नमस्कार मित्रांनो,
मेथीच्या दाण्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करता का? मेथीच्या दाण्यांचा उपयोग तुमची त्वचा आणि केसांसाठी कसा करायचा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या लेखात आपण मेथीच्या दाण्यांचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी कसा करायचा ते पाहणार आहोत.
मेथीच्या दाण्यांचे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की पहा. मेथीमुळे केस गळणे, केस तुटण्याची समस्या सुद्धा कमी होते. मेथी फेस पॅक मुळे चेहऱ्यावरील इचिंगची लक्षणं असतात ती सुद्धा कमी होतात. मेथीमध्ये असलेले अँटी ऑक्सीडन्ट, रींकल, मॉइश्चायझिंग आणि त्वचा मऊ करण्यासाठी उपयुक्त असलेले पोषक तत्व खूप फायद्याचे आहेत.
या मेथीच्या दाण्यांमुळे आपल्या चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. मेथी यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकते. आणि रक्त शुद्ध करायला मदत करते. दररोज मेथी पाण्यात भिजवून तुम्ही खाऊ शकता.
मेथीच्या दाण्यांचा उपयोग चेहऱ्यावर कसा करायचा? एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी बियांमध्ये दही आणि बेसन घालून मिक्स करा. आणि ती तुमच्या त्वचेवर लावा. मेथी त्वचेला ॲक्स्पोलियट करून त्वचा उजळवायला मदत करते.
डार्क सर्कल्स: अपुरी झोप, ताणतणाव, सतत कॉम्प्युटर समोर बसून डोळ्यांवर दुष्परिणाम होतात. त्यामुळे डोळे सुजणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होणे यांसारखे प्रॉब्लेम्स तयार होतात. डाग सर्कल्स मुळे आपल्या सौंदर्यात बाधा येऊ शकते. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर तुम्ही नक्की करू शकता.
यासाठी दोन चमचे मेथीचे दाणे भिजत ठेवा. दाणे नीट भिजल्यानंतर ते दुधामध्ये वाटून घ्या. जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्ही आपल्या डोळ्यांखाली लावा. आणि सुकल्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून टाका.
सुरकुत्या: मेथीमधील पोषक घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. दह्यात मेथी पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा घरगुती उपाय करून पहा.
निस्तेज त्वचा तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्याची समस्या असेल ती सुद्धा यामुळे दूर होईल. दह्यामध्ये त्वचा मऊ होते आणि नैसर्गिक स्वरूपातील मॉइश्चरायझर आपल्या त्वचेला मिळते.
मुरुमांची समस्या : मेथीमध्ये अँटी इंफ्लिमेंटरी, अँटी बॅक्टरील गुण असतात यामुळे आपल्या त्वचेला मॉइश्चरायझर मिळते. त्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कमी होते. चेहऱ्यावरील मुरुमे दूर करण्यासाठी मेथीचे दाणे गरम पाण्यामध्ये उकळल्यानंतर थंड करा.
त्याची पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यासाठी टोनर स्वरूपात वापरा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या कमी व्हायला मदत होईल. पण जर का तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर तुम्ही हा उपाय करू नका.
याशिवाय अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रात्री एक चमचा मेथीचे दाणे भिजत घालून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपाशी पोटी प्या. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत व्हायला मदत होईल.
मेथीच्या दाण्यांचा उपयोग केसांवर कसा करायचा ते पाहूया: पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय. लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली वाढली आहे. केस पांढरे होऊ नयेत यासाठी मेथीच्या दाण्यांचा आपल्या हेअर केअर रूटीन मध्ये समावेश करून घ्या.
मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणतत्वांचा समावेश असतो. त्यामुळे आपले केस पांढरे होत नाहीत. मुठभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचा समावेश आपल्या आहारात करा. पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल पण पुन्हा एकदा ऐका तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर आधी तज्ञांचा सल्ला घ्या. आणि मगच हा उपाय करा.
केस तुटणार नाहीत: मेथीचे दाणे व्हिटॅमिन आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहेत. हे घटक आपल्या केसांसाठी खूप आवश्यक असतात. मेथीची पावडर आणि नारळाचे तेल मिक्स करून केसांना लावा.
अंघोळ करण्यापूर्वी हा उपाय करा. केसांना आणि टाळूला हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर केस कोमट पाण्याने धुवून टाका. नारळाचे तेल आणि मेथी मुळे केस मजबूत होतात.
कोंड्यापासून सुटका: मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. मेथीचे दाणे केस मॉइश्चरायझर करतात. मेथीची पेस्ट केसांना लावली तर कोंड्याचा त्रास कमी होतो. मेथीची पेस्ट लावणे तुम्हाला आवडत नसेल तर मेथीच्या पाण्याने केस धुऊ शकता.
या पद्धतीने मेथीच्या दाण्यांचा वापर आपल्या ब्युटी केअर रूटीन मध्ये करा. त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय तुम्ही करू शकता. पण तुम्हाला कोणतीही शंका असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.