नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थांचा महिमा एक अत्यंत प्रभावशाली उपाय विधीच्या अनुषंगाने आपल्या समोर मांडत आहोत. तंत्रशास्त्रात करपूर होऊन या नावाचा अत्यंत प्रभावशाली विधी सांगितलेला आहे. हा विधी करायला कापराच्या गोळ्या आणि एक नारळ लागेल.
हा नारळ आपण सोलायचा आहे आणि या नारळाची शेंडी आपल्या देवघरासमोर पाटावर ठेवायची आहे. या नारळावरती कापराच्या 7 गोळ्या ठेवायच्या आहेत मात्र या गोळ्या ठेवायची एक पद्धत आहे. सुरुवातीला फक्त एक गोळी ठेवायची आहे आणि ही गोळी प्रज्वलित करायची आहे बरोबर नारळाच्या मध्यावर ठेवायची आहे.
गोळी प्रज्वलित केल्यावर ‘श्री स्वामी समर्थ ‘ या मंत्राचा सारखा जप करायचा. पहिली गोळी संपत आली की त्याजागी दुसरी गोळी ठेव्याची आहे अश्या प्रकारे आपण 7 गोळ्या प्रज्वलित करायच्या आहेत. कापराची ज्योत कायम चालू राहील विजनार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आहे.
मित्रांनो हा विधी नक्की कधी करायचा. आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करणार आहात. देवपूजा संपन्न झाल्यानंतर हा विधी करू शकता. सायंकाळी जेव्हा तुम्ही देवघरात दिवा प्रज्वलित करता तर दिवेलागणीच्या वेळी आपण हा उपाय करायचा आहे. हा छोटासा विधी आपल्या घरात शांतता निर्माण करतो.
जर घरामध्ये सातत्याने कटकटी होत असतील, लोक एकमेकांशी प्रेमाने वागत नाहीत, तर हा उपाय करून पहा. हा उपाय करून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरात झालेली दिसेल घरामध्ये सुख शांतता निर्माण होईल.
मित्रानो तुमच्या मनात जर नैराश्य असेल तर ह्या उपायाने मनातील नैराश्य दूर होते आपली मन स्थिर होते. एखादी समस्या आहे आणि ती समस्या सुटत नाहीये या समस्ये बाबत उत्तर आपल्याला स्वामींच्या कृपेने जरूर मिळत.
एखादा निर्णय घ्यायचा आहे मात्र निर्णय नक्की कोणता घ्यावा त्यामध्ये सुद्धा हा करपूर विधी अत्यंत कामी येतो. तुम्ही योग्य त्या निर्णयावर नक्की पोहोचाल. असा हा उपाय तुम्ही दररोज करू शकता आणि प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावसेला हा नारळ बदलायचा आहे. हा नारळ आपण त्या दिवशी फोडायचा आहे जर तो खराब निघाला तर वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा जर एका पिंपळाच्या, वडाच्या झाडाखाली ठेऊन आलात तरीही चालेल.
जर नारळ चांगला निघाला तर तो घरातल्यानी प्रसाद म्हणून खायचा आहे मित्रानो श्री स्वामी समर्थांचा महिमा खूप मोठा आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.