नमस्कार मित्रांनो,
आज आपण पाहणार आहोत आरोग्यसाठी मैदा हानिकारक का आहे. खरतर बाजारात उपलब्ध असलेले 80% बेकरी प्रॉडक्ट हे मैद्यापासून बनवलेले असतात. चला तर मग जाणून घेऊया मैद्यापासून होणारे नुकसान.
सर्वात आधी जाणून घेऊया मैदा कसा तयार केला जातो. गव्हाच्या पिठातून 97% फायबर वेगळे केल्यानंतर मैदा तयार करतात. मैदा शुभ्र करण्यासाठी आणि चमक आणण्यासाठी गव्हाच्या पीठावर हानीकारक केमिकल्स ने ब्लिच केलं जातं आणि त्यानंतर मैदा तयार होतो.
कॅल्शियम पेरॉक्साइड, क्लोरीन, इत्यादी केमिकल्स ने मैदा ब्लिच केला जातो आणि याच केमिकल्सचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
मैद्या पासून बनवलेला प्रत्येक पदार्थ चविष्ट असतो. पण प्रत्यक्षात आपल्या आरोग्यावर हे पदार्थ वाईट परिणाम करत असतात. नाश्ता म्हणून आपण जे ब्रेड वापरतो ते देखील मैदा चे बनवलेले असतात.
याशिवाय रुमाली रोटी, नान, केक, पेस्ट्री, भाजलेले पदार्थ, बिस्किट, स्नॅक्स, पास्ता, नूडल्स, समोसे असे विविध पदार्थ देखील मैद्याचे बनवलेले असतात. मैदा हा बहुतेक सर्व जंकफूड मध्ये आढळतो.
म्हणूनच मैदा हा एक असा पदार्थ आहे जो निरोगी आयुष्यासाठी टाळायला हवा. जास्त प्रमाणात मैद्याचे सेवन केल्याने वजन वाढते, लठ्ठपणा वाढतो. इतकेच नाही तर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.
वजन कमी करण्यासाठी एकतर मैद्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ आहारातून टाळायलाच हवे. मैदा हा पोटासाठी योग्य नाही. कारण याच्यात फायबर नसतात आणि यामुळे मलविसर्जनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात.
मैद्यामध्ये ग्लूटेन असल्यामुळे फुड अॅलर्जी देखील होते. मैद्यातील ग्लुटेनमुळे खाद्यपदार्थ मऊ व चिवट बनतात. याऊलट गव्हामध्ये असलेल्या फायबरमुळे मैद्याएवजी आहारात गव्हाचा वापर करावा.
मैद्याचे पीठ बनवताना त्यातील फायबर पूर्णपणे नाहीसे केल्यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते आणि त्यामुळे हाडे कमजोर होतात. मैद्याचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
मैदा खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी लगेच वाढते.म्हणून आपण जास्त मैदा खाल्ला तर आपल्याला स्वादुपिंडाची तक्रार सुरू होते.
मैदा खाल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते.
मैदयामुळे शरीरात संधिवात आणि हृदय रोग यांच्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात मैदा व त्यापासून तयार होणारे पदार्थ यांचे सेवन करणे जास्तीत जास्त टाळावे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
वरील माहीत प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.