मृत्यू येण्यापूर्वी स्वामी देतात हे 6 संकेत…

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक व्यक्तीला मृत्यूपूर्वी हे चार संकेत देतात यमदेव. सृष्टीचे काही नियम असून प्रत्येकाला ते पाळावेच लागतात. मृत्यू सुद्धा त्यांमधील एक आहे. जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू निश्चित आहे.

हे सत्य आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही. परंतु आपला मृत्यू केव्हा होणार याविषयी अगोदर समजू शकते. यम देवाचे दूत प्रत्येकाला मृत्युपूर्वी यम देवाचे चार संदेश पाठवतात. यावरून कोणाचा मृत्यू कधी होणार याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

स्वामी सांगतात यम देवाने त्यांचा भक्त अमृत याला वचन दिले होते की ते प्रत्येक व्यक्तीला मृत्यूपूर्वी चार संदेश देतील. ज्यावरुन लोकांना समजावे की त्यांचा मृत्यू केव्हा होणार आहे. या काळात त्यांनी त्यांची राहिलेली कामे पूर्ण करून घ्यावीत.

यमदूत आणि भक्त अमृतची कथा पुढीलप्रमाणे. प्राचीन काळी यमुना नदीच्या काठावर अमृत नावाचा एक व्यक्ती वास्तव्यास होता. तो यम देवाची दिवस-रात्र पूजा करत. कारण त्याला मृत्यूची भीती होती. यमदेव अमृतच्या भक्तीवर प्रसन्न झाले.

आणि त्यांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले. यमदेवाचे शब्द ऐकून अमृतने त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान मागितले. त्याचे वरदान ऐकल्यानंतर यमदेवाने त्याला समजावून सांगितले की जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावे लागते.

याला कोणताही मनुष्य काढू शकत नाही. यानंतर अमृतने यम देवाकडे मागणी केली की मृत्यूला टाळणे शक्य नसेल तर मग मृत्यू कमीत कमी माझ्या जवळ आल्यावर मला त्या विषयी माहिती व्हावी. ज्यामुळे माझ्या कुटुंबीयांची पूर्ण व्यवस्था करू शकेन.

यानंतर यमदेवाने अमृतला वचन दिले की मृत्युपूर्वी तुला सूचना मिळेल. त्याला सांगितले की तुला मृत्यू चा संकेत मिळाल्यानंतर तू लगेच या संसाराचा निरोप घेण्याची तयारी करून ठेव. त्यानंतर यम देव अदृश्य झाले. या मुळे अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही दिलेल्या वचनामुळे अमृत विलासत्य जीवन जगत होता.

आता त्याला मृत्यूची काहीही भीती नव्हती. हळूहळू त्याचे केस पांढरे होऊ लागले. काही वर्षानंतर त्याचे दात पडले. नंतर त्याची दृष्टी क्षीण झाली. त्याला यम देवांकडून कोणताही संदेश मिळाला नव्हता. अशीच काही आणखी निघून गेली आणि तो आता अंथरुणातून उठून ही बसू शकत नव्हता.

परंतु मनातल्यामनात त्याने यमदेवाचे आभार मानले होते की अजूनही त्याला मृत्यूचा कोणताही संदेश मिळाला नव्हता. असे जीवन जगत असताना तो एके दिवशी घाबरला. कारण त्याच्याजवळ यमदूत उभे राहिले होते.

त्याने घाबरून घरात यमदेवाचे पत्र शोधण्यास सुरुवात केली. परंतु त्याला कोणतेही पत्र सापडले नाही. आणि त्याने यमदेवावर धोका दिल्याचा आरोप लावला. तेव्हा यमदेवाने त्याला नम्रतेने उत्तर दिले की मी तुला चार संदेश पाठवले होते परंतु तू तुझ्या लोभ पूर्ण जीवनशैलीमुळे आंधळा झाला होतास.

तुझे केस पांढरे झाले हा पहिला संकेत. दात पडणे हा दुसरा संदेश होता. दृष्टी क्षीण झालेला तिसरा संदेश होता आणि तुझ्या शरीराचा संपूर्ण अवयवांनी काम करणे बंद केले हा चौथा संदेश मी तुला दिला.परंतु तुला यामधील एकही संदेश समजला नाही.

मित्रांनो, अश्याप्रकारे यमदेव हे संदेश देत असतात.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.