मुलांच्या डोक्यात भवरा असणे काय आहे याचा अर्थ? कसे असते यांचे भविष्य?

नमस्कार मित्रांनो,

बहुतेक व्यक्तींचे डोक्यावर वर्तुळाकार असे चक्र बनलेले असते त्याला आपण भवरा म्हणतो. काही मुलांच्या डोक्यावर घड्याळाच्या दिशेने तर काही मुलांच्या डोक्यावर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने भवरा असतो. काही मुलांचे डोक्यावर दोन किंवा तीन ही भवरे असतात.

मुलांच्या डोक्यावरील हे भवरे पाहुन पूर्वीच्या काळी आई आई आजी विविध निष्कर्ष काढत असत. हा मुलगा असा असेल, हा मुलगा कसा असेल हेच नाही तर त्या मुलाच्या पाठीवर आता मुलगा होईल की, मुलगी हे सुद्धा त्यांना समजत असे. हे कसे काय समजत असावे? हे खरे असते का?

याचे काही शास्त्र नियम आहेत का? चला तर जाणून घेऊया. मुलाच्या डोक्यावर असलेल्या भावाऱ्यांचे शास्त्र. सर्वात आधी जाणून घेऊयात घड्याळाच्या दिशेने असलेल्या भावऱ्याबद्दल. ज्या मुलांच्या डोक्यावर घड्याळाच्या दिशेने वर्तुळाकार भवरा म्हणजे चक्र असते अशी मुले शांतता प्रिय असतात.

ते सर्वांशी मिळून मिसळून आणि समजुतीने वागतात. इतरांची काळजी घेतात. ही मुले जास्त करून आईच्या बाजूने झुकलेली असतात. ही मुले आईची बाजू जास्त घेतात. आईवर यांचे खूप प्रेम असते. ही मुले खूप हुशार असतात. त्यांची बुद्धी खूप तीव्र असते. अभ्यासातही यांचे मन खूप एकाग्र होते.

यांना स्वच्छता व टापटीप नीटनेटकेपणा खूप आवडतो. अशी मुले भविष्यात खूप प्रगती करतात. उत्तरोत्तर ते यशाची शिखरे गाठतात. ज्या दाम्पत्यांना घड्याळाच्या दिशेने भवरा असलेली मुले असतात त्यांना शक्यतो हे दुसरे बाळ ही मुलगी होते. यात काहीही शास्त्रीय आधार नाही परंतु काही तर्क असतात. पूर्वीपासून चालत आलेली असतात.

आणि ते खरेही असतात. यात काही अपवाद असेही असू शकतात परंतु शक्यतो अशा मुलांच्या पाठीवर दुसरी मुलगी होते. असे बहुतेक वेळा पाहण्यात आलेले आहे. आता जाणून घेऊयात ज्या मुलांच्या डोक्यावर घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने भवरा असतो अशा मुलांबद्दल.

ज्या मुलांच्या डोक्यात घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने भवरा असतो अशी मुले ही शांत आणि समजूतदार असतात. अशी मुले आई आणि वडील दोघांवरही सारखेच प्रेम करतात आणि दोघांची बाजू घेतात. ही मुले खूप प्रेमळ असतात तसेच खूप हुशारही असतात. यांनी एकदा जर एखादी गोष्ट ठरवली जर जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ते प्रयत्न करणे सोडत नाहीत.

त्या गोष्टीचा पिच्छा पुरवून ती मिळवतातच. ते स्वतःच्या कष्टाच्या जोरावर खूप प्रगती करतात. त्याबरोबरच अशा मुलांच्या पाठीवर शक्यतो मुलगा होतो. म्हणजे यांना लहान भाऊ होतो असे बहुतेक वेळा दिसून येते. काही मुलांच्या डोक्यावर दोन भवरे असतात. आता जाणून घेऊयात त्या मुलांबद्दल.

ज्या मुलांच्या डोक्यावर दोन भवरे असतात अशी मुले खूप हट्टी आणि खोडकर असतात. त्यांना काही न काही आदळ आपट करण्याची सवय असते. असे म्हणतात की, ज्यांच्या डोक्यावर दोन भवरे असतात त्यांच्या पायातही भवरा असतो की काय? ते भवऱ्यासारखे सतत पळतच असतात. ते एका ठिकाणी शांत बसू शकत नाहीत.

त्यांच्या मनात नेहमी नवनवीन कल्पना जन्म घेत असतात आणि ते त्या कल्पनांना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करताना आई वडिलांची दमछाक करून सोडतात. ही मुले खूप मस्तीखोर असतात. खूप धांदरट, धीट, बिनधास्त अशी असतात. यांचे नेहमी काही ना काही उद्योग चालूच राहतात. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की मुलांच्या डोक्यावर भवरे असतात त्या भवऱ्यांचा काय अर्थ असतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.