नमस्कार मित्रांनो,
अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. मासिक पाळी दरम्यान पोट दुखी, कंबर दुखी, पाठ दुखी आणि इतर शारिरीक दुखणे यासासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या दुखण्यामुळे महिलांना उठण्यापासून ते बसण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी अवघड होऊन जातात. अनेकदा या काळात महिलांमध्ये चिंता आणि उदासिनता जाणवू लागते. ही समस्या बहूतेक महिलांमध्ये आढळून येते.
तुम्हालाही मासिक पाळी येण्याआधी असा त्रास होणं ही सामान्य बाब आहे. काही ठराविक समस्यांमध्ये मासिक पाळी येण्यापूर्वी मनात असलेली चिंता ही पुढे जाऊन वेगळं रूप घेऊ शकते. उदाहरणार्थ चिंता, भीती, ताण. जर तुम्हाला ही लक्षणे गंभीर स्वरूपात दिसून आली तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांना दाखवा.
खरं तर काही महिलांमध्ये मेडिकल कंडिशनमुळे देखील असा त्रास उद्भवू शतकतो. पण असा त्रास जर पीएमएसच्या लक्षणांपैकी एक असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका करून घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
मासिक पाळीच्या काळात चिंता आणि अस्वस्थता का जाणवते? मासिक पाळी येण्याआधी महिलांमध्ये चिंता आणि अस्वस्थता मोठ्या प्रमाणात जाणवू लागते. मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात.
त्यामूळे या काळात पीएमएसची लक्षणे दिसून येतात. या काळात महिलांच्या हार्मोन्सचे प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे याचा परिणाम मेंदूमधल्या न्यूरोट्रान्समीटरवर होत असतो.
हे घरगुती उपाय करा
तुम्हालाही मासिक पाळी येण्याआधी चिंता, उदासिनता आणि अस्वस्थता वाटत असेल तर तुमच्या शरीराला योग्य पोषण देण्यास सुरूवात करा. यासोबत तुम्ही तुमच्या लाईफस्टाइलमध्येही योग्य बदल करणे गरजेचे आहे.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन 6 असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा. उदाहरणार्थ घेवडा, हिरव्या पालेभाल्या, बदाम, केळी, अॅव्होकॅडो, काजू इत्यादी.
कॉम्प्लेक्स कार्ब्स युक्त पदार्थ खाण्यास सुरूवात करा. मासिक पाळीच्या काळात तुम्ही सुरूवातीला मॅग्नेशिअम रिच फूडचे सेवन करा. दिवसातून एकदा कॅमोमाइल चहा प्या. चालण्याचा व्यायाम करण्यास विसरू नका.
कमीत कमी अर्धा तास चालणे गरजेचे आहे. दिवसातून जास्तित जास्त पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. दिवसभरात 2-3 लीटर पाणी पिणं गरजेचं आहे.
हे घरगुती उपाय करून तुम्ही मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासापासून सुटका करू शकता. या काळात तुम्ही दिलासा मिळू शकतो आणि मासिक पाळीच्या काळ आनंदात घालवू शकता.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.