नवग्रहांशी संबंधित सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्याचा प्रभावी मार्ग

नमस्कार मित्रांनो,

सनातन परंपरेत जीवनातील संकट दूर करून सुखप्राप्तीसाठी केलेल्या सर्व उपायांपैकी दान हे अ त्यं त प्रभावी आणि लवकर फळ देणार मानलं जातं. दान केल्याने मनोकामना तर पूर्ण होतात. पण या शिवाय पुण्यफळाची प्राप्ती सुद्धा होते.

नवग्रहांशी संबंधित सर्व दोष आणि पापांपासून मुक्त होण्यासाठी दान हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. कोणत्या ग्रहाचा त्रास दूर करण्यासाठी काय दान करावं याबाबत ज्योतिष शास्त्रात सविस्तर सांगण्यात आला आहे. चला जाणून घेऊया.

मित्रांनो ज्योतिषशास्त्रात सुर्यदेवांना ग्रहांचा राजा मानला जातो. कुंडलीत सूर्य देवांकडून शुभ फळ मिळण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित सर्व दोष दूर करण्यासाठी रविवारी गहू, तांबे, तूप, सोने आणि गुळ यांचे दान करावे असे सांगण्यात येते.

ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक आहे. अशा स्थितीत कुंडलीतील चंद्रग्रहण बलवान होण्यासाठी आणि त्याचे सर्व दोष दूर करण्यासाठी तांदूळ, साखर, पांढरे वस्त्र, चांदी आणि पांढऱ्या वस्तूंचे सोमवारी दान करावे असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. कुंडलीतील पृथ्वीपुत्र मंगळ ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी आणि त्याची शुभ फळ मिळण्यासाठी मंगळवारी गहू, मसूर, लाल वस्त्र आणि गुळाचे दान करावे असं म्हंटलं जाते.

मित्रांनो बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुद्धीचा कारक बुध ग्रह याच्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी आणि त्‍याची शुभ फळ प्राप्त करण्यासाठी बुधवारी मुग, हिरव्या रंगाचे कपडे आणि कापूर इत्यादींचे दान करावे असे सांगितले जाते.

आता पाहूया गुरु ग्रहाकडे ज्योतिषशास्त्रात देवगुरु बृहस्पतीला सौभाग्याचा कारक मानला जातो. अशा स्थितीत गुरुशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि त्यांचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी हरभरा डाळ, पिवळा रंग, पिवळी हळद, पिवळी मिठाई आणि शक्य असल्यास सोन्याचे दान करावे असे म्हटले जाते.

कुंडलीतील शुक्राशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी आणि त्‍याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी चांदी, तांदूळ, दूध आणि अत्तर या वस्तूंचे दान करण्यात यावे असे सांगितले जाते.

शनी ग्रहाशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी त्याची शुभ फळ प्राप्त करण्यासाठी शनिवारी तिळाचे तेल, तीळ, काळे कपडे, काळी घोंगडी या वस्तूंचे दान केले जावे. राहू जर तुमच्या जीवनात अडथळे आणत असेल तर शनिवारी निळ्या रंगाचे कपडे, मोहरी, उडीद डाळ इत्यादींचे दात करावे ज्यामुळे होणारा त्रास दूर होईल.

केतूचा त्रास दूर करण्यासाठी तीळ आणि लोकरीचे कपडे दान करा आणि शुभ परिणाम प्राप्त करा. मित्रांनो सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे रोज तुम्ही नवग्रह स्तोत्राचा पाठ केल्यास नवग्रहांच्या सर्वच दोषांपासून मुक्ती मिळते आणि आयुष्यात आनंद येतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *