नमस्कार मित्रांनो,
ऑक्टोबर महिना आनंद, गारवा देणाऱ्या महिन्यांपैकी एक आहे. या दरम्यान, हवामानाची दिशा बदलते, वातावरणात पसरलेली उष्णता हळूहळू कमी होते आणि थंडी येऊ लागते. यासह, दिवस देखील या महिन्यापासून लहान होऊ लागतात. अशा परिस्थितीत, या महिन्यात जन्मलेल्या लोकांवर देखील या महिन्याच्या वातावरणाचा परिणाम दिसून येतो.
कोणत्याही वर्षातील ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप शांत स्वभावाच्या असतात. या व्यक्ती राजकारण, कला, टेक्नॉलॉजी, अभिनय, बिझनेस अथवा मेडिकल क्षेत्रात आपले नाव कमावतात. जाणून घ्या कशा असतात या व्यक्ती…
ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती सौंदर्य प्रेमी आणि खूप आकर्षक असतात. या महिन्यात जन्मणाऱ्या व्यक्ती कोमल स्वभावाच्या असतात. मात्र, खुलेपणाने या व्यक्ती कोणाशी बोलू शकत नाहीत. त्यांचं निसर्गावर प्रेम आहे आणि त्यांना निसर्गासोबत वेळ घालवणे देखील आवडते.
बंद खोलीत त्यांच्याशी बोलण्याऐवजी, जर तुम्ही त्यांच्याशी मोकळ्या वातावरणात बोललात तर तुम्हाला ते अधिक व्यावहारिक वाटतील. या महिन्यात जन्माला आलेले लोक फार लवकर कोणातही मिसळत नाहीत आणि त्यांना त्यांचे मुद्दे मांडण्यातही अडचणी येतात. तसेच, ते मनापासून स्वच्छ स्वभावाचे समजले जातात आणि प्रत्येकाशी चांगले वागणे हा त्यांचा गुण आहे.
या महिन्यात जन्मलेले लोक बोलण्यात पटाईत नसले, तरीही त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते. चांगली अंगकाठी आणि सौम्य स्वभाव लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. जरी या महिन्यात जन्मलेले लोक बहुतेक वेळा शांत शांत असले, तरी जेव्हा कोणाला त्यांची गरज असेल तेव्हा ते प्रथम येतात.
ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या संकटाशी धीराने तोंड देतात. जेव्हा निराशेचे प्रसंग येतात तेव्हा या व्यक्ती त्यातून या धैर्याने बाहेर पडतात. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती आपल्या क्षेत्रात मोठी प्रगती करतात. एखादी गोष्ट करायची ठरवल्यास ती पूर्ण करूनच श्वास घेतात. या महिन्यात जन्मणाऱ्या व्यक्ती अस्ताव्यस्त राहणे अजिबात आवडत नाही. आपल्या आयुष्याबद्दल या अनेक योजना बनवतात. त्या पूर्णही करतात.
ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक आरोग्याबाबत इतके सतर्क राहतात की असं कोणी राहत नसेल. त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या आरोग्याची काळजी असते. म्हणूनच युवा झाल्यावर ते योग्य दिनचर्या स्वीकारतात, योगा-ध्यान करतात आणि निरोगी राहतात. मात्र, वाढत्या वयाबरोबर त्यांना श्वास घेणे, पाय दुखणे यासारख्या समस्या होण्याची शक्यता असते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.