नमस्कार मित्रांनो,
शास्त्रोक्त माहिती मंत्र तोडगे तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे काम आहे समस्या तुमच्या जीवनात आहेत. त्या सोडविण्यासाठी या मंत्रांचा या उपायांचा उपयोग तुम्हालाच करायचा आहे, हे मंत्र किंवा हे टोटके करताना ते पूर्ण श्रद्धेने जर आपण केले तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो तुमच्या पर्यंत हे तोडगे सोप्या सहज भाषेत पोहोचवणे हे तोडगे करताना ते पूर्ण शुद्ध मनाने कोणतीही शंका-कुशंका मनात न आणता जर आपण ते आचरणात आणले तर त्याचा लाभ तुम्हाला नक्की होईल.
मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ही पाणी पिण्या पूर्वी असा कोणता मंत्र म्हणावा असे कोणते शब्द बोलावेत जेणेकरून आपल्याला जीवनातील अनेक समस्या तून मुक्ती मिळेल ज्या लोकांना तुमचं म्हणणं पटत नाही, ज्यांचा तुमच्याशी पटत नाही ते लोक तुमचा विरोध करणं सोडून देतील ते तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. जर कोणी तुम्हाला त्रास देणार असेल तर अशा व्यक्ती तुमच्यासमोर येणार नाहीत.
शत्रूंच्या गुप्त कारवाया उघडकीस येतील. मित्रांनो हा मंत्र आपण सात वेळा म्हणायचा आहे पाणी पिण्या पूर्वी आणि नंतर ते पाणी प्यायचे आहे. या मंत्राचा प्रभाव वाढविण्यासाठी एक छोटीशी गोष्ट आपण करू शकता. दररोज सकाळी उठल्याबरोबर चुळ भरा आणि खाली बसून पाच ते दहा मिनिटे ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे, जी तुमची आवडती देवी देवता आहे तिच्या नावाचा तिच्या मंत्रांचा जप करा.
जर तुम्ही भगवान भोलेनाथना मानता शंकरांना महादेवांना मानतात तर ओम नमः शिवाय, जर भगवान श्रीहरी श्रीविष्णू ना आपण मानतात तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणा या मंत्रांचा, जर स्वामी समर्थांवर जर श्रद्धा आहे तर श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्ता वर श्रद्धा आहे ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे भाव आहे तिच्या मंत्रांचा किंवा तिच्या नावाचा पाच ते दहा मिनिटे आपण जप करा किंवा एकवीस वेळा तो मंत्र म्हटला तरी चालेल.
आणि नंतर आपण आपले सकाळचे विधी आहे ते अटोपायचे आहेत त्याने काय होतं तर आपलं मन पवित्र बनतं आणि दिवसभरात आपल्या मनात वाईट विचार चूकनही येत नाही आपलं मन वाईट विचारांना थारा सुद्धा देत नाही आणि म्हणूनच दिवसभर ताजंतवानं वाटतं मन शरीर थकत नाही. मित्रानो जेव्हा तुम्ही आंघोळ कराल आंघोळ केल्यानंतर चिमूटभर साखर आपल्या घराच्या बाहेर नक्की टाका याने काय होतं तर लहान लहान किडे असतात. मुंगी असतात.
हे जीवजंतू असतात तेही साखर खातात आणि संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्यावरील कर्ज समस्या जर कर्ज असेल तुमच्या डोक्यावर तर हे कर्ज फिटू लागत, जो शत्रू आहे त्या शत्रुचे मन तुमच्याविषयी अनुकूल बनत. मंगळवार असेल तर मंगळवारी थोडीशी मसूर डाळ तर अशाप्रकारे आपण आंघोळ केल्यानंतर बाग घराबाहेर फेकून द्या.
बुधवार असेल तर उडीद डाळ टाका किंवा अख्खे उडीद ही टाकू शकता, गुरुवारच्या दिवशी जे फुटाणे असतात म्हणजे भाजलेले चणे ते आपण टाकू शकता. शुक्रवारी मूग टाकल्यास मंगळवारी मसूरडाळ, बुधवारी उडीद, गुरुवारी भाजलेले चणे म्हणजे फुटाणे आणि, शुक्रवारी मूग. मित्रांनो हा छोटासा उपाय कर्ज समस्या तर फिटतेच मात्र आपणास पैशांची चणचण कधी भासणार नाही घरात पैशाची तंगी कधीच भासणार नाही.
अगदी छोटे-छोटे उपाय आहेत. आपण नक्की आमलात आणा. आणि आता जो मुख्य उपाय आहे की पाणी पिण्या पूर्वी आता जेव्हा तुम्ही साखर टाकणार तेव्हा ही मसुरदाळ टाकणार, चणे टाकणार तर त्यानंतर आपण एका पेल्या मध्ये पाणी घ्यायचा आहे आणि या पाण्याकडे पाहत हा मंत्र सात वेळा बोलायच आहे, मंत्र आहे ओम चीमी चीमी स्वाहा, ओम चीमी चीमी स्वाहा, ओम चीमी चीमी स्वाहा, ओम चिमी चीमी स्वाहा, सात वेळा मंत्र म्हणायचा आहे.
<
आणि नंतर हे जल आपण प्राशन करायचा आहे. म्हणजे हे पाणी प्यायचे आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून कामाच्या ठिकाणी जात आहात म्हणजे ऑफिसमध्ये किंवा दुकानात, फॅक्टरीत जिथे तुम्ही काम करता घरापासून ऑफिस पर्यंत जाताना ओम चीमी चिमी स्वाहा हा मंत्र 7 वेळा म्हणा. आणि ऑफिस किंवा फॅक्टरी दुकानात गेल्यानंतर एक प्याला पाणी आपण प्यायच आहे.
पंधरा दिवस म्हणजे दोन आठवडे नित्यनियमाने हा उपाय करून पहा. तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की वरील ज्या काही गोष्टी आहेत की सर्व कामं तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडून येताना दिसून येतील आणि संपूर्ण दिवसभरात जेव्हा तुम्हाला कधी आठवण होईल. हा मंत्र जप करावासा वाटेल तुमच्या मनाला वाटते की हा जप हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. नक्की म्हणा दिवसातून अधूनमधून ओम चिमी चिमी स्वाहा म्हणत जा.
मित्रांनो मंत्र म्हणजे नक्की काय असतात काही अत्यंत पवित्र शब्दांचा हा संग्रह असतो काही अत्यंत पवित्र शब्द एकत्र आलेले असतात. अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे. आपण नक्की या मंत्राचा फायदा करून घ्या.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.