पाया पडताना / पूजा करताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आले तर काय आहे रहस्य?

नमस्कार मित्रांनो,

कधी देवपूजा करताना तुमच्याही डोळ्यातून अश्रू येतात का? आणि जर येत असतील तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशी काही रहस्य सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल अशा कोणत्या दैवीशक्ती आहे ज्यांची कृपा तुमच्यावर आहे.

आपल्या प्राचीन ग्रंथधर्मानुसार या सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी ब्रम्हांड संपूर्ण रिकामे होते आणि सगळीकडे फक्त अंधार पसरलेला होता. त्याच वेळी अचानक एक विशाल भव्य असे शिवलिंग प्रकट झाले व त्याचा दिव्य प्रकाश संपूर्ण सृष्टीवर पसरला.

संपूर्ण ब्रम्हांडात तेज पसरले आणि त्यानंतर काही काळानंतर लगेचच या ब्रह्मांडात पदार्थांची निर्मिती झाली. त्यात जल, अग्नि, वायु, धातु अशा कितीतरी वस्तूंची निर्मिती झाली. यामुळेच असे मानले जाते की या सर्व वस्तू मध्ये महादेवांचा वास आहे.

या संपूर्ण ब्रम्हांडातील कणाकणात महादेवांची ऊर्जा सामावलेली आहे. महादेवच आदी आहेत आणि महादेवच अंत आहे. आपण जेव्हा कधी देवांचे पुजन किंवा ध्यान करायला बसतो तेव्हा आपले संबंध लगेच देवतांशी जुळतात.

भगवंत हा सर्वव्यापक आहे. सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव वस्तू यांच्यामध्ये त्यांचा वास आहे म्हणून ज्यावेळी तुमच्या अंतर्मनाचा संबंध भगवंतांशी जुळतो वेळी भगवंत काही गोष्टींचे संकेत आपल्याला देतात. हे संकेत खूपच सामान्य असतात. म्हणून आपण त्याकडे लक्ष देत नाही व म्हणून भगवंताचे संकेत आपण समजू शकत नाही.

सर्वव्यापी परमेश्वर हा या सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव आणि तसेच सर्व जीवजंतूंचे आत्म्याशी जोडला गेलेला आहे. जेव्हा आपण पूजन किंवा ध्यान करतो त्यावेळी आपल्या आजूबाजूचे संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाते आणि यामुळेच ध्यान करताना किंवा पूजा करताना आपल्याला प्रसन्न वाटते.

दुःखाचे वातावरणही सुखद व आनंददायी होऊन जाते. आपण कितीही दडपण व स्ट्रेसमध्ये असलो तरीही आपल्याला आनंदी व फ्रेश वाटू लागते. कारण या सकारात्मक शक्तींचा प्रभाव इतका अल्लाहदायक असतो.

कितीतरी वेळा मुले अभ्यास करता करता देवी सरस्वतीचे स्मरण करतात आणि त्यांच्या डोळ्यात लगेच अश्रू येतात किंवा अचानक डोळ्यावर झोप यायला लागते. याचा अर्थ त्या विद्यार्थ्याला देवी सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होत आहे.

एखाद्यावेळी आपण भगवंताची कथा अथवा भजन ऐकले की आपल्या अंगावर अचानक काटा येतो आणि डोळ्यातून पाणी वाहू लागते. भगवंताच्या या अदृश्य शक्तीचा अनुभव आपल्याला येतो आणि आपण रडायला लागतो आणि भगवंतावरील विश्वास आपल्या दृढ व्हायला लागतो.

जर तुमच्याही जीवनात असे काही घडत असेल तर ही माहिती जरूर वाचा. आज आम्ही तुम्हाला असं काय संकेत सांगणार आहोत जे भगवंत स्वतः आपल्याला देतात. परंतु आपल्या लक्षात येत नाही.

जर तुम्ही भगवंताचे ध्यान करताना तुमच्याही बाबतीत असे काही घडत असेल तर समजुन जा की भगवंत आपल्याला काहीतरी संकेत देत आहेत. चला तर पाहूया ते कोण कोणते संकेत आहेत.

पहिली गोष्ट डोळ्यात पाणी येणे. जर तुम्ही भगवंतांचे ध्यान करीत बसला आहात व तुमच्या डोळ्यातून अचानक पाणी यायला लागले तर हा भगवंतांकडून मिळालेला एक संकेत आहे की तुमच्या आत्म्याची व भगवंताची भेट झाली आहे.

अशावेळी आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना असेल तिथे भगवंताला सांगून टाकावी. अश्यावेळी भगवंतांकडे आपण जे काही मागतो ते आपल्याला नक्कीच मिळते.

आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष देत नाही व भगवंताचे नामस्मरण करण्यात तल्लीन राहतो. परंतु ही वेळ भगवंतांकडून आपली इच्छा, मनोकामना पूर्ण करून घेण्याची आहे.

ज्यावेळी तुम्ही भगवंतांचे पूजन किंवा ध्यान करीत आहात व तुमच्या आई डोळ्यात अश्रू आले तर आपल्या जीवनातील दुःख, त्रास, अडचणी सर्व भगवंतासमोर मांडाव्यात व त्या दूर करण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करावी.

त्याबरोबरच पूजा करीत असताना डोळ्यात अश्रू येण्याचा संबंध असाही जोडला जातो की आपल्या अंतर्मनातील वाईट गोष्टींची स्वच्छता होत आहे व आपले मन शुद्ध, निर्मळ आणि पवित्र होत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे दिव्याची ज्योत अचानक वाढणे. अग्नि पंचतत्त्वांपैकी एक आहे. अग्नीमध्ये महादेवांचा साक्षात वास असतो. जर आपण पूजा करीत असलो आणि दिव्याची ज्योत अचानक वाढली तर भगवंत आपल्याला असा संकेत देतात की ते आपली पूजा व भक्तीमुळे प्रसन्न झाले आहेत. अशावेळी आपल्याला भगवंतांची प्रार्थना करून आपली मनोकामना त्यांच्यासमोर प्रकट केली पाहिजे.

तिसरी गोष्ट म्हणजे अगरबत्ती किंवा धुपाचा धूर. जर तुम्ही पूजा करत असताना अचानक पाने अगरबत्ती किंवा धुपाचा धूर भगवंताच्या मूर्ती किंवा प्रतिमेकडे वळला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या पूजेचा भगवंताने स्वीकार केला आहे.

चौथी गोष्ट म्हणजे पूजा करताना अचानकपणे फुलाचे पडणे. जर तुम्ही पूजा किंवा ध्यान करण्याअगोदर भगवंताला फुल अर्पण केले आहे आणि अचानकपणे पूजेदरम्यान ते फुल तुमच्यासमोर पडले तर हे खूप शुभ मानले जाते.

याचा अर्थ असा होतो की तुमच्या पूजेचा भगवंतांनी स्वीकार केला आहे व तुमच्या पूजेचे फळ तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे.

पाचवी गोष्ट म्हणजे दारात गाय येणे. आपण भगवंताचे पूजन किंवा आरती करीत असताना अचानक दारात गाय येणे हा खूपच शुभ संकेत मानला जातो. लगेचच त्या गाईची पूजा करावी व गाईला थोडेसे तूप लावून गुळ घातलेली पोळी खायला द्यावी.

आणि नमस्कार करून आपली इच्छा गाईला सांगावी. आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मित्रांनो, हे आहेत ते संकेत जे आपल्याला पूजा किंवा ध्यान करताना भगवंत स्वतः देतात.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *