मधाचे आरोग्यावर होणारे ९ फायदे आणि उपयोग जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो!

मधामध्ये आरोग्याला पोषक अनेक घटक आहेत. मध हे अगदी आयुर्वेदापासून औषध म्हणून वापरलेलं आहे. साधारणपणे १०० ग्राम मधामध्ये ३०४ कॅलरी असतात. ह्या मधे कोणतेही फॅट वाढवण्याचे घटक नसते.

तसेच कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाण देखील ०% असते. त्यामुळे मध हे शरीरासाठी उपयुक्त असते. नियमितपणे मधाचे सेवन केल्याने आरोग्यासाठी काय फायदा होतो ते आपण जाणून घेऊयात.

रोज सकाळी गरम पाण्यात एक चमचा मध घालून प्यायल्याने शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. तसेच वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. इतकेच नाही जर तुम्ही जिम करत असाल तर तुम्हाला मधाचे पाणी प्यायल्याने अत्यंत फायदा होतो.

आपल्या घरात जर कोणाला घसादूखी खोकल्याचा त्रास होत असेल तर सर्वात पहिले औषध दिले जाते ते म्हणजे मध. मधाने घसादुखी किंवा घश्याला कोणतेही इन्फेकॅशन झाले असेल तर ते दूर होतात.

अगदी लहान मुलांनासुद्धा मध दिल जात. तसेच ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. मधाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. एका रीसर्चनुसार हे सिद्ध झाले आहे की जर तुम्ही रोज २० ग्राम मध प्यायल्याने हॉर्मोन शक्ती मिळते.

मध हा शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. मधमधे असलेल्या पोषक घटकांमुळे अजिबात थकवा जाणवत नाही. त्यामुळेच काम करण्याची अधिक ऊर्जा शरीराला मिळते.

यामधे असणाऱ्या अर्जाच्या स्रोतामुळेच कदाचित थकव्याची जाणीव होत नसावी. दररोज जर मधाचे सेवन केले तर शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहते. साखरेच्या सेवनाने शरीरावर दुष्परिणाम होतात.

जर योग्यप्रमाणात मध खाल्ले तर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मधामध्ये एक्स्ट्रेन नावाचे फायबर असल्याने शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

जर नियमितपणे मधाचे सेवन केले तर प्रोटेस्ट कॅन्सर,त्वचेचा कर्करोग,तोंडाचा कर्करोग,कोलेस्ट्रॉलचा कॅन्सर यापासून बचाव करण्यासाठी खूप उपयोग होतो.

मधात असलेल्या फ्लेवोनोइड्स व अँटीऑक्सिडंट्समुळे कॅन्सरचे विषाणू शरीरापासून दूर राहण्यास खूप मदत होते. बऱ्याच जणांना पाचनशक्तीशी संबंधित खूप अडचणी असतात यावर उपाय म्हणून जर नियमितपणे मध सेवन केले तर ह्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो.

पचनक्रिया नियमित होण्यास मदत होते. तसेच पॉट फुगणे ह्या सारख्या आजारांवर देखील मध अत्यंत चांगले औषध आहे. मधातील बीफायडोबॅक्टरीमुळे पोटाच्या आजारापासून सुटका मिळते.

रोज मधाचे सेवन केल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया चांगली होते.

बऱ्याच जणांची प्रकृती ही उष्ण असल्याने त्यांना अल्सरच्या त्रासाला सामोरे जावे लागते. मधमध्ये अँटिफंगल असल्याने अल्सर वर त्याचा चांगला परिणाम होतो.म्हणून उष्ण प्रकृती असलेल्या व्यक्तींनी दररोज मधाचे सेवन करावे. धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *