मिथुन राशीचे वार्षिक राशिभविष्य २०२२

नमस्कार मित्रांनो,

मिथुन राशीचे वार्षिक राशिभविष्य म्हणजे राशिफळ. मिथुन ही सुस्वभावी रास आहे, तिचा स्वामी ग्रह बुध आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती अत्यंत बुद्धिवान असतात. स्वतंत्र विचारासरणीच्या असतात. प्रेमळ असतात. प्रतिभासंपन्न असतात. प्रेमात काहीही करायला त्या नेहमीच तयार असतात.

प्रेमाच्या ताकदीवर कोणतेही कार्य अगदी रहस्यमयरीत्या त्या पूर्ण करतात. मात्र ह्याचा एक दुर्गुण आहे. क्षणात क्रोधित होतात तर क्षणात शांत होतात. त्यांना समजून घेणे कठीण जाते. समाजात लोक खूप त्यांना पसंद करतात. लोकांना या मिथुन राशीच्या व्यक्ती खूप आवडतात.

लोकांना खुश कसे ठेवायचे हे मिथुन राशीच्या जातकांना अचूक ठाऊक असते. यांचा स्वामी ग्रह बुध असल्याने, परिवर्तन म्हणजे बदल हा यांच्या जीवनाचा प्रमुख नियम आहे. ते एका ठिकाणी कधीच स्थिर राहत नाही. हजरजबाबी असतात. या व्यक्तीची भाषा मधुर असते.

कितीही बिकट परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता हया मिथुन राशीमध्ये अगदी पुरेपूर असते.

आता पाहू, 2022 वर्ष मिथुन राशीसाठी कसे असेल. आर्थिक परिस्थिती कशी असेल. धनलाभाचे प्रचंड योग येणार आहेत. आणि म्हणूनच जास्त विचार न करता आपण आपल्या कामावरती लक्ष केंद्रीत करा. खूप चांगल्याप्रकारे धनलाभ होणार आहे.

दुसरी गोष्ट एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या चार महिन्यांत तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक धनलाभ नक्की होणार आहे. संपूर्ण वर्षभरात पैसा कमी पडणार नाही. नोकरीवाल्याना बढतीच्या संधी येतील. मात्र या काळात जमीन, मालमत्ता, संपत्ती, वाहन या बाबतीत हया गोष्टी आपल्याकडे आधीच आहेत.

ह्या गोष्टी तुम्ही अगोदरच उपभोगत आहात, त्या सुखामध्ये अधिक वाढ होणार आहे. 2022 मध्ये खर्च वाढेल परंतु तो मंगलकार्य आणि शुभ कार्यामध्ये. थोडक्यात 2022 वर्षामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे.

दुसरी गोष्ट करिअर किंवा शिक्षणाच्या बाबतीत थोडीशी मानसिक अस्थिरता 2022 या वर्षामध्ये जाणवेल. कामे उशिराने होतील. कामे पूर्ण होतात की नाही अशाप्रकारची शंका तुम्हाला येऊ लागेल. थोडासा तणाव वाढेल. मात्र आपला जो स्वभाव आहे, आपण जे लोकांशी चांगले प्रकारे वागता.

<
आपला व्यवहार जो चांगला आहे त्या प्रभावशाली शक्तीने तुम्ही ती सर्व संकटे दूर करण्यात यशस्वी ठराल. या काळात तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यांच्याकडून जबरदस्त प्रकारचे आव्हान तुमच्यापुढे उभे राहू शकते. कष्टामध्ये कमी पडू नका.

2022 वर्षामध्ये तुम्ही जर नवीन काम सुरू करत असाल. म्हणजे नवीन व्यवसाय वगेरे तर अवश्य करा. जुलैनंतर नवीन काम करण्यास चांगले योग आहेत, जुलै ते डिसेंबर या महीन्यामध्ये. जे लोक नोकरदार आहेत त्यांचे वरीष्ठ अधिकाराशी मतभेद होऊ शकतात. मात्र त्यांच्या नोकरीकामावर काही परिणाम होणार नाही.

विद्यार्थ्याचे विदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. जे विद्यार्थी स्पर्धापरीक्षामध्ये प्रयत्न करत आहेत त्यांना एप्रिल महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यानंतर यश प्राप्तीचे योग आहेत. 2022 वर्षामध्ये कौटुंबिक परिस्थिती कशी असेल. तर 2022 वर्ष कौटुंबिक जीवन हे शुभ आणि प्रगतीशील असेल.

नवविवाहित दांपत्यांना संतान प्राप्तीचे योग आहेत. समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. मोठे एखादे पद मिळू शकते. भावंडाबरोबर थोडे वादविवाद होऊ शकतात. परंतु जर स्वतःवर नियंत्रण ठेवले तर जे काही जुने वाद आहेत ते मिटू शकतील.

आपल्या आईवडिलांच्या आरोग्यावर थोडे लक्ष दया. घरामध्ये काही मंगलकार्य आयोजित होवू शकतात. आता 2022 वर्षामध्ये आरोग्य. तर 2022 मध्ये आरोग्य ठीकठाक आहे. मात्र रोगांमध्ये कमतरता येईल. 2021 वर्षामध्ये ज्या काही आरोग्याच्या समस्या होत्या त्या यावर्षी कमी होतील.

मात्र लठ्ठपणा, वजन वाढणे, निद्रानाश, पोटाचे आजार, अपचन यासारख्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण वर्षभर त्रास देऊ शकतात. एप्रिलपर्यंत गंभीर दुखापतींचा योग दिसून येत आहे. मात्र घाबरून जाऊ नका. काळजी नक्की घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. महत्वपूर्ण कामे खराब होतील. मानसिक त्रास होईल.

श्वसनासंबंधी आजार असतील, कसलीही एलर्जी असेल, फुफुसासंबंधी यासारखे आजार असतील. तर त्याकरीता काही व्यायाम आहेत, योगासने, ध्यानधारणा आहेत त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे, मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी एक उपाय सांगत आहे.

संपूर्ण 2022 वर्षभरात आपण यशप्राप्तीसाठी, फलप्राप्तीसाठी भगवान श्री गणेशाचे पूजन करा. दररोज 108 वेळा “ओम गण गणपतये नमः” या मंत्राचा जप करा. दररोज हा जप केल्याने गणेशाच्या कृपेने ज्या ज्या काही समस्या सांगितल्या त्या सर्व समस्याचा मार्ग आपणास नक्की सापडेल.

सोबतच कोणत्याही बुधवारी आपण पक्षांची एखादी जोडी ही पिंजऱ्यातून मुक्त करा. हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. तसेच, आपल्या घरातील किंवा नात्यातील जेष्ठ महिलांना एखादी हिरव्या रंगाची वस्तू भेट स्वरूपात द्या. त्यामुळे आपल्या ग्रहातला जो स्वामी आहे तो मजबूत बनतो.

मित्रांनो, मिथुन राशीमध्ये प्रचंड क्षमता आहे प्रगती करण्याची. पण त्या व्यक्तीनी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे, दुसरी गोष्ट म्हणजे आपला निर्णय हा अचूक आणि ठाम ठेवा आणि जास्त विचार करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करा. 2022 वर्षामध्ये ह्या काही गोष्टीकडे मिथुन राशीच्या व्यक्तींनी पालन करावे. तर यश आपल्यापासून दूर नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *