नमस्कार मित्रांनो,
स्वामी भक्तहो नमस्कार मुंबईमध्ये बळवंतराव भेंडे म्हणून एक गृहस्थ होते ते खाजगी नोकरी करत असत. त्यांचे जीवन आनंदी होते. सर्वकाही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली.
त्यांना एका अज्ञात रोगाने पछाडले पुष्कळ वैद्य केली परंतु आजार काय होतात याचे निदानच होत नव्हते. शारीरिक त्रास खूपच वाढत होता. काय करावे हे त्यांना समजत नव्हते.
त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळून गेलेली होती. तेव्हा असेच त्यांच्या ओळखीच्या एका सज्जन गृहस्थांनी त्यांना स्वामींच्या लीलांबद्दल सांगितले.
स्वामी लीलांचे श्रवण केल्यानंतर श्री बळवंतरावस आपला आजार नक्की बरा होणार हा विश्वास जागरूक झाला. स्वामींची कृपा होताच आपला रोग समूळ नाश होईल हा विश्वास त्यांच्यामध्ये जागृत झाला. स्वामी भक्तहो आता बळवंतरावांना स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली होती.
अक्कलकोटमध्ये कधी जाऊ आणि स्वामी दर्शन घेऊ ही ओढ त्यांना लागली होती आणि एके दिवशी त्यांच्या आईसोबत ते अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी आले.
वटवृक्षाच्या छायेखाली स्वामींचा दरबार भरलेला होता. अनेक दुःखी त्यांचे प्रश्न स्वामी मार्गी लावत होते, अनेकांना आधार देत होते. बळवंतरावांनी हे बगताच त्यांचा विश्वास अजून दृढ झाला आणि ते स्वामींसमोर आले.
स्वामींची त्यांनी दर्शन घेतले आणि हात जोडून स्वामींना विनंती केली की, महाराज मी अज्ञात रोगाने खूप पिडलेलो आहे हे दुःख मला सहन होत नाही हे स्वामीराया ह्या तुमच्या बाळावर कृपा करा आणि मला या आजारातून बरे करा.
मला या आजारातून बरे करा. स्वामी भक्तहो स्वामी आई आहे व्याकुळतेने तिच्या बाळाने आवळवले तर तिला ऐकावेच लागते.
बळवंतरावांनी आळवताच स्वामी आईचे हृदय पाजरले आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीफळ दिली आणि बोलले अरे बाळा तू घरी जा आणि स्वस्थ बैस तुझा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे.
बळवंतरावरावांना स्वामींचे वचन ऐकून अत्यानंद झाला आणि स्वामींनी दिलेला प्रसाद घेऊन ते मुक्कामाच्या ठिकाणी आले. स्वामीरायांचे अ लौ कि क सामर्थ्य बघून त्यांची स्वामी चरणी दृढ भक्ती जडली.
असो दुसरे दिवशी त्यांना पंढरपूरला जायचे होते म्हणून स्वामींचे दर्शन घेऊन जाऊ असे मनोमन ठरवून ते स्वामींच्या दर्शनासाठी येतात. स्वामींना शुद्ध भक्ती खूप आवडते.
बळवंतराव आणि त्यांचे मातोश्रींची शुद्ध भक्ती स्वामींना खूपच आवडली. म्हणून तर काय स्वामींनी त्यांना पांडुरंग यांच्या रूपात दर्शन दिले. बळवंतराव आणि त्यांच्या मातोश्री यांना स्वामींचे ठिकाणी प्र त्य क्ष पांडुरंगच दिसू लागले.
आता मात्र बळवंतरावांना स्वामींचे वेडच लागली त्यांच्या विश्वासाने सर्वोच्च पातळी गाठली आणि आपण नक्कीच रोगमुक्त होणार हा विश्वास दृढ झाला.
स्वामी भक्तहो बळवंतराव हे त्यांच्या मातोश्रींसह मुंबईला परत आले. मुखात अखंड श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत होते आणि आश्चर्य म्हणजे इतक्या दिवसांपासून पछाडलेल्या आजारातून काही दिवसातच बळवंतराव रोगमुक्त झाले आणि पूर्णपणे बरे झाले.
आता मात्र बळवंतराव स्वामी नामात नाचूच लागले. बळवंतराव स्वामींचे अनन्य भक्त झाले. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तहो आजच्या स्वामीवाणीतून स्वामी आपल्याला खूप खोल परंतु अतिशय सहज असा बोध घेत आहेत.
बळवंतरावांची भक्ती शुद्ध होती. त्यांच्या प्रार्थनेत तळमळ होती. परंतु त्यांचे चंचल मन त्यांना त्रास देत होते. त्यांच्या मनात शंकाकुशंका आणत होते परंतु स्वामींनी त्यांना स्वस्त बैस असे बोलून त्यांना हेच सांगितले की, तुझी अनन्य भक्ती तुझ्या अतूट विश्वासाच्या शक्तीने कार्य सुरू केले आहे.
मग निःशंक रहा, निर्भय रहा, स्वस्थ रहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. बघाना आज आपल्यासाठी स्वामींनी किती मोठा आधार दिला आहे.
पण स्वामी भक्तहो कदाचित स्वस्थ बसण्याचा काही लोक असा अर्थ घेतील की आपण काहीच करायची नाही. स्वामी आपल्याला दैववादी बनवण्याचा उपदेश देत नाहीत. स्वामींच्या प्रकृतीचे काही नियम आहेत.
जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकृती कामाला लागते. प्र त्ये क अणु-रेणू हे कार्य करत असते. आपले शरीरसुद्धा प्रकृतीचा हिस्सा आहे. त्याकडून सुद्धा कर्म करून घेणे गरजेचे आहे.
पण यामध्ये शरीरातील विकार अथवा चंचल मनाच्या चुकीच्या सवयींमुळे प्रकृतीला आपल्याद्वारे जे कर्म करून घ्यायचे आहेत ते होत नाही. आणि म्हणून आपल्या इच्छा पूर्ण होण्यास विलंब होतो.
जसे एखाद्या मुलाला शाळेत पहिला नंबर आणायचा असेल तर प्रकृती त्यासाठी सर्व बंदोबस्त करते. छान शिक्षक देते, योग्य पाठ्यपुस्तक देते पण त्याला अभ्यास करण्याचा आळस असेल तर कसे होणार?
असो स्वामी भक्तहो स्वामी हे गुरु तत्व आहे आपण कोणते कर्म करावे कुठले निर्णय घ्यावे याचे स्वामी आपल्याला सतत मार्गदर्शन देत आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी की, ते मार्गदर्शन आपल्याला हृदयातुन हृदयातील शांतीतून मिळत असत.
खरं तर जेव्हा स्वामी आपल्याला स्वस्त बैस असे म्हणतात तर ते आपल्या चंचल व अविश्वासी व शंखेकोर विकरी मनाला उद्देशून बोलत असतात. असो हा खूप खोल विषय आहे. जसे जसे स्वामी आपल्याला बुद्धी देतील तसे तसे स्वामी सर्व बोलून घेतील हा विश्वास आहे.
चला तर मग सर्व मिळून स्वामींचा जय जयकार करूया. अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.