महादेवाची पुजा करत असताना या गोष्टी विसरू नयेत…

नमस्कार मंडळी,

शिवपुराणात महादेव शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्व सांगितले गेले आहे आणि महादेवाच्या पिंडीची पूजा करताना चुकून चढवू नये हया वस्तू.

महादेव हे अत्यंत प्रिय आणि लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देणारे देव आहे. सोमवार हा महादेवाचा वार आहे.

परंतु, आपल्या देवघरात महादेव पिंडीची पूजा (शिवलिंगपूजा) करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. महादेव हे न्यायप्रिय देव आहे. त्यांचे सर्व प्रकारचे भक्त असतात, आणि जिथे महादेवाचे फोटो किंवा मूर्ती असते तिथे सर्व भक्त उपस्थित असतात.

आपल्या घराच्या देवघरात महादेवाचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये. देवघरात नेहमी महादेवाची पिंड (शिवलिंग) ठेवावी. मानवाला फक्त महादेवाची पिंडी ह्याची पूजा करायला सांगितली आहे.

घरात महादेवाची पिंड (महादेव शिवलिंग) ठेवताना काही गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. जसे की महादेवाची पिंड ही नेहमी ३ इंच पेक्षा मोठी नसावी.

३ इंच कसे घ्यावे हे कळत नसेल तर, जेव्हा महादेवाची पिंड (शिवलिंग) घ्याल तेव्हा ती पिंड तुमच्या हाताच्या अंगठ्या ऐवढी असेल, अंगठयापेक्षा मोठी पिंड घेवू नये.

दुसरी गोष्ट म्हणजे पिंडीवर नाग नसावा, पिंडीवर नंदीसूद्धा नसावा, महादेवाची पिंड साधी असेल तरी चालते, दगडाची असेल तरी चालते, पण शक्य असेल तर पिंड पितळेची ठेवावी.

महादेवाच्या पिंडीची (शिवलिंगाची) दररोज सकाळी पूजा करताना जलाभिषेक करावा, तसेच, महादेवाना नित्यशुदध पाण्यासह रुद्रसुक्त पठण करीत जल अभिषेक करावा. महादेवाना जल अतीप्रिय आहे. ऐखाद्याने महादेवाना जल अर्पण केल्यास ते त्यावर प्रसन्न होतात.

<
तसेच, गुरुचरित्रात देखील म्हटले आहे, की नित्याच्या रुद्रभिषकाने दीर्घायुष्य मिळते आणि अकाली मृत्युदेखील टळतो, तसेच, भगवतग्गितेत म्हटले आहे, महादेवाची नित्यानियम्म रुद्रभिष्काने सेवा केल्यास घरी सदैव लक्ष्मी वास करते व समृद्धी वाढते.

तसेच, हादेखील नियम आहे, जोत्यिरलिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाही तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार केला करतात, कारण उत्तरदिशेने महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाणे वाहत असते, तर ते ओलांडून गेल्याचे पाथक लागते.

त्याचप्रमाणे, कोणत्या अशा ६ वस्तू आहेत, त्या महादेवाना चुकूनही अर्पित करू नये.
सर्वात पहिला आहे शंख, शिवपुराणात भगवान शिवशंकरानी. शंखाचुड नावाच्या असुराचा वध केला होता. आणि शंखाने विष्णूची पूजा होते. महादेवाची पूजा केली जात नाही. त्यामुळे महादेवाच्या पूजेत शंख वर्ज्य आहे.

दुसरे आहे हळदकुंकू, भगवान शिवशंकर आजन्म वैरागी होते, तसेच, हळदकुंकू हे सोभाग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवशंकर महादेवाना हळदकुंकू अर्पित केले जात नाही, भगवान विष्णूंना अर्पित केले जाते.
तिसरे आहे, तुळशीपत्र, असुरचा राजा जालंधर याच्या एका कथेनुसार, वृंदा ही एक तुल्सिरोपटे बनवून घेवून गेली असता, भगवान शंकरांनी जालंधर असूराचा वध केलेला होता म्हणून भगवान शंकर याच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा, पण वृंदा हिने केला होता.

चौथे वस्तू आहे, नारळपाणी, नारळपाण्याचा भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जात नाही, आणि नारळाला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून प्रसाद म्हणून वाटले जाते, परंतु भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी जेव्हा निर्माल्य होते, म्हणून नारळपाणी याचा जल अभिषेक केला जात नाही.

पाचवे आहे दूध, मग ते बाजारातून आणलेले पॅकेट दूध असो वा घरात उकलेले दूध असो ते अर्पित केले केले जात नाही त्यापेक्षा, गंगाजलाने अभिषेक करावा.

सहावे आहे केवडा, शिवपुराणा नुसार ब्रह्मदेव व विष्णूच्या वादात खोटे बोलण्यामुळे भगवान शंकरानी केवडयाला शाप दिला होता.

देवघरात महादेवाची पिंड ठेवताना आधी आपल्या उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती ठेवावी.
तसेच, तिच्या डाव्या बाजूला महादेवाची पिंड ठेवावी, व नंतर सर्व देव ठेवावे,आणि जर तुमच्याकडे गणेशाची मूर्ती नसेल तर सर्वात आधी महादेवाची पिंड ठेवावी.

ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या देवघरात महादेवाची पिंड (शिवलिंग) स्थापित करून पूजा करू शकता.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *