महिलांसाठी आरोग्यवर्धक : केशरचे पाणी रोज पिण्याचे 5 फायदे

नमस्कार मित्रांनो,

महिलांच्या मासिक पाळीपासून ते त्वचा आणि केसांच्या समस्येपर्यंत अनेक तक्रारींवर हे केशराचं पाणी एक उत्तम उपाय आहे.. केशराचं पाणी कसं आणि केव्हा प्यायचं हे फक्त माहिती पाहिजे.

आरोग्याच्या अनेक समस्यांवरचे उपाय आपल्या स्वयंपाक घरातच असतात. आपल्याला फक्त त्याचे उपयोग माहिती नसतात. केशर हा सगळ्यात श्रीमंत सुकामेवा म्हणून ओळखला जातो. कारण त्याची किंमतच एवढी जास्त असते की अगदी ग्रॅम किंवा तोळा या मापाने तो खरेदी केला जातो.

महाग असेल तरी थोडंसं केशर नियमितपणे आपल्या पोटात जाणं गरजेचं असतं. कारण एवढंसं केशर खाल्ल्यानेही आरोग्याला अनेक लाभ मिळतात. काजू, बदाम, पिस्ता हा सुकामेवा येता जाता तोंडात टाकता येतो. नुसता खाता येतो. पण केशर तशा पद्धतीने खाल्ले जात नाही.

त्यामुळे त्याचा वापर खूपच मर्यादित होतो. एखाद्या गोड पदार्थापुरताच त्याचा वापर हाेतो. त्यामुळे अगदी कधीतरीच केशर आपल्या पोटात जातं. म्हणूनच केशराचं पाणी हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय ठरतो केशराचं पाणी बनवणं आणि त्याचं सेवन करणं अतिशय सोपं आहे.

कसे बनवायचे केशराचे पाणी – केशराचं पाणी बनविण्यासाठी एक कप भर पाणी घ्या आणि ते तापवायला ठेवा. या पाण्यात केशराच्या 3 ते 4 काड्या टाका. पाणी चांगले खळखळून उकळू द्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि कोमट असताना हे पाणी प्या.

केशरामध्ये व्हिटॅमिन A, फोलिक अ‍ॅसिड, तांबे, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅंगनीज, लोह, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशिअम यासारखे पौष्टिक घटक असतात. लाईकोपिन, अल्फा कॅटरीन, बीटा कॅरोटीन हे देखील केशरमध्ये असते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका तर कमी होतोच, शिवाय सौंदर्यासाठीही ते उपयुक्त ठरते.

केशरचे पाणी पिल्याने मिळणारे फायदे –
1) केशरामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढलं असेल तर केशर पाणी नियमितपणे घेणं हा त्यावरचा उत्तम उपाय होऊ शकतो. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्याचं काम केशर करतं.

2) मासिक पाळीतल्या पोटदुखीसाठी केशर पाणी पिणं हा एक उत्तम उपाय आहे. ज्या महिलांना पाळीच्या काळात खूप जास्त पोटदुखी, पायात गोळे येणं, कंबरदुखी असा त्रास होतो, अशा महिलांनी आठवड्यातून एकदा केशर पाणी जरूर प्यावं.

3) केशरमध्ये सेरोटिनन नावाचा घटक असतो. हा पदार्थ मानसिक ताणतणाव, नैराश्य कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे मानसिक ताण कमी करण्यासाठी केशर पाणी पिण्याचा उपाय करून बघा.

4) आजकाल विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच डोकेदुखीचा त्रास होतो. पण यामध्येही महिलांचं प्रमाण जरा जास्त आहे. आपल्या मैत्रिणी, नात्यातल्या महिला डोकेदुखी होत असल्याची तक्रार नेहमीच करतात किंवा आपण स्वत:ही त्याचा बऱ्याचदा अनुभव घेत असतो. त्यामुळेच डोकेदुखीचं दुखणं पळवून लावण्यासाठी केशर पाणी हा एक चांगला उपाय होऊ शकतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *