नमस्कार मित्रांनो,
आपल्या देशात शकुन अपशकुन, श्रद्धा अंधश्रद्धा ही खूप मानले जातात. ही पद्धतआपल्याकडे शेकडो वर्षापासून चालत आलेले आहे. काही व्यक्ती याकडे प्रथेने पाहतात.
तर काही व्यक्तींना हे अंधश्रद्धा वाटते. परंतु पूर्वीपासून ही पद्धत चालतआली असल्याने आपल्याही मनात या विषयी थोडी भीती आणि थोडीशी उत्सुकताही वाटत असते.
आपल्याला हे जाणून घ्यायचे असते की हे खरोखर आहे का जाणून घेणार आहोत. पुण्याला मांजर विषय असे म्हटले जाते जर काही महत्त्वाच्या कामासाठी घरा बाहेर पडलो आणि रस्त्यात एखादे मांजर आडवे गेले तर तो अपशकून मानला जातो.
आपले ते काम पूर्ण होत नाही आणि एखादी अशुभ घटनाही घडू शकते. पण खरोखर असे काही असते का. असे म्हणतात की आपण रस्त्याने जात असताना मांजर आडवी गेली तर पाच पावले मागे फिरावे. मग पुढे जावे.
किंवा खूपच महत्त्वाचे काम असेल तर थोडावेळ एखाद्या झाडाखाली किंवा हॉटेलमध्ये थांबून पाणी प्यावे मगच पुढे जावे. तरच आपले ते काम पूर्ण होते. नाहीतर आपल्याला त्यात अपयश येते.
असे मानले जाते की एखाद्या वेळेस आपण जात असताना मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर आपल्याला प्रवासात काही दुखापत होऊ शकते.
किंवा आपले नुकसान होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की मांजर आडवी जाणे अशुभ आहे. याचा खरा अर्थ असा आहे की पुढे काही घटना घडणार असतील तर त्याचा पूर्व भास मांजरीला पूर्वीच होऊन जातो. म्हणून त्या संकटाची कल्पना आपल्याला देण्यासाठी मांजर आपल्या मार्गात आडवी जाते.
म्हणजे त्या संकटापासून आपण सावध राहू शकतो म्हणूनच ज्यावेळी मांजर आपल्याला आडवी गेली की समजून जावे आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे आणि त्यासाठी मनाची तयारी करून ठेवावी. परंतु मांजर रस्त्याने आडवी जाणे नेहमी अशुभ नसते.
मांजर आपल्या डाव्या बाजूला गेली आहे की उजव्या बाजूला यावरून त्याचे शुभ अशुभ परिणाम दिसून येतात शकुन शास्त्रानुसार डाव्या बाजूने रस्ता कापणे अशुभ मानले जात नाही परंतु जर मांजर आपल्या उजव्या बाजूने गेली तर ते अशुभ मानले जाते.
म्हणूनच मांजरी ने आपल्या उजवीकडून रस्ता ओलांडला असेल तर थोडा वेळ थांबावे व मगच पुढे जावे. मांजरी विषयी अनेक शुभ अशुभ बाबी शकुन शास्त्रात दिलेले आहेत. असे मानले जाते की घरातील दूध जर मांजर पिऊन पळून गेली तर हे घरातील संपत्तीच नुकसान होण्याचे संकेत आहे.
मांजरीने घरात येऊन दूध पिणे हे खूप अशुभ आहे. त्यामुळे आपल्या घरातील संपत्ती नष्ट होते. कारण दूध हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि घरातील दूध जर नष्ट झाले तर आपली संपत्ती ही नष्ट होते. तर घरात येऊन दोन मांजरी भांडत असतील किंवा रडत असतील तर हे सुद्धा खूप अशुभ मानले जाते.
मांजरी जर घरात येऊन भांडत असतील तर आपल्या घरात वादविवाद, भांडण तंटे होऊ शकतात. तसेच मांजर घरात येऊन रडणे हे एकाद्या वाईट घटनेचे सूचक आहे. एकादी व्यक्ती झोपेत असताना त्या व्यक्तीच्या अंगावर मांजर पडने म्हणजेच याचा अर्थ ती व्यक्ती कोणत्याही रोगाने पीडित होऊ शकते.
तर मित्रांनो शकुन शास्त्रानुसार मांजरी बद्दल हे काही संकेत आहेत. हे मानने न मानने ते ज्याचे त्याचे ज्यांनी त्यांनी ठरवायचे काहीजण या सर्वाकडे प्रथने पाहतात तर काहींना या अंधश्रद्धा वाटतात. परंतु शास्त्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. हे विसरून चालणार नाही. धन्यवाद,
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.