मृत व्यक्ती स्वप्नात येणे काय आहेत संकेत? जाणून घ्या ७ संकेत.

नमस्कार मित्रांनो,

आपल्या जवळची एखादी मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात दिसली तर आपण घाबरतो. आणि या स्वप्नाचा काय अर्थ असेल ही व्यक्ती आपल्या स्वप्नात का आली असेल असा विचार करत राहतो. स्वप्न शास्त्रात अशा विविध स्वप्नांचा आणि त्यामागील कारणांचा उल्लेख दिलेला आहे. आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला तर ही गोष्ट आपल मन लवकर मान्य करत नाही. त्याच्या जाण्याने आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.

पण कधी कधी अशा व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात आणि आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. ते स्वप्नात येऊन आपल्याला कसलेतरी संकेत देत असतात. आपल्या आयुष्यातील येणाऱ्या पुढील घटनांबद्दल ते काहीतरी सांगत असतात. पुढे येणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी शुभ आहेत की अशुभ हे देखील आपल्याला ते स्वप्नांद्वारे सांगत असतात. ते संकेत काय आहेत ते आज आपण जाणून घेऊयात.

मृत व्यक्ती आपल्याला स्वप्नात नग्न अवस्थेत दिसली किंवा तिच्या पायात चप्पल नसतील किंवा ते भुकेले आहेत असे स्वप्नात दिसले तर आपण समजून घ्यायला हवं की ते आपल्याकडे कोणत्यातरी वस्तूची मागणी करत आहेत. म्हणूनच अस स्वप्न तुम्हाला कधी पडलं तर त्या स्वप्न नुसार ती वस्तू एखाद्या ब्राह्मण देवतांना दान करावी. किंवा एखाद्या गरजवंताला ती वस्तू दान करावी. नाहीतर एखाद्या मंदिरात जरी अशा वस्तू दान केल्या तरी चालेल.

दान करताना मनोमन अशी इच्छा व्यक्त करा की हे जे दान करत आहे ते माझ्या मृत पूर्वजांपर्यंत नातेवाइकांपर्यंत जावं. आणि त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. गंभीर आजाराने आपला एखादा नातेवाईक किंवा आप्तेष्ट ही मरण पावले असतील आणि ते जर आपल्या स्वप्नात तंदुरुस्त हसते खेळते दिसले तर या स्वप्नाचा अर्थ समजून घ्यायचा की जाणारा व्यक्ती हा सुखरूप आहे आणि त्यांचा पुनर्जन्म खूप चांगल्या ठिकाणी झालेला आहे.

आणि त्यांना आपल्याला सांगायचे असते की माझ्या बद्दल जास्त विचार करून दुःखी होऊ नका. स्वप्न शास्त्रात अशा स्वप्नांना आश्र्वासित स्वप्न असे नाव दिलेले आहे. याउलट एखाद्या स्वस्थ व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल आणि तो आपल्याला स्वप्नात आजारी पडलेला दिसत असेल तर मृत व्यक्तीची काहीतरी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे. जे तो आपल्याला सांगत आहे. त्यावेळी आपण अशा स्वप्नांचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे.

मरणाच्या आधी अशा व्यक्तींच्या काही प्रबळ इच्छा, स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत का? हे आपण शोधून काढायला हवे. तुम्हाला जर त्यांच्या अशा अपूर्ण इच्छा माहिती असतील तर तुम्ही त्या त्वरित पूर्ण करायला हव्या. याने त्या मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते. आणि आपल्या घरालाही सुख शांती मिळते. एखाद्या जिवंत व्यक्तीचा स्वप्नात जर आपल्याला मृत्यू दिसला तर अशा व्यक्तीचे आयुष्य हे खूप जास्त असते. असे स्वप्न दीर्घायुष्यासाठी सूचक मानले पाहिजे.

स्वप्नात कधी कधी आपले पूर्वज येतात. ते जर आपल्याशी बोलत नसतील उदास असतील तर त्या स्वप्नाचा अर्थ होतो की आपल्या हातून काही कार्य घडणार आहे जे त्यांना पसंद नाही अशा वेळी ते कार्य आपण करु नये असे त्यांना वाटते. पण स्वप्नात येऊन त्यांनी आपल्याला हसतमुखाने आशीर्वाद दिला तर आपण जे कार्य हाती घेतलेले आहे त्यापासून ते आनंदित आहेत आणि त्या कार्यात आपल्याला १००% यश मिळणार असे समजावे.

एखादा स्वर्गवासी व्यक्ती आपल्याला स्वप्नात उंच आणि आपल्यापासून खूप दूर गेलेला दिसत तर अशा स्वप्नाचा अर्थ होतो की त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती झालेली आहे. आणि तोच स्वर्गवासी व्यक्ती आपल्याला घरात दिसत असेल घराच्या आसपास वावरताना दिसत असेल तर समजून घ्या की तो व्यक्ती घराच्या मोहापासून अजूनही सुटलेला नाही. अजूनही आपल्या परिवाराला आपल्या छत्र छाये खाली ठेवू इच्छित आहे.

<
अशा प्रकारचे स्वप्न जर तुम्हाला पडलं तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पित्र शांती करायला हवी. पितरांच्या तृप्ती निमित्त गायींना, ब्राह्मणांना, गरजूंना अन्नाच, वस्तूच दान करायला हवे. याने आपल्या पितरांची शांती होते. अशा प्रकारे विविध स्वप्नांचा अर्थ समजावून घेऊन आपण कार्य करायला हवं. अशा स्वप्नांना घाबरून न जाता या संकेत चा योग्य अर्थ आपण समजून घ्यायला हवा.

स्वप्नांत आपले पूर्वज वारंवार येत असतील त्यांची मुक्ती झालेली नाही हे समजून घ्यायला हवं. त्यांच्या मुक्तीसाठी भगवत गीतेतील अठरा अध्याया पैकी कोणत्याही एका अध्यायाचे रोज वाचन करायला हवे. किंवा श्रीमद् भागवत कथेचा पाठ करायला हवा. ज्याने त्यांना मोक्ष मिळेल. आणि तुम्हालाही सुख समृद्धी लाभेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.