नमस्कार मित्रांनो,
आता श्रावण महिना सुरु झाला आहे. सर्वजण महादेवांचे पूजन, अभिषेक करण्यात मग्न होतील. महादेवांची ज्योतिर्लिंगे भक्तांच्या गर्दीने फुलून जातील. पण फक्त महादेवाचे पूजन करून आपली पूजा पूर्ण होत नाही.
आधी आपल्याला नंदी महाराजांचे पूजन करावे लागते. मगच महादेवाचे दर्शन होते. कारण स्वतः महादेवांनी त्यांना तसे वरदान दिलेले आहे. तसेच ते महादेवांचे दूत ही आहेत.
आपण जर त्यांच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा ते महादेवापर्यंत पोहचवण्याचे काम करतात. या विषयी एक कथा सांगितली जाते.
श्रीलाद नावाचे ब्रह्मचारी मुनी होते. एकदा ते रानात गेले असताना त्यांना एक छोटेसे बालक रडताना दिसले. त्यांनी त्या बालकाला उचलून आपल्या आश्रमात आणले व आपल्या त्याप्रमाणे त्याचा सांभाळ करू लागले.
त्यांनी त्या बालकाचे नाव नंदी असे ठेवले. बालक हळूहळू मोठे होऊ लागले. एकदा त्या मुनींच्या आश्रमात दोन साधू आले. त्यांनी त्या मुलाला बघितले व मुनींना सांगितले की हा मुलगा हुशार आहे परंतु अल्पायुषी आहे. याचे मरण जवळ आले आहे. जास्त दिवस हे बालक काही जगणार नाही.
हे ऐकून त्या बालकाला खूप वाईट वाटले. त्या बालकाने मला रानात जाऊन महादेवांची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप चालू झाला. महादेव सुट्ट्या बालकाच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले व त्याच्या पुढे प्रकट होऊन त्याला अजरामर होण्याचा आशीर्वाद दिला व त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले.
महादेव व पार्वती यांनी सर्व गणांसमक्ष नंदीचा गणांचा अधिपती म्हणून अभिषेक केला आणि असा आशीर्वाद दिला की जेथे जेथे महादेव असतील तेथे तेथे प्रत्येक ठिकाणी नंदी असेल. नंदीशिवाय महादेव आणि महादेवाशिवाय नंदी यांचे मंदिर अपूर्ण समजले जाईल.
आणि जे फक्त आपल्या इच्छा नंदीच्या कानात सांगतील त्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. स्वतः महादेव तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तुम्ही महादेवांकडे तुमची इच्छा प्रकट करू शकता. मात्र नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते.
कारण नंदी म्हणजे महादेवांचे दूत आहेत व कोणतेही काम असेल ते प्रत्यक्ष साहेबांना सांगण्यापेक्षा त्यांच्या सेक्रेटरीला जर सांगितले तर ते चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचते हा आपला अनुभव आहे.
म्हणून यापुढे कधीही तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेलात तर आपली जी काही इच्छा असेल ती महादेवांना न सांगता नंदी महाराजांच्या कानात सांगून ओम नमः शिवाय ये तीन शब्द म्हणा. म्हणजे ती लवकरात लवकर पूर्ण होईल.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.