोर आपल्या जीवनातील अडीअडचणी आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या अडी अडचणी व इच्छा अपेक्षा प्रत्यक्ष भगवंतपर्यंत पोहोचतील. व त्या लगेचच पूर्ण ही होतील.
पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात भगवंतांची प्रतिमा किंवा शुभ चिन्ह जर आपल्याला दिसले तर समजावे की भगवंत आपल्या पुजेवर प्रसन्न झाले आहेत. लवकरच आपल्या जीवनातील अडी अडचणी व संकट दूर होणार आहेत.
हिंदू धर्मात अतिथिना देवाचे रूप मानले जाते. आपण देव पूजा करत आहोत आणि अशा वेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर समजावे भगवंतांनी आपल्या घरी प्रवेश केला आहे. तर हा भगवंतांना विशेष संकेत मानला जातो. परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. त्यांचे मन दुखावू नये. आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदरसत्कार करावा.
पुढील संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फुल अर्पण केले आणि ते फुल पूजे दरम्यान आपल्या समोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत. आणि ते फुल आशीर्वाद स्वरूप दिले आहे. या प्रकारे हा संकेत मिळतो की भगवंतांच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पुर्ण होतील.
मित्रानो हे आहेत ते संकेत जे देवपूजा दरम्यान आपल्याला मिळतात. व त्याद्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंताच्या उपस्थितीची जाणीव मिळते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.