मकर रास मार्च महिन्यात तुमच्या जीवनात या विशेष घटना घडणार म्हणजे घडणारच !

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिष शास्त्रानुसार मकर ही राशिचक्रातील दहावी रास असून, या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. वेळेचा आणि पैशाचा व्यवस्थापन करण्यात ही मंडळी अतिशय हुशार असतात. कष्ट करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाहीत.

या व्यक्तींची मिथुन, कन्या, वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींची चांगली मैत्री होते. तर कर्क सिंह आणि वृश्चिक या राशींशी त्यांचं फारसं पटत नाही. चला आता बघूया की, मार्च महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांचे आयुष्यामध्ये काय विशेष घडणार आहे.

या महिन्यात कुटुंबात एखादा कार्यक्रम होईल आणि त्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे तुमचा आदर वाढेल आणि सगळेजण तुमच्या वागणुकीमध्ये येत्या काही दिवसात बदल होईल. तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून आनंदाचा संदेश मिळेल.

त्यामुळे घरातही उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. जर तुमचा मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून काही सरप्राइजेस मिळतील. आजूबाजूच्या लोकांची सकारात्मक संवाद होईल आणि त्यांचा कोणताही शब्द मनाला आनंद देऊन जाईल. मकर राशीच्या लोकांना काही घरगुती कामासाठी बाहेर जाणे देखील होऊ शकतो व वडिलांच्या प्रकृतीची मात्र काळजी घ्या.

आर्थिक बाबतीत संयमाने वागावे लागेल, अन्यथा शत्रू तुमचं नुकसान करण्याच्या तयारीत असतील. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील तर तिथून तुम्हाला फायदा होईल पण त्यासाठी तुम्हाला संयमाने काम करावे लागेल. व्यापाराना प्रतिस्पर्धी यांकडून आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुसंवाद राखावा अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तसेच महिन्याच्या चौथ्या आठवड्यात त्यांच्याशी वाद टाळा. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा ताण जास्त असेल परंतु तुम्ही वेळेपूर्वीच सर्व कामे करून टाका.

सर्वजण हो तुमच्या कामाची प्रशंसा करते. जर तुम्ही आता बारावीची परीक्षा देत असाल आणि कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या तयारीत असाल, तर एखाद्या जवळच्या व्यक्तीचे मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. त्यांच्याकडूनही तुम्हाला मदत मिळेल.

शाळेतील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत गंभीर असतील आणि त्यांच्याकडून एखादा ठोस निर्णय घेतला जाईल. सरकारी परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्ग मित्रांच्या संपर्कात नक्की राहावं, अशा काही गोष्टी त्यांच्याकडून शेअर केल्या जातील त्या भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. जर तुमचा प्रियकर काही दिवसांपासून तुमच्यावर रागावला असेल तर या महिन्यात परिस्थिती चांगली होईल. जर त्याला तुमच्या बद्दल काही शंका असेल किंवा मतभेद असतील तर ते या महिन्यात दूर होतील.

त्यामुळे अशा वेळी जर तुम्ही संयमाने वागलात त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्यामध्ये प्रेम वाढेल. विवाहित मंडळींकडे त्यांच्या जोडीदाराला मवाळ वृत्ती ठेवतील. त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा किंवा काहीतरी नवीन करण्याचा विचार करतील.

लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांच्या नात्याची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचू शकते. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नातेसंबंध देखील निश्चित होऊ शकतात. तुम्ही कोणताही खेळ खेळत असाल किंवा सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यात काही दुर्घटना घडू शकते, म्हणून स्वतःची अतिरिक्त काळजी घ्यावी.

या अपघातामुळे पुढे अनेक समस्या निर्माण होतील, त्यामुळे आधीच जरा सावध राहा आणि कोणताही काम घाईगडबडीत करू नका ज्याचे परिणाम वाईट होतील. या महिन्यात शारीरिक त्रास होणार नाही, तसंच महिने डोकेदुखीची, मन अस्वस्थ होण्याची समस्या मात्र होऊ शकते.

यासाठी सकाळी योगासने आणि प्राणायाम करण्याची सवय लावली तर सगळं काही ठीक होईल. मार्च महिन्यासाठी मकर राशीचा भाग्यशाली अंक 4 असल्यामुळे या महिन्याचा 4 रंगाला प्राधान्य द्या आणि मकर राशीचा शुभ रंग आकाशी असल्याने त्यामुळे या महिन्यात आकाशी रंगाला प्राधान्य द्या.

तुमचा मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांच्याशी मधुर संबंध ठेवा, शक्य असल्यास त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करा, असं केल्याने दोघांमधील नातं घट्ट होईल आणि ते देखील या गोष्टीसाठी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *