नमस्कार मित्रांनो,
जीरे, ओवा हे मसाल्याचे पदार्थ जसे आपण वारंवार किंवा आठवणीने खातो, तसे आठवणीने मिरे किंवा काळी मिरी खाणं खूप कमी जणांच्या लक्षात राहतं.. मसालेदार, चमचमीत पदार्थांचा बेत केला जातो, तेव्हाच मिऱ्यांची हमखास आठवण येते. मीरे उष्ण प्रकृतीचे असल्याचे त्यांचे अति सेवनही योग्य नाही. पण आहारात योग्य प्रमाणात मिऱ्यांचा वापर नियमितपणे असलाच पाहिजे. कारण आपल्या स्वयंपाक घरातला हा छोटासा पदार्थ भलताच उपयुक्त आहे.
ठळक मुद्दे
मिऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांवर मिरे नैसर्गिक ॲण्टीबायोटिक म्हणून काम करतात.
मिरे खाण्याची योग्य पद्धत – कधीकधी एखाद्या मसालेदार पदार्थाच्या फोडणीत आपण चवीपुरते 3-4 मिरे टाकू शकतो. पण मिरे खाण्याची योग्य पद्धत म्हणजे त्यांची पावडर करणे आणि त्यानंतर ती वेगवेगळ्या पदार्थात टाकणे.- सध्या उन्हाळ्यात मिरे खायचे असतील तर तुम्ही ते चहा पावडरमध्ये टाकून खाऊ शकता. – पन्हे, ताक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उन्हाळी सरबतामध्ये मिरेपूड चांगली लागते.- टरबुजांच्या फोडींवरही चाट मसाला किंवा काळेमीठ टाकून त्यासोबत मिरेपूड टाकली तर छान चव येते.
उन्हाळ्याच्या दिवसांत कैरीचे तात्पुरते लोणचे आपण बऱ्याचदा करतो. या लोणच्यात मिरेपुड आवठवणीने टाका. लोणचे अधिक चवदार तर होईलच पण यानिमित्ताने काळे मिरे खाल्लेही जातील.- सकाळी उठल्यावर लिंबू- मध- पाणी असं डिटॉक्स ड्रिंक घेत असाल तर त्यातही चिमुटभर मिरेपुड टाकायला हरकत नाही.- कोणत्याही प्रकारचे सूप करताना त्यात मिरेपूड टाकल्यास चव अधिक छान लागते.
मिरे खाण्याचे फायदे 1) अपचन उन्हाळ्यात अनेकदा जेवण जात नाही. काही खाल्लेले नसले तरी पोट भरल्यासारखे वाटते. किंवा अपचनाचा त्रास वारंवार जाणवतो. असा अपचन, ॲसिडिटीचा त्रास दुर करण्यासाठी मिरे उपयुक्त ठरतात. मिऱ्यांमुळे आतड्यातील हायड्रोक्लोरिक ॲसिडचे सिक्रिशन संतुलित केले जाते आणि त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यास मदत होते.
2) रोगप्रतिकारक शक्ती वाढते मिऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांवर मिरे नैसर्गिक ॲण्टीबायोटिक म्हणून काम करतात.
3) रक्तदाब नियंत्रण – दिलेल्या माहितीनुसार मीरे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. मिऱ्यांमध्ये असणारे पोटॅशियम शरीरातील सोडीयमची मात्रा संतुलित ठेवतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
4) शरीर करते डिटॉक्स – शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक पदार्थ उपयुक्त ठरतात. या प्रक्रियेला डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतात. त्यामुळेच सकाळी रिकाम्या पोटी डिटॉक्स ड्रिंक पिणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे. मिरे देखील शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी उपयुक्त ठरतात.
5) वेटलाॅस – मिऱ्यांमध्ये असणारे घटक खाल्लेल्या अन्नपदार्थांचे व्यवस्थित पचन घडवून आणतात. त्यामुळे शरीराची चयापचय क्रिया सुरळीत होते. यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहत नाही आणि वेटलॉस किंवा वेट कंट्रोलसाठी निश्चितच मदत होते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.