देवाला नेहमी त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करावा जाणून घ्या कोणत्या देवाला कोणता नैवेद्य प्रिय आहे?

आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी काही विशिष्ट दिवशी कोणत्याही पूजाना देवाला नैवेद्य दाखवत असतो पण प्रत्येक देवांना काहीतरी विशिष्ट नैवेद्य दाखवायचा असतो काही विशिष्ट नेवैद्य त्या देवांना प्रिय असतो जसं की गणपती बाप्पाला मोदक आवडतो म्हणून आपण चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य दाखवतो तसेच गणपती बाप्पाला लाडू आवडतात म्हणून आपण लाडू देतो.

त्याचप्रमानेच आपण सत्यनारायणाच्या पूजेला शिरा हा प्रसाद बनवत असतो कारण ज्या देवासाठी आपण पूजा करतोय त्या देवाच्या आवडीचा नेवेद्य आपण जर त्या देवाला दाखवला आपण जर त्यांना अर्पण केला तर ते देव बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली जी इच्छा आहे ते ती लवकर पूर्ण करतात तर आज मी तुम्हाला दत्त संप्रदायाने कोणत्या देवाला कोणत्या अवताराला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे.

कोणत्या अवतारासाठी कोणता नैवेद्य प्रिय आहे ते सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आहेत भगवान श्री दत्तात्रेय भगवान श्री दत्तात्रेयांना आपण केसरी गोड भात केसरी दूध किंवा केसरी पेढा यांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो त्यानंतर श्रीपादश्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ यांना गव्हाच्या पिठाचा शिरा दूध-भात मोदक किंवा राजगिऱ्याची भाजी यांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो.

त्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना घेवड्याची भाजी आणि गोड भातो याचा नैवेद्य अर्पण करायचा असतो श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळी बेसन लाडू कडबोळी कांदा भजी गव्हाची खीर तसेच चहा यांचा नैवेद्य अर्पण करायचा असतो त्याचप्रमाणे साईबाबा साईबाबांना पापडी वाला ची भाजी मुगाची खिचडी हा नैवेद्य खूपच प्रिय असतो.

यानंतर गजानन महाराज गजानन महाराजांना पिठलं ज्वारीची भाकरी मिरचीचा ठेचा कांदा हा नैवेद्य त्याचप्रमाणे सद्गुरु श्री शंकर महाराज सद्गुरू शंकर महाराजांना खिचडी सर्व डाळीची त्याचप्रमाणे कांदा भजी चहा आणि शेवयाची खीर यांचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे त्यानंतर सद्गुरु श्री चिले महाराज यांना वडापाव तळलेली मिरची मोदक हा नैवेद्य खूपच प्रिय आहे.

जर तुम्ही अशा प्रकारे यापैकी कोणत्याही देवांना काही पूजेनिमित्त काही विशिष्ट दिवशी जर तुम्ही नेवेद्य करणार असाल तर सांगितल्या प्रमाणे त्या त्या देवाला तो तो नैवेद्य जो प्रिय आहे तो तुम्ही दाखवा तर यामुळे तुम्हाला नक्कीच देव बाप्पा जे आहेत ते लवकर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *