नमस्कार मित्रांनो,
मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज नवीन एक आशा आपल्याला जगण्याचे बळ देत असते. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रहदशेप्रमाणे मनुष्याचे जीवन बदलत असते. जीवनातील कठीण प्रवास करत असताना एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर.
ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. ईश्वरावर असणारी श्रद्धा आपल्याला कोणत्याही संकटातून तारून नेण्यास पुरेशी असते. जेव्हा ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.
आजच्या सोमवारपासून असाच शुभ सकाळ काही राशींच्या भाग्यात येणार आहे. यांच्यावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. श्रावण महिला ची सुरुवात या राशींसाठी विशेष ठरणार आहे.
आज 9 ऑगस्ट 2021 श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. शिवमूठ तांदूळ असणार आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून श्रावणातील सोमवार हा अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. या दिवशी जो कोणी भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने भगवान भोलेनाथाची भक्ती करतो त्यांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर झाल्याशिवाय राहत नाही.
हा दिवस भगवान भोलेनाथ याला समर्पित आहे. पंचांगानुसार चंद्र आणि बुध यांची युती होत असून हा संयोग या राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील.
भोलेनाथाकडे करत असलेली प्रार्थना आता फळाला येणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. महादेवाच्या कृपेने उद्योग-व्यवसाय यामध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. धनप्राप्तीचे योग येणार असून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
तर चला वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
सुरुवात करूया मेष राशी पासून. मेष राशी वर महादेवाची कृपा बसण्यास सुरुवात होणार आहे. श्रावणातील पहिला सोमवार हा आपल्या राशीसाठी अतिशय मंगलकारी ठरणार आहे. ग्रहनक्षत्राची बनत असलेली स्थिती आपला भाग्योदय घडवून आणणार आहेत.
मनाप्रमाणे साथ देणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. कार्यक्षेत्रात ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सामाजिक किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. या काळात बुध, गुरु आणि शनि हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत.
यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महादेवाकडे करत असलेले प्रार्थना या काळात पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. या काळात सूर्य, मंगल, गुरू केतू आपल्या राशीसाठी लाभकारक ठरणार आहेत.
त्यामुळे उद्योग व्यापारात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. संसारिक सुखात वाढ होईल. घरात एखादे मंगल कार्य घडून येऊ शकते. कार्यक्षेत्रात नवीन आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार असून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो.
यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी श्रावण महिना अतिशय उत्तम ठरणार आहे. महादेवांच्या कृपेने आपल्या यश कीर्ती मध्ये वाढ होण्याची संकेत आहेत. या काळात गुरू, शुक्र,शनी आणि राहू हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत.
उद्योगधंद्यात प्रगती घडून येणार आहे. नात्यातील लोकांशी काही वाद निर्माण होऊ शकतात. पण प्रत्येक संकटावर मात करण्यात यशस्वी ठरणार आहात. भोलेनाथाच्या आशीर्वादाने संकटातून मार्ग निघणार आहे.
त्यानंतर ची रास आहे तुळ रास. तुळ राशीवर येणारा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो. या काळात, सूर्य, मंगळ, बुध, गुरु हे आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या घटना घडून येतील.
बेरोजगारांना नवा रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत. लघुउद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. कौटुंबिक जीवनात सुखाची प्राप्ती होईल.
यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी वर महादेव विशेष प्रसन्न होणार आहे. काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. श्रावण महिना आपल्या राशि साठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात सूर्य, मंगळ, शुक्र, शनी आणि हर्षल विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहेत.
महिलांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. उद्योगधंद्यात नव्या योजनांवर खर्च होणार आहे.
नव्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. मित्रमंडळीत आपला मान वाढणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील. घरातील लोकांचा पाठिंबा आपणास लागणार आहे.
यानंतर आहे धनु राशी. धनु राशी साठी महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. श्रावण महिना आपल्या राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मात्र वाईट कर्म किंवा वाईट व्यक्तीच्या संगती पासून दूर राहणे चांगले आहे.
या काळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल. बुध आणि राहू हे आपल्यासाठी लाभदायक आहेत. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य घडू शकते आणि त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय बनेल. राजकीयदृष्ट्या एखादी चांगली गोष्ट कानावर येऊ शकते.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.