श्री स्वामी समर्थ,
मंडळी स्वामींचे भक्त संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहेत. यातील काही भक्त असे आहेत ज्यांना महराजांच्या सेवेचा योग्य तो मार्ग आणि परिणाम मिळाले आहे.
परंतु काही भक्त अंध श्रधदे चे बळी आहेत. आणि अशा लोकांना महाराजांची सेवा करूनही यश प्राप्ती झाली नाही. चुकीच्या मार्गदर्शनामुळे लोक महाराजांची नित्यासेवा चुकीच्या पद्धतीने करतात.
त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत नाहीत.तर तुम्ही काळजी करू नका. महाराजांची सेवा कशी करावी हे पाहूया. महाराजांची नित्य सेवा महाराजांनी लिहिली आहे.
अंधश्रद्धा ला बळी न जाता योग्य ती सेवा करा यश नक्की मिळेल. चला तर मंडळी सेवा करूया सेवेकरी वाढवू या. महाराजांची नित्यसेवा करताना म्हणजे पूजा करताना काळे वस्त्र घालू नका.
काळा रंग हा निराशेचा प्रतीक आहे. महाराजांना हा रंग आवडत नाही. महाराजांना फक्त अष्टगंध चा टीका लावा. हळद कुंकू लावू नका. शक्यतो लाल रंगाचे प्राधान्याने गुलाबाचे फुल अर्पण करा.
महाराजांची नित्य सेवा करत असताना महाराजांचे नामस्मरण याला प्राधान्य द्यावे. नित्य सेवा करत असताना नित्यनेमाने ११ माळ जपा.
शक्य नसेल तर १०८ वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करत माळ जपा. होत असेल तर श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे पाठुपद म्हणजेच क्रमशः १,२,३ अध्याय वाचा.
रोज जे आपण खातो ते महाराजांना द्या. त्यांची रोज नैवेद्य आरती करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले विचार स्वच्छ ठेवा. मास मच्छी खाऊ नका.
<
मोठ्यांचा आई वडिलांचा आधार बना, आदर करा, वेळ मिळेल तिथे श्री स्वामी समर्थ असा जप करा. सुख, शांती, संपत्ती, आरोग्य आपल्यापासून कधीच दूर होणार नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.