नमस्कार मित्रांनो,
ह्या जगाला जेवढे काही ज्ञान मिळाले आहे, ते मनातून निर्माण झाले आहे. ह्या ब्रम्हांडातली आसीम लायब्ररी आपल्या मनामध्ये आहे, उठा जागे व्हा तुमचे ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबू नका. मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये जे जे संत होऊन गेले, प्रत्येकाने मनाचे महत्व सांगितले. पण दुर्दैवाने अनेक लोकांना या मनाचा वापर करून आपले आयुष्य यशस्वी आणि सुखकर कसे बनवायचे हेच माहित नाही. आज आपण मनाला मजबूत करण्याचे मनाची शक्ती वाढवण्याचे चार मार्ग बघणार आहोत. यापैकी कोणत्याही मार्गाचा आठ दिवस तरी प्रयोग केला, तरी तुमच्यामध्ये बदल घडेल याची खात्री मी तुम्हाला देतो. चला तर मग सुरू करूया
१. कुतुहूल वाढवा, चिकिस्तक बना = मित्रांनो कोणतीही गोष्ट किंवा बातमी जशी आहे तशी स्वीकार करू नका, त्याऐवजी जास्तीत जास्त प्रश्न विचारायची सवय लावून घ्या, मी अशी लोकं पाहिली आहे, व्हाट्सअप किंवा फेसबुकवर एखादी पोस्ट वाचली की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि कोणतीही शहानिशा न करता, दुसऱ्यांना फॉरवर्ड करतात. अशाने तुमची फसवणूक तर होईलच, पण नुकसान सुद्धा व्हायची शक्यता आहे.
अशी कोणतीही पोस्ट वाचून तुम्ही चुकीचा प्रयोग केला.ते तुम्हाला किती महागात पडू शकते. त्यामुळे इथून पुढे जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करायला सुरवात करा. ही गोष्ट ही बातमी, जी मी वाचली आहे. ऐकली आहे. ती खरी आहे कशावरून? याला पुरावा काय आहे. याला पर्याय काय? जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारता तेव्हा तुमची बुद्धी आपोआप तीक्ष्ण व्हायला सुरुवात होते. कारण तुमचे चिंतन वाढते, अशा प्रकारे प्रश्न विचारणाऱ्या आणि चिंतन करणाऱ्या व्यक्तीला ह्या जगात कोणीही सहज फसवू शकत नाही.
२. कं’म्फर्ट’झोनच्या बाहेर च्या गोष्टी करा= मित्रांनो आपल्या मनाला नेहमी कं’म्फर्ट’झोन मध्ये राहायची सवय झालेली असते. त्यामुळे त्याची प्रगती होत नाही. आता तुमचा प्रश्न असेल, कंम्फर्ट झोनच्या बाहेरच्या गोष्टी करायच्या, म्हणजे नक्की काय करायचे? तर मित्रांनो तुम्हाला ज्या गोष्टिंची भीती वाटते, त्यापैकी रोज एक गोष्ट करायचा प्रयत्न करा.
उदाहरण; तुम्हाला पब्लिक स्पि’किंग ची भीती वाटते तर घरातल्या चार पाच लोकांसमोर पब्लिक स्पि’किंगची प्रॅ’क्टिस करा.किंवा मग नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. जसे की डान्स, गिटार, तबला किंवा एखादी नवीन भाषा असेल असे केल्याने तुमच्या मेंदू मध्ये नवीन नवीन पाचावेज निर्माण होतात. त्यामुळे तुमच्या मेंदूची आकलन शक्ती वाढते.
३. ब्रेन गे’म्स खेळा, कोडी सोडवा = मित्रांनो मोकळ्या वेळेत फालतूमध्ये टीव्ही बघण्यापेक्षा किंवा मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा, बुद्धीला चालना देणारे गेम्स खेळा, केवळ कोडी सोडवा, प्ले स्टोअर वर ब्रे’न एक्सरसाइज गेम्स असे टाकले तरी तुम्हाला शेकडो गेम्स मिळतील. अशा गेम्स तुमची स्मरण शक्ती वाढवते. तुमच्या मेंदूची क्षमता वाढते, तुमची निर्णकक्षमता वाढते.
४. पुस्तकाचे वाचन करा= मित्रांनो वाचन केल्याने तुमची कल्पना शक्ती वाढते, कारण वाचन करताना, तुम्ही वेगवेगळी लोक, वेगवेगळी ठिकाणे, वेगवेगळया वस्तू यांची मनामध्ये कल्पना करत असतात. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते. मी अनेक वेळा सांगितले आहे, या जगामध्ये जी श्रीमंत आणि यशस्वी लोक आहेत, त्यांच्यामध्ये एक कॉ’मन सवय आहे. ती म्हणजे पुस्तकांचे वाचन करण्याची, ह्याचं बरोबर तुम्हाला नोट्स काढायची सवय लावायची आहे. कारण संशोधन असे सांगते की तुम्ही जेव्हा नोट्स काढता. तेव्हा वाचलेले तुमच्या जास्त लक्षात राहते.
मित्रांनो परत एकदा चार पॉईं’ट्स बघुया. १.कुतूहल वाढवा, चिकित्सक बना. २.कं’म्फर्ट’झोनच्या बाहेर च्या गोष्टी करा. ३.ब्रे’न गेम्स खेळा कोडी सोडवा. ४.पुस्तकांचे वाचन करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.