नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आपल्या पैकी अनेक जण दर मंगळवारी किंवा आपल्या कुलदैवताच्या वारी देवघरात कळस भरून त्याचं पूजन करतात. मित्रांनो हा कळस आपल्या कुलदेवतेचा कळस म्हणूज पुजला जातो.
मित्रांनो, तुम्ही सुद्धा देवघरात कळस भरून, त्या कलशाचे पूजन करत असाल. कळस भरल्यानंतर आपण त्यावर नारळ सुद्धा पूजतो. मित्रांनो कधी न कधी त्या कळसाच्या नारळाला कोंब फुटतो. आपण पूजलेल्या नारळा मधून एक सफेद किंवा हिरवा कोंब बाहेर येतो. अशा वेळी बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नारळाला कोंब का फुटला. आणि या कोंब फुटलेल्या नारळाचे काय करावे.
मित्रांनो कोंब फुटलेल्या नारळाचा एक सोपा उपाय आहे, आपण तो करू शकता. हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारच्या अशुभ घटना घडत नाहीत. त्यामुळे आपण निर्धास्त पणे हा उपाय करू शकता.
तर मित्रांनो तुमच्याही घरातील नारळाला कोंब फुटला असेल किंवा तुम्ही नियमित कलश पूजन करत असाल तर कधी ना कधी नारळाला कोंब फुटेलच. कोंब फुटल्यानंतर काय करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो नारळाला कोंब फुटला की तो नारळ आपण कळसातुन काढून घ्यावा. आणि त्या जागी दुसरा नवीन नारळ आणून त्याचं पूजन करावं. नवीन कळस भरून त्यामध्ये नवीन नारळ पुजावा. आणि अगोदर चा जो कोंब फुटलेला नारळ होतो तो आपण कोणत्याही मंदिराच्या परिसरात जमिनीत लावावा. मित्रांनो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो नारळ तुमच्या घराच्या अंगणात, किंवा बागेत सुद्धा लावू शकता.
मित्रांनो नारळ जमिनीत लावण्या आधी एखाद्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यात तो नारळ ठेवावा. पाण्यात ठेवलेला नारळ 4 ते 5 दिवसांनी काढून तुम्ही जमिनी मध्ये लावावा. आपण जमिनीत ज्या ठिकाणी नारळ लावला असेल त्या ठिकाणी रोज पाणी टाकावे, ज्याने त्या कोंबाचे रोपा मध्ये रूपांतर होईल.
मित्रांनो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नारळाच्या झाडाला पाणी घातल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे रोज नारळाच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी घाला.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.