पूजेचा नारळ खराब निघाला तर काय असतात संकेत… जाणून घ्या शुभ की अशुभ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मात पूजा पाठ, विधी, व्रत यांना अनन्यसाधारण महत्व आहे. यामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात बाप्पांच्या पूजनाने जशी केली जाते. तशीच श्रीफळ म्हणजेच नारळ वाढवून सुद्धा केली जाते. मग ती पूजा कितीही छोटी किंवा मोठी असो, श्रीफळ चे महत्व कायम आहे.

नारळ फोडण्याचे जसे महत्व आहे तसेच ते फोडल्यावर तो खराब निघतो की चांगला याच देखील महत्व आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्की जाणून घ्या की पूजेचे नारळ खराब निघणे शुभ असते की अशुभ तसेच यामागे कोणते दैवी संकेत असतात.

मित्रांनो अनेकदा पूजेच्या वेळी अर्पण केलेले नारळ खराब निघतो, अशा परिस्थितीत बहुतेक लोक त्यास फेकून देतात आणि त्यांना भीती वाटते की काहीतरी अशुभ होणार आहे, देव क्रोधित आहे किंवा एखादा अपघा त होणार आहे. बर्‍याच गोष्टी मनाच्या भोवती फिरू लागतात.

मित्रांनो शास्त्र तुम्हाला असे सांगते की, पूजेमध्ये अर्पण केलेले नारळ जर खराब निघाले तर ते अशुभ मानले जात नाही. तर, यामागे काही कारणे आहेत. शुभ होण्यासोबत नारळाला माता महालक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते.

मित्रांनो असे म्हटले जाते की, प्रत्येक पूजेमध्ये नारळ असणे गरजेचे आहे. अनेकदा असे होते की आपण पूजेमध्ये चढवलेला नारळ आतून खराब निघतो आणि तुम्हाला वाटते की परमेश्वर आपल्यावर नाराज आहेत किंवा काहीतरी दुर्घटना घडणार आहे.

पूजेचा नारळ खराब निघाला तर याचा अर्थ हा होत नाही काहीतरी अशुभ होणार आहे किंवा काहीतरी अनिष्ट घडणार आहे. याच्यासाठी उलट नारळाचे खराब निघणे शुभ मानले जाते. हा परमेश्वराचा एक संकेत आहे. जेव्हा नारळ खराब निघतो तेव्हा लोक नकळत काळजीत पडतात, चिंतीत होऊन जातात.

नारळ खराब निघाल्यावर तुम्हाला दुकानदारावर राग सुद्धा आला असेल परंतु  हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे. त्याची स्वतःची अशी काही मान्यता आहे. येथे प्रत्येक पूजेचे स्वतःचे असे काही अभिप्राय असतात. असे मानले जाते की, जर पूजेचे नारळ खराब निघाले तर परमेश्वराने स्वतः हा प्रसाद ग्रहण केला आहे असे मानले जाते.

मित्रांनो तसेच नारळ आतून पूर्णपणे सुकला असेल तर हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो. म्हणजेच येत्या नजीकच्या काळात तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे असे यावरून समजले जाते. खराब नारळ म्हणजे तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्या.

पुजेचा नारळ खराब निघणे याचा अर्थ असा की, तुमची कोणतीतरी मनोकामना पूर्ण होणार आहे. हा प्रसाद साक्षात ईश्वराने ग्रहण केला आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे घरातील वाद न वाढवता, स्वतः फारसे चिंतीत न होता तुम्ही देवाला श्रीफळ अर्पण केले आहे असे समजावे. त्यामुळे तुमचं जीवन अगदी समाधानकारक व्यतित होईल.

नारळ खराब निघाला तर त्यावेळी तुम्ही कोणतीही इच्छा व्यक्त कराल ती इच्छा पूर्ण होते. म्हणूनच जर पुढच्या वेळी पुजेचा नारळ खराब निघाल्यास चिंतित होऊ नका. त्याला परमेश्वराचा आशीर्वाद समजा. त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या समोर तुमची जी इच्छा मनामध्ये व्यक्त कराल, ती इच्छा परमेश्वर पूर्ण करेल.

मित्रांनो काही संकेत हे दैवी व शुभ, चमत्कारिक असतात पण ते कळण्यासाठी थोडा वेळ लागतो. आता जर तुमचा पूजेचा नारळ चांगला निघाला तर काय असते हे पण जाणून घेणे गरजेचे असते, त्यामुळे देखील गोंधळ होतो.

पूजेवेळी वाढवलेले नारळ जर चांगले असतील तर त्यातील पाणी देवांवर अलगद शिंपडावे, तसेच त्यातील खोबरे तेथील सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करावे, तेव्हा पूजा सुखी, संपन्न होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *