नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या घरात पैसा टिकत नाही, पैशाची बरकत होत नाही, आलेला पैसा नेहमी खर्च होतो किंवा पैसा इकडे तिकडे जात असतो. यासाठी काही सोपे उपाय दिलेले आहेत तेच सोपे उपाय तुम्हाला आम्ही आजच्या या माहितीमध्ये सांगणार आहोत.
ज्या तुमच्या पैशाच्या संबंधित समस्या असतील हे उपाय करून नक्कीच दूर होतील. तुम्ही हे उपाय आजपासूनच करायला सुरु करा. लक्ष्मी माता या उपायांनी प्रसन्न होईल. मित्रांनो घरात प्रसन्नता सुख समृद्धी शांतता समाधान आणि लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी आपले घर नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे.
कचरा, जाळे किंवा भंगार आपल्या घरात कधीच ठेवू नये. सकाळी घरासमोर सडा टाकावा, रांगोळी काढावी, तुळशीची पूजा करावी, औदुंबरची पूजा करावी, देवघरात पूजा करावी, घंटा
वाजवावा यांने सकारात्मकता घरात निर्माण होते. मित्रांनो तुळशीजवळ उत्तर दिशेला दिवा लावावा.
गॅसजवळ स्वयंपाक होताच पुसून स्वच्छ करावा. प्रत्येक रूम झाडून पुसून स्वच्छ ठेवावा. घरातील वस्तूंवर रोज कपड्याने धुऊन पुसून घ्यावी. जेवणानंतर तेथील जागा त्वरित पुसावी आणि जेवलेली भांडी लगेच धुवावी. मित्रांनो धुणे वेळेवर धुवून त्वरित वाळत घालावे. थोडे जास्त वेळ पडले तर ते द्वाड असते.
घरात कोणी उपाशी राहता कामा नये. प्रत्येक व्यक्तीला जेवण बनवून वाढून घ्यावे. किचनवरील भांडे, रॅकवरील भांडे आणि महिन्यातून एकदा स्वच्छ करावे. रॅकचा कागद बदलावा. गादी, उशी, लहान बाळांची चादर उन्हात वाळत घालावी.
प्रत्येक महिन्यातून फॅन, कुलर स्वच्छ करावे. दरवाजे, खिडक्या जाळ्या पुसून घ्यावेत. उदाहरणार्थ घर स्वच्छ ठेवावे जुनी म्हण आहे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. म्हणून घरातल्या सगळ्या लोकांनी घरात स्वच्छता ठेवावी. जर आपल्या घरात थोडी घाण असली तर तिथे नकारात्मकता निर्माण होते.
याच गोष्टीमुळे आपल्या घरात पैसा टिकत नाही आणि मित्रांनो एक गोष्ट तर स्पष्ट आहेत जर घरात अस्वच्छता असेल तर आपल्या आरोग्य सुद्धा यांने ठीक राहणार नाही. म्हणून नेहमी स्वच्छता ठेवा. याने लक्ष्मी प्रसन्न राहील आणि पैसापण टिकून राहिल आणि त्याचबरोबर तुमचे आरोग्य सुध्दा चांगले राहील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.