नमस्कर मित्रांनो,
आपल्या आयुष्यात मिठाचे काही खास उपयोग आहेतमीठ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मीठ जर एखाद्या पदार्थांमध्ये जास्त झाले तर तो पदार्थ चांगला लागत नाही. याउलट पदार्थ अळणी झाला असेल तरी तो बेचव लागतो. मिठामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभते. तर मिठामुळे आपले आयुष्य कमीही होते.
मिठाचा उपयोग कसा करावा हे खूप कमी लोकांना माहीत असते. आपल्या जीवनात काही अडचणी येत असतात आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी मिठाचे काही खास उपयोग जाणून घ्या. मीठ अनेक प्रकारचे असते उदाहरण सैधव मीठ, काळ मीठ, समुद्र मीठ आणि सामान्य मीठ. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि सूर्य यांचे प्रतीक मानले जाते.
मिठाला काहीजण राहूचे प्रतीकही मानतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर मिठाला स्टीलच्या किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर तिथे शनी व चंद्राची एकत्रीकरण होते. हे आपल्यासाठी खूपच घातक सिध्द होईल. जो शुभ प्रभाव देत नाही आणि हे क्लेश कारणही बनेल. मिठाला प्लॅस्टिकच्या बरणीतही ठेवू नये.
मिठाला फक्त काचेच्या बरणीत ठेवले तरच त्याचा वाईट प्रभाव जाणवत नाही. मीठ सांडलेलेही अपशकून समजले जाते. मीठ पडले तर चंद्र आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात. स्वयंपाक करतानाही मीठ कमी झाले असेल, तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु, स्वयंपाक करताना पदार्थ चाखून पाहू नये, त्यामुळे दारिद्र्यता येते.
देवाला नैवद्य दाखविल्याशिवाय जेवू नये, काही खाऊ नये. तसेच मीठ डायरेक्ट कोणाच्या हातावर देऊ नये. मिठाची पुडीदेखील डायरेक्ट देऊ नये त्यामुळे चांगले संबंध खराब होतात. मित्रांनो, आज आपण मिठाचे काही खास उपयोग जाणून घेऊया. जर तुमच्या घरात काही अडीअडचणी येत असतील तर तुम्ही हे उपाय करा. त्यामुळे दरिद्रीता निघून जाईल. लक्ष्मीची कृपा राहील.
सर्वात पहिले तुम्ही काळे मीठ घ्यायचे आहे. ते मीठ एका लाल कापडात ठेऊन त्याची गाठोडी तयार करायची आहे. आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून ठेवा. तुमच्या घरात येणारी नकारर्थी ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. याशिवाय का मिठाची गाठोडी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवाल तर तुमच्या पैशांत वाढ होईल.
यामुळे तुमच्या तिजोरीवर देवी लक्ष्मीचा वास राहील. तसेच घरात सुखशांतीचे वातावरण राहील. असे केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणीही दूर होतील. तसेच एक काचेची बरणी घेऊन त्यात मीठ भरायचे आहे. आणि ती बाटली बाथरूममध्ये ठेवायची आहे. त्यामुळे बाथरूममधली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल.
तसेच जीवजंतूपासून देखील संरक्षण होईल. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे की काच आणि मीठ हे दोन्ही राहुचे कारक आहेत. मिठाला जर तुम्ही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर तिथे चंद्र आणि शनी यांचे मिलन झाल्याने नुकसानदायक झाल्याचे सिध्द होते.
<
म्हणून मीठ नेहमी काचेच्या बरणीतच ठेवावे. मित्रांनो, जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्या व्यक्तीचे मीठ कधीच खाऊ नये. जर कोणी वाईट मनोवृत्तीची पापी व्यक्ती असेल तर त्याचे मीठ कदापि खाऊ नये. अन्यथा तुमच्या स्वभावातही त्याचे गुणदोष दिसून येतात. घरातील दारिद्र्यता दूर करण्यासाठी आठवड्यातून फरशी पुसताना जाड समुद्री मीठ पाण्यात टाकून या पाण्याने फरशी पुसावी.
यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते. वातावरणही पवित्र होते. यामुळे लक्ष्मीचा घरात वास होईल आणि धनधान्यात बरखत येईल. त्याचप्रमाणे दृष्ट उतरवणारा खास उपाय जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला एखाद्याची दृष्ट लागली असेल तर एक चिमुटभर मीठ घेऊन त्याच्यावरून उतरवून वाहत्या पाण्यात ते मीठ टाकावे.
त्यामुळे नजरदोष निघून जातो. व्यक्तिगत बाधेसाठी एक मूठभर मीठ घेऊन सायंकाळी ते आपल्या अंगावरून तीन वेळा उतरवून बाहेर टाकून दयावे. असे तीन दिवस सारखे करावे. याचा नक्की फरक वाटेल. वास्तूदोषातही मिठाचे महत्त्व सांगितले आहे. काही वास्तूदोष आपण दुरुस्त करू शकत नाही.
आणि त्यामुळे मनदेखील भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते. अशावेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे. आणि मग ते मीठ वॉश बेसिनमध्ये टाकून देवून नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून दयावे. यामुळे आपल्या घरातील जो काही दोष असेल त्या पाण्याबरोबर वाहून जाईल. धनप्राप्तिसाठीही मिठाचे काही चमत्कारीक उपाय आहेत.
मिठाला काचेच्या बरणीत ठेवावे आणि त्यात दोन चार हिरवे वेलदोडे, लवंगा टाकून ठेवाव्यात. असे केल्याने पैशांची आवक वाढते व घरातील बरखतही वाढते. या उपायाने मिठाला सुगंधही येईल याशिवाय धनाची कमतरताही भासणार नाही. आता पाहूया काही रोगांवर मिठाचे काही खास उपाय. रात्री झोपताना आपली उशी पूर्वेकडे असावी. एका वाटीत सैंधव मीठ घेऊन ते आपल्या झोपण्याच्या खोलीत ठेवावे.
त्यामुळे आरोग्य चांगले राहील. जर कोणी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्याच्या उशीजवळ एका काचेच्या वाटीत मीठ ठेवावे आणि दर आठवड्याला बदलावे. हळुहळू त्या रुग्णात फरक जाणवायला लागेल. तसेच शनीच्या दृष्ट प्रभावापासून वाचण्यासाठी काही खास मिठाचे उपाय. जेवण करत असताना भाजीत काही मीठ कमी असेल तर वरून मीठ टाकून खाऊ नये.
खूपच आवश्यक असेल तर मिठाऐवजी सैंधव मीठ किंवा काळी मिरची पूड तुम्ही वापरू शकता. यामुळे तुम्ही शनीच्या दृष्ट प्रभावापासून वाचू शकता. असे न केल्यास तुमच्या घरात दारिद्र्यता कायम राहील. तुम्ही निरोगीही राहणार नाही. मित्रांनो, हे होते मिठाचे काही खास उपाय.
हे उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व दोष निघून जातील आणि तुमच्या घरात मातालक्ष्मीचा सदैव वास राहील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.