नमस्कार मित्रांनो,
नाणी आणि नोटा माता लक्ष्मी ला आकर्षित करणाऱ्या मानल्या जातात. विशिष्ट क्रमांक असलेल्या नोटा माता लक्ष्मीला आपल्या घरी खेचून आणतात.
मित्रांनो आज आपण अशाच काही नोटांची माहिती घेणार आहोत ज्या नोटा अतिशय भाग्यशाली मानल्या जातात. या नोटा जर आपल्या पर्स मध्ये, पॉकेट मध्ये असतील तर आपलं पाकीट कधीच रिकामे राहणार नाही.
या ना त्या कारणाने आपल्याकडे पैसा सातत्याने खेचला जाईल. मित्रांनो प्रत्येक व्यक्ती साठी भाग्यशाली नोट वेगवेगळी असू शकते. आपली भाग्यशाली नोट जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जन्म तारखेचा वापर करणार आहोत.
मित्रांनो आपण फक्त आपली जन्म तारीख पाहणार आहोत. आपण महिना आणि वर्ष घ्यायचं नाही.
जर आपला जन्म 12 तारखेला झालेला असेल तर 1 आणि 2 यांची बेरीज होते 3. म्हणून आपल्या साठी 3 नंबर ची नोट भाग्यशाली ठरेल.
मित्रांनो ही नोट कशी शोधायची. शोधल्या नंतर त्या नोटेचा वापर कसा करायचा. हे आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या कडे 1 रुपया पासून 2000 रुपये पर्यंतच्या विविध चलनी नोटा दिसून येतात. मित्रांनो आपल्याकडे कोणत्याही नोटा आल्या तर आपल्याला फक्त एक काम करायचं आहे.
जेव्हा आपल्याकडे नोटा येतील तेव्हा त्या नोटेवर असलेल्या शेवटच्या 6 नंबर ची बेरीज करायची आहे. सुरुवातीला तर सिरीज असते. सिरीज सोडून नंबर ची बेरीज करायची आहे.
मित्रांनो समजा त्या नोटेवर असलेल्या अंकांची बेरीज 55 आली. तर 55 मध्ये 2 अंक आहेत. तर त्या 2 अंकांची परत एकदा बेरीज करावी. त्याची बेरीज येते 5 आणि 5 म्हणजे 10. 10 मध्ये सुद्धा 2 अंक आहेत. तर या दोन अंकांची बेरीज 1 आणि 0 म्हणजे 1 होते.
तर अशा प्रकारे एक अंकी बेरीज येई पर्यंत बेरीज करायची आहे.
जर बेरीज 1 आली तर ती नोट 1 या शुभ अंकाची नोट आहे. ज्या लोकांची जन्मतारीख एक आहे त्या लोकांनी ही नोट आपल्या जवळ ठेवावी. त्यांचा शुभ अंक हा एक असतो.
मित्रांनो जर नोटेवर असलेल्या 6 अंकांची बेरीज 42 आली तर त्या 42 ची बेरीज परत 6 येते. तर ज्या व्यक्तींची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 आहे अशा व्यक्ती साठी ही नोट भाग्यशाली असेल.
मित्रांनो ही नोट फक्त स्वतः जवळ ठेवायची नाही. तर त्या नोटे च्या बाबत काही विशिष्ट क्रिया सुद्धा करायच्या आहेत.
आपल्या जन्मतारीख सोबत मिळणारी शुभ अंक असलेली नोट मिळाल्या नंतर काय करावं. मित्रांनो हा उपाय शुक्रवारी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा वार आहे. सर्व धन संपत्ती ची देवता म्हणजे माता लक्ष्मी. म्हणून शुक्रवारी आपण हा उपाय करायचा आहे.
तर अशा प्रकारे ही नोट शोधल्यानंतर आपल्याला काही वस्तू लागतील. आपल्याला थोडं चंदन लागेल. हे आपल्याला कोणत्याही पूजेच्या दुकानात मिळेल. सोबत आपल्याला गुलाब जल लागेल.
चंदन आणि गुलाब जल एकत्र करून आपल्याला माची स च्या काडीने एक यंत्र बनवायचे आहे. प्रत्येक शुभ अंका साठी वेग वेगळं यंत्र आहे.
खाली दाखवलेल्या फोटो मध्ये आपल्याला दिसेल कोणत्या नंबर साठी कोणतं यंत्र आहे. तर आपला जो शुभ अंक असेल त्या अंकाचे यंत्र आपल्याला एका सफेद रंगाच्या कागदावर बनवायचं आहे.
हे यंत्र आपल्याला चंदन आणि गुलाब जल यांच्या मिश्रणाने आणि माचीस च्या काडीने बनवायचं आहे.
यंत्र
मित्रांनो हे यंत्र बनवल्या नंतर ते चंदन सुकू द्या. ते चंदन सुकल्यावर त्यावर ही लकी नोट ठेवायची आहे. आणि तो कागद आणि नोट एकत्र गुंडाळून घ्यावी. त्या गुंडाळी वर लाल रंगाचा धागा गुंडाळावा, ही नोट बांधून घ्यावी.
हा उपाय आपण शुक्रवारी माता लक्ष्मी ची पूजा करताना या पूजे दरम्यान करू शकता. याचे अत्यंत शुभ परिणाम आपल्याला दिसून येतील.
नोट गुंडाळून धागा बांधून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी. आपण जी नोट बांधली आहे ती प्रत्यक्ष माता लक्ष्मी चे स्वरूप आहे. तर या माता लक्ष्मीस आपल्याला प्रार्थना करायची आहे की या नोटेच्या निमित्ताने आपल्या कडे भरपूर धन, वैभव, पैसा आकर्षित व्हावा.
आम्ही जितके कष्ट करत आहोत त्याच फळ म्हणून आम्हाला पैसा मिळत रहावा. त्यानंतर आपण ही नोट आपल्या तिजोरीत, पर्स किंवा पॉकेट मध्ये किंवा दुकानाच्या गल्ल्या मध्ये ठेऊ शकता.
हा उपाय करून झाल्यानंतर 3 ते4 महिन्याने कोणत्याही शुक्रवारी आपण ही नोट काढून गुंडाळी सोडून ही नोट कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करावी.
त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा हा उपाय करावा.
मित्रांनो या उपायाच्या प्रभावाने माता लक्ष्मी प्रसन्न होईल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमी नाही जाणवणार. सर्व मार्गांनी पैसा येत राहील.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.