नमस्कार मित्रांनो,
गाईच्या पायाखालची माती अत्यंत पवित्र समजली जाते. आज याच मातीचा एक महाउपाय आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्या नंतर जीवनामध्ये सुख समृद्धी मध्ये वाढ होईल. सांसारिक सुखांमध्ये वाढ होईल.
ज्यांच्या जीवनामध्ये विवाह समस्या आहेत, विवाह जुळत नाहीयेत त्यांनी तर हा उपाय अवश्य करावा.
ज्या विवाहित जोडप्यांना संतान सुखाची प्राप्ती होत नाहीये त्यांच्यासाठी हा अत्यंत महाउपाय आहे. ज्या घरातील गृह लक्ष्मीला त्रास सहन करावा लागतो मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल तर घरातल्या अश्या महिलांनी सुद्धा हा उपाय अवश्य करा. शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपली मुक्ती होईल.
ज्या लोकांची कमाई भरपूर आहे, भरपूर पैसे कमावतात मात्र त्या पैशाचा भोग घेता येत नाही, त्या पैशाचा वापर स्वतःसाठी, कुटुंबियांसाठी करता येत नाही, राब राब राबून कमावलेला पैसा हा सुखासाठी वापरता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही अशा लोकांनी सुद्धा गोमातेच्या पायाखालच्या मातीचा हा महाउपाय अवश्य करून पाहावा.
मित्रांनो हा उपाय केल्याने आपली मानसिक शांतता कित्येक पटीने वाढते. मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. जे लोक अगदी रात्रंदिवस मशीन प्रमाणे काम करत आहेत, पैसे सुद्धा भरपूर येत आहेत मात्र त्या पैशाचं योग्य वापर होत नाहीये. तर अशा सर्वांसाठी हा एक महाउपाय आहे.
मित्रांनो असं म्हणतात ज्या घरासमोर दररोज गाय हंबरते त्या घरामध्ये सुख शांती नक्की लाभते. काही जण शहरात राहत असल्यामुळे गायीचे पालन करणे शक्य होत नाही त्यावेळेस अनेक संस्था अशा आहेत ज्या गोमातेचे पालन करतात त्या ठिकाणी जाऊन देणगी तुम्ही देऊ शकता.
आठवड्यातील कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. त्यातल्या त्यात एकादशी पासून जर या उपायाला आपण प्रारंभ केला तर मित्रानो अत्यंत शुभफळ प्राप्त होतात.
आपण आपल्या घराजवळ असलेल्या कोणत्याही गोमातेजवळ जायचं आहे, जाताना आपल्या घरात बनवलेली पहिली चपाती किंवा भाकरी असेल ती घेऊन जायची आहे.
घरातील गृहिणीस सांगावे कि पहिली रोटी जी बनवत आहेस ती गोमातेच्या नावानेच बनव. लक्षात घ्या त्या गृहिणीच्या मनामध्ये सुद्धा गोमातेबद्दल आदर असणे जरुरी आहे.
आपण गोमातेची हि चपाती बनवत आहोत अशी शुद्ध भावना त्या महिलेच्या मनात असावी.
ती पहिली बनवलेली रोटी किंवा भाकरी घेऊन जायचं आहे आणि उजव्या हाताने त्या गोमातेस भरवायची आहे. जेव्हा गोमाता हि रोटी खात असेल तेव्हा तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचा आहे.
त्यानंतर मनोभावे गोमातेसमोर हाथ जोडायचे आहेत, आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या बोलून दाखवायच्या आहेत.
नंतर त्या गोमातेच्या कोणत्याही पायाखालची केवळ मूठभर माती घ्यायची आहे. मित्रांनो हि जी माती आहे ती पवित्र माती आहे, हा उपाय करताना मनामध्ये कोणतीही शंका नसावी.
तर हि माती घेऊन आपण आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्या नंतर जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर अत्यंत उत्तम होईल. त्या गंगाजलामध्ये मातीचा चिखल बनवायचा आहे.
गंगाजल नसेल तर कुठल्याही नदीचे पाणी चालेल. तेही नसेल तर कोणतेही शुद्ध जल वापरू शकता. पुढे चिखल झाल्यानंतर त्याचे जेवढे बनतील तेवढे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत नंतर हे गोळे सुकवायला ठेवायचे आहेत.
रात्री झोपताना ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या समस्या आहेत त्या व्यक्तीच्या उशीखाली किंवा बेडखाली आपण हे गोळे ठेवायचे आहेत.
एखाद्या पेपर मध्ये किंवा प्लास्टिक मध्ये गुंडाळून ठेवू शकता. शक्यतो प्लास्टिकचा वापर करू नका. बरेच जण वर्तमानपत्राचा सुद्धा वापर करतात पण तसे करू नका.
सफेद रंगाचा एखादा कोरा पेपर त्यासाठी योग्य राहील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उठल्यानंतर तुम्ही स्नान करा, देवपुजा करा त्या नंतर घराजवळील पिंपळाच्या वृक्षाकडे जायचं आहे.
जाताना तांब्याभर जल आणि केलेले गोळे घेऊन जायचे आहेत. नंतर तांब्याभर जल पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचं आहे आणि ते गोळे सुद्धा पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचे आहेत.
मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पुन्हा एकदा बोलून दाखवायच्या आहेत.
नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 3 वेळा करायचा आहे. त्यामुळे या उपायच फळ कित्येक पटीने वाढत. गोळे ठेवून झाल्यानंतर आपण घरी यायच आहे आणि आपली जी नित्यकर्म आहेत ती करायला सुरवात करायची आहे.
मित्रांनो दररोज जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला जाणवू लागेल कि आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहे. हा उपाय स्त्री असो वा पुरुष कोणीही करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.