13 ऑगस्ट नागपंचमी.. दोन चमचे दूध असे करा अर्पण, पैशाच्या राशी लागतील.

नमस्कार मित्रांनो,

13 ऑगस्ट शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमी तिथीस आपण नागपंचमीचा सण साजरा करतो. या दिवशी नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. नागदेवतेची कृपा प्राप्त करण्याचा लोक प्रयत्न करतात.

याचे कारण असे असते की नागदेवता प्रसन्न झाल्यास आपल्याला सर्पदंशाचा म्हणजे साप चावण्याचा भय राहात नाही. आपलं आणि कुटुंबियांचं नागदेवता रक्षण करतात आणि सोबतच आपला वंश सुद्धा वाढतो. म्हणून ज्यांना मूलबाळ होत नसेल, संतान सुख नाही अशा लोकांनी नागपंचमीला काही विशेष उपाय नक्की करावेत.

मित्रांनो आज आपण नागपंचमीस करावयाचा अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्यानंतर नाग देवता तर प्रसन्न होतीलच पण भोलेबाबा म्हणजेच प्रत्यक्ष महादेव सुद्धा प्रसन्न होतील.

हा महिना श्रावण महिना आहे. जय भोले बाबांचा महादेवांचा महिना मानला जातो आणि अशा श्रावण महिन्यात केलेला हा विशेष उपाय भोलेनाथाची कृपा नक्की बरसवतो.

आपल्या जीवनातील समस्या, कष्ट, दुःख दूर होतात आणि जर तुमच्या मनात काही इच्छा असतील, मनोकामना असतील तर त्यांचे सुद्धा पूर्ती या उपायामुळे नक्की होते.

जर तुमच्या घरामध्ये गरिबी आहे, दारिद्र्य आहे, पैसा येत नाही किंवा असलेला पैसा वायफळ गोष्टींवर खर्च होतोय, पैसा टिकत नाहीये. तर या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आपण दुधाचा हा छोटासा उपाय करू शकता.

हा उपाय नक्की कसा करायचा आहे आता आपण पाहू या.

तर हा उपाय आपण 13 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी करणार आहोत. ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे किंवा नाग दोष, सर्प दोष आहे तर ते सुद्धा या दोषातून मुक्ती मिळविण्यासाठी हा उपाय करू शकतात.

श्रावण महिन्यामध्ये भोलेबाबा म्हणजेच भोलेनाथ संपूर्ण पृथ्वीलोकावर संचार करत असतात आणि त्यांच्या गळ्यामध्ये आभूषित असतो तो म्हणजे नाग. हि नागदेवता भगवान भोलेनाथ यांच्या गळ्यात शोभून दिसत असते.

जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा सापाची मदत घेण्यात आली होती म्हणून भगवान विष्णु जे जगाचे पालनहार तेसुद्धा शिरसागरात शेष नागावरती विराजमान असतात.

मित्रांनो आज आपण दुधाचा उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला कच्च दूध लागणार आहे. तेसुद्धा फक्त दोन चमचे. कच्चा दूध म्हणजे न तापावलेल, न उकळवलेले. हे दूध जर गाईचे असेल तर उत्तम आहे. नसेल तर इतर प्राण्यांचेही चालेल.

मात्र गोमातेचे दूध हे कोणतेही ज्योतिष कार्य करण्यासाठी प्रभावी मानले जाते. कारण गाईमध्ये 33 कोटी देव वास्तव्य करीत असतात. तर असे केवळ दोन चमचे कच्चे दूध आपल्याला लागणार आहे.

आपण आपल्या घरातील तांब्याभर जल घ्यायचे आहे. आपल्या देवघरात जो आपण तांब्या वापरतो. तांब्याच्या धातूपासून बनवलेला तांब्याभर पाणी घ्या. त्यामध्ये गोमातेचे दोन चमचे कच्चे दुध आपण टाकायचे आहे. त्यानंतर आपण हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे.

आज आपण केवळ नागदेवतेचीच नव्हे तर महादेवांची सुद्धा पूजा करणार आहोत. आपल्या घरामध्ये शिवलिंग नक्की असेल. सर्वात आधी आपण शिवलिंगावर जलाभिषेक करणार आहोत. जलाभिषेक म्हणजे च्या तांब्याभर पाण्यात आपण दोन चमचे दूध टाकले आहे हे जल आपण शिवलिंगावर अर्पण करायचे आहे.

याला आपण रुद्राभिषेक म्हणतो आणि हे जल अर्पण करताना ओम् नमः शिवाय या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. महिलांनी ओम न म्हणता फक्त नमः शिवाय म्हणून जप करायचा आहे.

सोबतच आपण भगवान महादेवांची पूजा करत आहोत म्हणून त्यांना ज्या गोष्टी प्रिय आहेत म्हणजेच बेलपत्र, रंगाची फुले ( केतकी चे फुल सोडून), पंचामृत या वस्तू अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी आणि प्रार्थना करा की आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात.

आपल्या जीवनातील दुःख, कष्ट, समस्या दूर होऊन सुख-समृद्धी लाभावी. त्यानंतर आपण माता पार्वती यांची पूजा करायची. जर माता पार्वती यांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर सुपारी सुद्धा आपण मांडू शकता आणि तेच माता पार्वती यांची प्रतिकृती समजून सुपारीची पूजा करायची.

खरतर जर आपल्याकडे शिवलींग आहे तर शिवलींगा मध्येच भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणेश त्याचबरोबर महादेवाची कन्या असे सगळेच शिव परिवार शिवलिंगामध्ये समाविष्ट आहेत. वेगळे तसबीर, मूर्ती किंवा सुपारी ठेवण्याची गरज नसते.

उंचवट्याचा भाग नसतो तिथे भगवान शिव तर बाजूच्या गोलाकार ठिकाणी माता पार्वती वास करतात. तरी या ठिकाणी हळद-कुंकू वाहून माता पार्वती ची पूजा करावी. सौभाग्याच्या वस्तू अर्पण करावे आणि त्यानंतर आपण नागदेवतेची पूजा करायची आहे.

नागदेवतेची मूर्ती चांदीची, सोन्याची, पितळेची कोणत्याही धातूची चालते. जर नसेल तर आपण पीठ मळून कणकेपासून नागमूर्ती बनवू शकता. जर तेही शक्‍य नसेल तर पाटावरती नाग, नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून केव्हा बाजारात जे फोटो मिळतात त्याची पूजा करू शकतात.

मात्र आपल्याला नागदेवतेला जलाभिषेक करायचा आहे त्यामुळे मूर्ती तयार केलेले चांगले. त्यामुळे मूर्ती तयार करून त्यावर आपण तयार केलेले जलाने जलाभिषेक म्हणजे रुद्राभिषेक करावे.

हे करताना ओम नमः शिवाय हा मंत्र आपण सातत्याने म्हणायचं आहे आणि नाग देवतेला ज्या गोष्टी प्रिय आहेत म्हणजेच अक्षता, सफेद चंदन, सफेद रंगाची फुले, सफेद रंगाची मिठाई अर्पण करावे.

अशाप्रकारे नागदेवतेचा रुद्राभिषेक केल्यानंतर मनोभावे आरती करावी. अगरबत्ती लावा आणि हात जोडून प्रार्थना करा की आपला वंश वाढावा. वंशवृद्धी व्हावी. सर्पदंशाच भय आपल्याला व आपल्या कुटुंबाला नसावं. सुखसौभाग्याची आपल्या जीवनामध्ये बरसात व्हावी.

तरी या नागपंचमीच्या निमित्ताने भगवान भोलेनाथ यांची, नागदेवतेची, पार्वतीची असीम कृपा आपल्यावर व आपल्या परिवारावर बरसो याच मनोकामानेसह धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *