नमस्कार मित्रांनो,
अक्षयतृतीयेच्या दिवशी करा हे दिव्य उपाय लाभेल माता लक्ष्मीची कृपा. या दिवशी केलेले पूजा, दान, तप केल्याने कधीही न संपणारे फळ प्राप्त होते. या दिवशी सूर्य व चंद्र त्यांच्या उच्च स्थानी असणार आहेत.
अश्या ह्या शुभ दिवसात आपण नारायण व लक्ष्मीचे पूजन करून एक उपाय केल्यास त्यांची कृपा आपल्यावर बरसते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. दारात रांगोळी व तोरण बांधावे. सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य द्यावे.
त्यानंतर आपली नित्यनियमाने देवपूजा करायची आहे. आज संपूर्ण दिवस शुभ आहे. आपल्याला जी वेळ योग्य वाटेल त्या वेळी अक्षय तृतीयेची पूजा संपन्न करायची आहे. ह्या दिवशी पूजे दरम्यान विष्णू व माता लक्ष्मीची विशेष पूजा करायची आहे.
पूजे दरम्यान आपल्याला 1 पिवळे कापड लागणार आहे ते स्वछ व पवित्र असावे. पिवळे कापड नसेल तर पांढरे कापड घेऊन त्यास हळदी मध्ये बुडवून पिवळे करता येईल.
त्यानंतर आपल्याला 100 ग्राम तांदूळ लागणार आहे. हे तांदूळ घेऊन आपल्याला पिवळे करायचे आहे. ते तांदूळ पिवळ्या कापडावर ठेऊन ते बांधायचे आहेत. आपण ज्या वेळेस पूजेला बसणार त्यावेळेस ते तांदूळ माता लक्ष्मी व विष्णूंसमोर ठेवायचे आहे.
त्यांनतर त्यांचे पूजन करायचे व त्या गाठूड्याचे पूजन करायचे. आणि त्यानंतर हाथ झोडून प्रार्थना करायची. त्यानंतर पूजा संपन्न झाल्यावर 108 वेळेस ‘ओम नमो भागवते वसुदेवाय’ तसेच ‘ओम महालक्ष्मी नमः असा जप करायचा आहे.
तसेच आपण विष्णू पुरणाचा पाठ करू शकता. तसेच सायंकाळच्या वेळी सूर्यास्त झाल्यावर पुन्हा ज्याप्रकारे आपण सकाळी पूजा केली आहे तशी पूजा संपन्न करायची आहे.
तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि पूजा करायची आहे. आणि आपण जे पिवळ्या कापडात जे तांदूळ बांधून ठेवले होते ते आपण आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. आणि आपण ते ठेवताना ओम महालक्ष्मीचा जाप करायचा आहे.
हा उपाय नक्की ह्या दिवशी करावा. धन्यवाद.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.