पूजा करताना मन का लागत नाही? मनात वाईट विचार का येतात?

नमस्कार मित्रांनो,

आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत ज्या बद्दल लोक चर्चा किंवा विचार विनिमय सुद्धा करत नाहीत. काही लोकांना अस वाटत की आपण त्या विषयावर चर्चा केली तर लोक त्यांना चुकीचं समजतील. आणि त्यामुळे ते मनातील या सर्व गोष्टी कोणाला सांगत नाहीत. आणि विचारतं ही नाहीत. आज मी हा विषय निवडला आहे कारण जे लोक पूजा पाठ करतात त्यांच्या सोबत हे नेहमी घडतं असते. यांच्या मागे कोणतीही अंधश्रध्दा नाही. तर याच्या मागे विज्ञान आहे ते कारण आहे जे या लेखात जाणून घेणार आहोत.

मित्रानो अध्यात्म मध्ये लोक दोन प्रकारे येत असतात. एक ते लोक असतात. ज्यांच्या घरात परंपरेने आध्यात्म आलेले असते. त्यामुळे त्यांना अध्यात्म करावेच लागते. दुसरे ते लोक असतात ज्यांचे एखादे काम किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी ते अध्यात्मिक मार्गाकडे वळतात. कारण कोणतेही असो जेव्हा आपण पूजा पाठ किंवा काही साधना करायला बसतो तेव्हा आपले मन लागत नाही.

वाईट इच्छा मनात येतात. काम इच्छा सुद्धा वाढते. समोर देवाचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी वाईट विचार येऊ लागतात. पूजा कधी संपवेन असे वाटू लागते. याचे एक मुळ कारण असे आहे की आजच्या कलियुगात पूजा, प्रार्थना, ध्यान यात आपलं मन मुळात लागतच नाही. आणि तरीही आपण आपल्या मनाविरुद्ध या गोष्टी करत असतो.

त्यामुळे आपल्या मनात रा’ग, ची ड, द्वे’ष या सगळ्या गोष्टी उत्पन्न होत असतात. आपल्या शरीराला या गोष्टींची सवय नसते. त्यामुळे आपले शरी’र सुद्धा आपल्याला साथ देत नाही. आपले मन सुद्धा आपल्या शरी’राला हेच निर्देश देत असते. की तू आता या पुजेतून उठून जावे. मित्रानो आजच्या या कलियुगात आपण अनेक अश्ली’ल गोष्टींना सामोरे जात असतो.

मग त्या गोष्टी जाहिराती मार्फत असो, लेखामार्फत असो किंवा अन्य साधना मार्फत असो या सर्वच गोष्टी कुठेना कुठे आपल्या अंतर्मनात घर करून राहतात. आणि त्यामुळेच आपण एखादी पूजा साधना करतो तेव्हा आपल्या मनात हे लपून बसलेले विचार पुन्हा बाहेर येतात मग तुम्ही कितीही स्वतः ला समजावण्याचा किंवा सावरण्याचा प्रयत्न केलात तरीही तुमचं मन स्थिर होत नाही.

मग भलेही तुम्ही एखाद्या देवीच्या फोटो समोर बसून तुमच्या मनात वाईट विचार सक्रिय होतात. तर मित्रानो या सर्व गोष्टी कधीही कोणी शेअर करत नाही. त्या नेहमी आपल्या मनात तशाच राहतात. कोणाला सांगावे विचारावे असे वाटले तरी अशी भीती वाटते की समोरचा व्यक्ती आपल्याला समजूनच घेणार नाही. कदाचित तो आपल्याला समजावेल तुझ्या चरित्रात तुझ्या विचारात दोष आहेत.

म्हणून तुझ्या मनात या गोष्टी उत्पन्न होतात. या सर्व गोष्टी मध्ये तुमचा अजिबात दोष नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मनाला आणि शरीराला या सर्व गोष्टींची सवयच नसते. आणि त्यामुळेच जेव्हा आपण एखादा मंत्र जप किंवा एखादी पूजा पाठ करायला बसतो. तेव्हा आपल्या अंतर्मनात असलेल्या त्या सर्व गोष्टी बाहेर पडू लागतात. त्यामुळे जेवढे आपण ध्यान करू तेवढे या सर्व गोष्टी मनातून बाहेर पडतात.

याचाच अर्थ असा की आपले सर्व चांगले विचार वाईट विचारांना पराभूत करत असतात. उदाहरण सांगायचे झाले तर जेवण करताना गरम तव्यावर पाणी शिंपडले तर ते जसे तडफड करते आपल्या मनाचे सुद्धा तसेच आहे. ध्यान करताना हे सगळे वाईट विचार आपल्या शरीरातून बाहेर जाण्यासाठी तडफड करत असतात. आपल्या मनात हे सगळे वाईट विचार निघून जातात. आपले मन संपूर्णपणे स्थिर होते.

<
आपल्या मनात चांगले विचार आणि आध्यात्मिक भावना येवू लागतात. पण मित्रानो या सर्व गोष्टी होण्यासाठी दोन तीन महिन्याचा कालावधी नक्की लागू शकतो. कारण आपले चांगले विचार जोपर्यंत आपल्या मनातील वाईट विचारांना मारत नाही तोपर्यंत आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकत नाही. तर मित्रानो दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ते म्हणजे जेव्हा आपण ध्यान साधना करायला बसतो.

तेव्हा आपल्या शरीरातील मुलाधार चक्र म्हणजेच मुळचक्र कार्यान्वित होत असते. हे चक्र म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे भविष्य आणि व्यक्तित्व विकासाचा पाया घडवत असते. या चक्रमुळेच मानवाला चेतना शक्ती, जोम आणि संवर्धन ही सगळी वैशिष्ट प्राप्त होत असतात. हे मुलाधार चक्र जर का अयोग्यापणे कार्यान्वित झाले. तर परिणामी स्वरूप आळस व स्वकेंद्रित वृत्ती निर्माण होऊ शकते.

त्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा असतील. उदाहरणार्थ, धन प्राप्तीची इच्छा, काम करण्याची इच्छा, मोक्ष प्राप्ती ची इच्छा यासारख्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा या मुलाधार चक्र वर अवलंबून असतात. जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा तुमचे मुलाधार चक्र हे कार्यान्वित होत असते. आणि तेव्हा तुमच्या मनात ज्या सर्व इच्छा असतील त्या सर्व इच्छा अतिशय तीव्र गतीने बाहेर पडू लागतात.

मग तुमच्या मानत एखादा वाईट विचार जरी आला तरी तुम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. त्या सर्व गोष्टी चा प्रभाव असा असू शकतो की जेव्हा तुम्ही ध्यान करत असता तेव्हा तुमच्या काम इच्छा सुद्धा जागृत होत असतात. म्हणून हा मुलाधार जागृत होणे खूप गरजेचे असते. तर मित्रानो आपल्या शरीरातील मुलाधार चक्र संतुलित ठेवण्यासाठी एक गोष्ट करणं महत्वाचे आहे की जेव्हा आपण ध्यान साधना करायला बसू तेव्हा श्री शंकर भगवान म्हणजे देवांचे देव महादेव यांच्याकडे प्रार्थना करा.

हे महादेवा मी जी काही साधना करणार आहे. त्यामध्ये माझ्या कुंडलिनी ऊर्जेला नियंत्रणात ठेवा. माझ्या मुलाधार चक्र मध्ये ज्या काही इच्छा, ऊर्जा आहेत्यांना नियंत्रणात ठेवा. त्यामध्ये संतुलन असू द्या. हे बोलून झाल्यावर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यानंतर तुम्हा नक्कीच चांगले अनुभव यायला लागतील. तुम्ही केलेल्या साधनेत तुम्हाला नक्की यश मिळेल.

तसेच मित्रानो तुम्ही एखादा मंत्र जप, साधना करत असता त्यावेळी तुम्ही ज्या देवतेचे ध्यान करणार आहात त्यांना एकच प्रार्थना करा. की हे देवा मी जे काही कार्य किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी जप करत आहे त्या कार्यात तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. तुम्ही माझे मायबाप आहात. तुम्ही माझी परीक्षा घेतली तरी मी पास होवू शकणार नाही म्हणून हे देवा माझ्या मनात येणारे सगळे वाईट विचार बंद करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *