नमस्कार मित्रांनो,
गुरुवारचे व्रत केलेले आहे. महिला या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतील, तर भरपूर महिलांचे प्रश्न असतात जसे उद्यापन कसे करावे? माताला नैवेद्य कोणता दाखवावा? आणि कोणता उपाय करावा? तर मित्रांनो ही सविस्तरपणे आणि संपूर्ण माहिती तुम्ही आजच्या या माहितीमध्ये जाणून घ्या.
मित्रांनो जी कोणी महिला महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होते. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये. नित्यनियमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीचे मनन-चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते.
मित्रांनो आंब्याच्या डहाळ्या चौरंगावर मांडलेल्या पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचे रूप म्हणून तिची आपण स्थापना करतो. मातेची मूर्ती सजवून केलेली आरास या व्रताचे महात्म्य वर्णन करत असते.
माता लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतीपाठ, आरती, नैवेद्य असे रूप या काळात घराघरांमध्ये पाहायला मिळते. शेवटचा गुरुवार आला की, उद्यापन केले जाते. उद्यापन करताना सवासनीना घरी बोलावून त्यांचे उद्यापन केले जाते, त्यांना फळे दिले जाते आणि मातेची पोती भेट स्वरूपात दिली जाते.
ओटी भरली जाते अशा रीतीने तुम्ही उद्यापन करू शकतात. मातेला खिरीचा प्रसाद करून त्यांना खीर देऊ शकता. खीर जमत नसेल तर कोणतेही एक फळ त्यांना दान स्वरूपात तुम्ही देऊ शकतात. तुम्हीही उद्यापन करताना 5, 7, 9 आणि 11 अशा सवसानीना घरी बोलावून तुम्ही उद्यापन करू शकतात.
जर तुम्हाला उद्यापन करणे शक्य नसेल तर तुम्ही फळ आणून ते सरळ मातेच्या मंदिरात जाऊन ठेवून द्यावे अशा रीतीने तुम्ही उद्यापन करू शकतात. नैवेद्य कोणता दाखवावा तरी या दिवशी गोडधोडाचा नैवेद्य केला जातो. पुरणपोळी, खीर केली जाते. जर शक्य नसेल तर रव्याचा शिरा सुद्धा तुम्ही करू शकता.
आता कोणता उपाय करावा? तर या दिवशी सकाळी मातेसमोर एक नारळ आणून ठेवावे आणि संध्याकाळी ते नारळ फोडावे आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी खावा. फक्त नारळ सकाळी ठेवताना आपली कोणतीही इच्छा बोलून तो नारळ देवी पुढे ठेवावा.
मित्रांनो उद्यापन तुम्ही सोप्यारीतीने घरच्याघरी करू शकता. नैवेद्य तुम्ही पुरणपोळी, खीर किंवा शिरा करून दाखवू शकता. आणि उपाय नारळाचा करू शकता. सवसानीना घरी बोलवल्यानंतर त्यांचे हळदी कुंकू करून त्यांना फळे द्यायला विसरु नका. तर अशा रीतीने तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.