असा हा लिंबू बाजारात मिळाला तर ताबोडतोब घ्या…हा लिंबू बनवेल तुम्हाला करोडपती

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आज आपण एक विशेष उपाय जाणून घेणार आहोत. आपण आज अशा लिंबा बद्दल जाणून घेणार आहोत हे तुमच्या घराकडे अक्षरशः धन, पैसा, संपत्ती खेचून आणेल.

तुम्ही हे लिंबू तुमच्या घरात ठेऊ शकता. किंवा तुमचा उद्योग असेल, व्यवसाय असेल, दुकान असेल, किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी हे लिंबू आपण ठेऊ शकता.

मित्रांनो हे लिंबू इतके प्रभाव शाली आहेत की हे अक्षरशः पैसे खेचून आणतात. जर एका विशिष्ट पद्धतीने आपण उपाय केला तर आजूबाजूला असलेली शक्ती या लिंबामध्ये एकत्रित होते आणि हे लिंबू शक्तीचे केंद्र बनू शकतात.

आजचा हा उपाय आपल्या घराकडे पैसा खेचून आणणारा आहे. या उपाया साठी आपल्याला बाजारातून असं लिंबू खरेदी करायचं आहे की जे एकमुखी असेल.

मित्रांनो काही वस्तू या अत्यंत दुर्मिळ, दुर्लभ असतात. एकाक्ष नारळ, दक्षिणावर्ती शंख या वस्तू दुर्मिळ आहेत. अगदी त्याच प्रकारे एकमुखी लिंबू सुद्धा दुर्मिळ आहे. मात्र जर तुम्ही शोधण्यासाठी थोडी मेहनत घेतली तर असे लिंबू तुम्हाला अवश्य मिळतील.

हे एकमुखी लिंबू नक्की कसं असतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मित्रांनो लिंबा मध्ये दोन जाती असतात. एक नर लिंबू आणि दुसरी म्हणजे मादी लिंबू.

मात्र ज्या लिंबामध्ये नर आणि मादी यांचा एकत्रित अविष्कार झालेला असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर अर्ध नारी नटेश्वर असणारा लिंबू. अशा लिंबाची एक कडा, किंवा शीर ही वर आलेली तुम्हाला दिसेल. तुम्ही त्यावर हात फिरवला तरी ती तुम्हाला जाणवेल.

फोटोमध्ये तुम्हाला हा लिंबू दिसून येईल. मित्रांनो अशा प्रकारच्या लिंबाला एकमुखी लिंबू असं म्हणतात. अशा लिंबा मध्ये दोन तत्वांचा संगम झालेला असतो. या लिंबामध्ये प्रकृती आणि पुरुष एकत्र आलेले असतात. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धन आकर्षण सुरू होतं.

पैसा मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होते. हे लिंबू कधी खरेदी करावे याबद्दल सुद्धा नियम आहेत. हे लिंबू आपण शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावं. मित्रांनो दिवसभरात कधीही आपण हे लिंबू खरेदी करू शकतो. पण लिंबू खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ जी आहे ती म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी 12 मिनिटे.

मित्रांनो सूर्य कधी उगवणार आहे, सूर्योदय कधी होणार आहे हे जाणून घेण्यासाठी मोबाईल वर पंचांग संबंधित अनेक ऍप आहेत, त्यामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या भागात शुक्रवारी सूर्योदय किती वाजता होणार आहे. सूर्योदय होण्याची वेळ जाणून घेतल्यानंतर त्या वेळच्या अगोदर 12 मिनिटांच्या आत आपण हे लिंबू खरेदी करा.

मित्रांनो तुम्हाला जर चांगलं फळ अपेक्षित असेल तर थोडी मेहनत करावीच लागेल. पण जर हे शक्य नसेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही लिंबू खरेदी करू शकता. शुक्रवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.

लिंबू खरेदी केल्यानंतर कोणालाही न सांगता, अगदी गुप्तपणे आपल्याला हा उपाय करायचा आहे. कोणालाही काहीही न सांगता हा लिंबू आपण आपल्या घरी घेऊन या. लिंबू घरी आणल्यानंतर तुमच्या घरी गंगाजल असेल तर गंगाजल ने ते लिंबू स्वच्छ धुवून घ्यावं, गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने सुद्धा आपण लिंबू धुवून घेऊ शकता.

मित्रांनो लिंबू खरेदी करताना एक गोष्ट लक्षात घ्या, खरेदी करताना त्या लिंबावर कोणत्याही प्रकारचे डाग असता कामा नयेत. ते लिंबू पिवळ्या रंगाचे असावे. हिरव्या रंगाचा लिंबू घेणं टाळावे.

लिंबू धुवून घेतल्यानंतर आपण एका स्वच्छ पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे. समोर एक स्वच्छ पाट ठेवायचा आहे. त्या पाटावर स्वच्छ अशा प्रकारचे लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे. त्या वस्त्रावर आपण हे लिंबू ठेवणार आहोत.

मित्रांनो लिंबू ठेवण्यापूर्वी आपल्या उजव्या हातात लिंबू घ्या. आणि तीन वेळा प्रार्थना करा की दिव्य ऊर्जा बनून आपण आमच्या घरी धन खेचून आणावं. अशा प्रकारची प्रार्थना आपण तीन वेळा करावी. आणि त्यानंतर त्या लाल रंगाच्या कपड्यावर हा लिंबू आपल्याला ठेवायचा आहे.

कपड्यावर लिंबू ठेवल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटाने या लिंबास आपण हळद लावणार आहोत. हळदी मध्ये थोडं पाणी मिक्स करावे आणि ही हळद आपण बोटाने त्या लिंबास लावणार आहोत. हळदीचे एक बोट लावावं. त्यानंतर कुंकू लावावं.

मित्रांनो करंगळी जवळ असलेलं जे बोट आहे याला पृथ्वीतत्व बोट असं म्हणतात. पृथ्वीतत्व जे असतं हे सुद्धा धन खेचून आणण्याचे काम करतं. आणि म्हणून याच बोटाचा आपण वापर करणार आहोत.

अशा प्रकारे हळदी कुंकू लावल्यानंतर हे लिंबू आपण उजव्या हातात घ्यावं. आणि ते घेऊन आपण त्याला सूर्यप्रकाशात घेऊन जावं. सूर्यप्रकाशात घेऊन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी उन्हा एकदा 3 वेळा प्रार्थना करणार आहोत की आपण दिव्य ऊर्जा बनून मोठ्या प्रमाणात धन आमच्या घरी खेचून आणावं.

सूर्यप्रकाशात प्रार्थना करून झाल्यानंतर आपण आपल्या घरात परत यायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आपले पैसे, सोने, नाणे ठेवता त्या ठिकाणी हा लिंबू स्थापित करायचा आहे. एखादं स्वच्छ कापड अंथरूण त्यावर लिंबू स्थापन करावा. तुम्ही हे लिंबू तुमच्या गल्ल्यात, तिजोरी मध्ये सुद्धा ठेऊ शकता.

तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी हात पाय स्वच्छ धुवून त्याला प्रार्थना करावी की आमच्या घरी धन खेचून आणा. तीन वेळा ही प्रार्थना करावी. तुम्हाला या उपायाने फरक थोड्याच दिवसात दिसून येईल. घरी पैसा येईल, धन धान्य यांची कमतरता जाणवणार नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *