नमस्कार मित्रांनो,
13 ऑगस्ट शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमी तिथी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते.
नागपंचमीला नागदेवतेची मनोभावे पूजा करतो. असे केल्याने आपला वंश वाढतो आणि सर्प दंश यापासून सुद्धा आपलं संरक्षण होतं असं हिंदू धर्म शास्त्र मानत आणि म्हणून नागपंचमीला आपण नागदेवतेची पूजा अवश्य करावी.
नागपंचमीला आपण भगवान शिवशंकराची आणि माता पार्वती यांचीही पूजा करा. कारण त्यामुळे सुख सौभाग्याची प्राप्त होत असते.
आपण नागपंचमीला ही सहा कामे चुकूनही करू नका. हिंदू धर्मशास्त्रानुसार, ज्योतिष शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार ही सहा कामे नागपंचमीला केल्यास जीवनात अनेक समस्या उपलब्ध होतात आणि कधी कधी तर आपला वंशसुद्धा बुडू शकतो.
या सहा गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊ या.
नागपंचमीस पहिले जे काम आहे ते म्हणजे जिवंत नागाची पूजा करणे. अनेक लोक नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करू इच्छितात. भारतात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही पद्धत अजूनही सुरू आहे.
खरं तर जे लोक या नाग, सापांना पकडतात. ते त्यांचा प्रचंड छळ करतात. त्यांना इजा पोहोचवतात आणि त्यांच्या या दुष्कृत्यात आपण जर सहभागी झालो तर आपलं वंश नष्ट होण्याची भीती सुरू होते.
हिंदू धर्म शास्त्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. याउलट आपण आपल्या घरात नाग, नागिन आणि त्यांच्या पिल्लांचा फोटो ठेवून त्याची पूजा करू शकता किंवा पाटावरती चित्र काढू शकता. कणकेपासून यांच्या मुर्त्या बनवू शकता किंवा धातूच्या मुर्त्या असतील तर त्याची पूजा करू शकता.
दुसरी गोष्ट आपण नागपंचमीस जमिनीच खोदकाम करू नये. ज्यांचा खाणकामाचा व्यवसाय आहे त्यांनी या दिवशी सुट्टी घेतलेली बरी किंवा शेतकरी असतील तर त्यांनी सुद्धा शेतामध्ये नांगरणी कमीत कमी करावी.
जर तुम्ही बोरवेल घेणार असाल, विहिरीचे खोदकाम करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो. त्यामागचे कारण असे आहे की भूमी म्हणजे जमिनीमध्ये नागांची बिळ, वारूळ असतात आणि या सर्व कामातून त्यांच्या घराला नुकसान पोहोचू शकत.
त्यामुळे नाग देवता क्रोधीत होऊ शकतात आणि नागदेवतेच्या शापाने आपल्या जीवनात अनेक बाधा आणि समस्या उद्भवू शकतात आणि म्हणून शेतकऱ्यांनी नांगरणी सारखी ती शक्य तो लांबणीवर टाकावीत.
खरंतर भूमीवर, जमिनीवर या दिवशी कोणत्याही अवजारांचा वापर करू नये. जर तुमच्याकडे पायाभरणीचा कार्यक्रम असेल तर तो करण्यासाठीसुद्धा नागपंचमीचा दिवस अत्यंत अशुभ आहे.
नागपंचमीस कोणत्याही पशूची हत्या करण्यापासून आपण दूर रहावे. कोणत्याही पशूला आपण इजा किंवा हिंसा पोहोचवू नये. याउलट जर शक्य असेल तर आपण नागांना, सापांना अभय द्या.
हे काम इतके पुण्यदायी आहे की जर आपण एखाद्या सापास अभय दिले, जीवदान दिले तर नागदेवतेची कृपा आपल्यावर प्रचंड बरसते. वंश हा कधीच नष्ट होत नाही. सर्पदंश यापासून सुद्धा आपले रक्षण होते.
सनातन हिंदु धर्म शास्त्रानुसार नागपंचमीस आपण काहीही चिरू नये. काहीही कापू नये किंवा तळू नये. अनेक ठिकाणी तर चुलीवर तवा ठेवू नये यासारखेसुद्धा संकेत पाळावयास हिंदू धर्म शास्त्राने सांगितलेले आहे.
सर्वच गोष्टी पाळणं. सर्वच गोष्टींचं पालन करणं कदाचित आपल्याकडून शक्य होणार नाही. मात्र जास्तीत जास्त गोष्टींचं पालन करण्याचा प्रयत्न नक्की करा.
भगवान भोले बाबांची, नागदेवतेची आणि माता पार्वती ची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसो याच मनोकामनेसह धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.