नमस्कार मित्रांनो,
आज सोमवार आहे. सोमवार म्हणजे महादेवाचा वार असे मानले जाते आणि शंकराची पूजा करतांना काही नियम महत्वाचे असून ते नेहमी लक्षात ठेवणेही खूप गरजेचे आहे. तर पाहूया हे महत्वाचे नियम कोणते आहेत,
सोमवार म्हणजे महादेवाचा वार असे मानले जाते आणि या दिवशी व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे. सोमवारी व्रत करण्याचे तीन प्रकार आहेत. यामध्ये सामान्य प्रति सोमवार, सोम्य प्रदोष आणि सोळा सोमवार यांचा समावेश आहे. तिन्ही उपवासाचे विधी आणि उपासनेचे नियम समान आहेत. सर्व उपवासांमध्ये एकदाच भोजन करावे. परंतु शिव पूजा करतांना काही नियम महत्वाचे आहेत आणि ते नेहमी लक्षात ठेवणेही तितकेच गरजेचे आहे.
शिव पूजेचे काही महत्वाचे नियम :-
शिवाला कधीही तुळस वाहू नये , पण शाळीग्रामावर वाहिलेली तुळस शिवाला चालते.
शिवपूजा झाल्यावर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखवावा लागतो.
शिवपूजेत केवड्याचा वापर निषिद्ध आहे.
शिवतीर्थ पिऊ नये. मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ प्यायलेले चालते.
शंखाचे पाणी शिवाला वाहू नये.
शिव पूजेमध्ये दुधाचा जलभिषेक केला जातो. पण चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका. तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध खराब होते आणि अर्पण करण्या योग्य राहत नाही.
शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते.
शास्त्रानुसार शिवलिंगावर कुंकवाचा टिळा कधीही लावू नये. शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा.
भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका. जेथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जा.
हे शिवपूजेचे महत्वाचे नियम आहेत. असे बरेच नियम शिवपूजेचे आहेत पण हें काही नियम अति महत्वाचे आहेत आणि त्यात कधी कधी सामान्य माणसांकडून चुका होतात आणि महादेवाची कृपा होत नाही. पण शिव शंकर भोळे आहेत भक्तांवर जास्त नाराज होणार नाहीत.
आपण नियम लक्षात ठेऊन व्रत पूजा केल्यास तुमचे व्रत सुफळ संपूर्ण होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.