नमस्कार मित्रांनो,
आज आहे शरद (कोजागिरी ) पौर्णिमा. ही वर्षभरात येणाऱ्या सर्व पौर्णिमांमध्ये विशेष मानली जाते. शरद (कोजागिरी ) पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे सौंदर्य आणि आभा संपूर्णपणे वेगळी असते. कोजागिरी पौर्णिमेबद्दल धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की या रात्री चंद्राचे सौंदर्य पाहण्यासाठी देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात. असे म्हणतात कि कोजागिरी पौर्णिमेला रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीला भेट देण्यासाठी येते आणि या रात्री कोण कोण जागृत होते आणि परमेश्वराचे नामस्मरण करते हे पाहण्यासाठी प्रत्येक घराला भेट देते.
असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री जो कोणी झोपलेला आढळतो, त्यांच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. अशा वेळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले जातात.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खीर बनवली जाते आणि चंद्राच्या प्रकाशात ही मसाला दूध किंवा खीर रात्रभर मोकळ्या आकाशाखाली ठेवली जाते. शरद पौर्णिमेला चंद्राची किरणे अमृतवर्षाव करतात आणि खीरमध्ये अमृताचा काही भाग आढळतो. आर्थिक समृद्धी, सुख-समृद्धीसाठी शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण केले जाते.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उशिरा जागे राहिल्या नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे नाव घेतल्याशिवाय झोपू नये. रात्री जागरण केल्यामुळे याला कोजागरी पौर्णिमा म्हणजेच जागरण रात्र असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री खुल्या आकाशाखाली ठेवलेली अमृतासमान मसाला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून घ्यावी.
शरद पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व ऋणातून मुक्ती मिळते, म्हणून तिला कर्जमुक्ती पौर्णिमा असेही म्हणतात. या रात्री श्रीसूक्ताचे पठण, कनकधारा स्तोत्र, विष्णु सहस्त्र नामाचा जप आणि भगवान श्रीकृष्णाच्या मधुराष्टकमचे पठण केल्याने सत्कर्म पूर्ण होण्यास मदत होते आणि भक्ताला श्रीकृष्णाचा सहवास प्राप्त होतो.
शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी पौर्णिमेच्या पहाटे स्नान करून तुळशीला नैवेद्य, दिवा आणि पाणी अर्पण करावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. याशिवाय देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा.
माता लक्ष्मीला सुपारी खूप प्रिय आहे. शरद पौर्णिमेला सकाळी माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारी ठेवावी. पूजेनंतर सुपारीवर लाल धागा गुंडाळून अक्षत, कुंकू , फुले इत्यादींनी पूजा करून तिजोरीत ठेवा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश सर्वत्र पसरलेला असतो, त्या वेळी लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याला धनाची प्राप्ती होते. शरद पौर्णिमेच्या रात्री हनुमानजीसमोर चारमुखी दिवा लावू शकता .
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.