नमस्कार मित्रांनो,
सकाळी साडेसहा ते साडे सात या वेळेत प्रत्येक वास्तूत माता लक्ष्मी चे आगमन होते. लक्ष्मी प्रत्येक घरात येते. ज्या वास्तू मध्ये वातावरण प्रसन्न असते. त्या घरात लक्ष्मी वास करते. घराची चौमुखी प्रगती होते. अशा वेळी घराची दार उघडी असायला हवी.
आपल्या मुख्य प्रवेश दारावर गणपती असतो किंवा जी तुळस असते. त्यांची पूजा करावी. धूप लावावे दिवा लावावा. ऑफिस किंवा दुकान असेल तर त्याठिकाणी पूजा करून आरती करून नैवेद्य ठेवावा. जो काही प्रसाद पेठे, साखर, खडी साखर ठेवावा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना तो जरूर द्यावा.
या काही गोष्टी माता लक्ष्मी स प्रसन्न करणाऱ्या असतात. या एका तासात आपण चुकूनही काही खाऊ नये. कारण देव पूजा होण्यापूर्वी आपण कोणत्याही गोष्टी ग्रहण करायच्या नसतात. या एका तासात पैशांची देव घेव चुकूनही करू नये. सकाळी आणि संध्याकाळी सुध्दा. मीठ आणि तेल या वस्तू देऊ नये.
शक्यतो कमी बोलावे. वाद विवाद टाळावे. कोणाशीही भांडण होणार नाही याची काळजी घ्यावी. या काळात आपण भांडत असू तर माता लक्ष्मी कधीच येत नाही. या काळात नखे काढू नये. केस स्वच्छ करू नये. कपडे धुवू नये. भांडी घासू नये. या काळात जामीन राहू नये. राहिल्यास आर्थिक संकट येईल.
महत्वाची बोलणी टाळावी. केस कपू नयेत पैसे देत असताना बोटाची कैची करू नये. पैशात मोठा तोटा होऊ शकतो. या काळात आपण ज्या देवांना मानतो त्यांचा किंवा नामस्मरण करावे. देव पूजा झाल्यावर कपाळावर गंध लावावा. बाहेर पडताना देव पूजा झाल्यावर त्यातील एक फुल आपल्या जवळ ठेवावे. आणि नंतर बाहेर जावे.
असे नित्य केल्यास लक्ष्मीचा अखंड वास राहील. साडे सहा ते साडे सात या वेळेत जी व्यक्ती झोपते ती व्यक्ती सात जन्म रोगी बनते. सोबत दरिद्री जीवन जगतो.कोणाच्याही घरातून बाहेर पडताना जातो म्हणू नये येतो म्हणावे. जातो अस म्हटल्याने काळाचा आघात होऊ शकतो.
कोणत्याही आपल्या किंवा दुसऱ्याच्या उंबरठ्यावर शिंकु नये. सूर्यास्त झाल्यावर शीळ म्हणजे शिटी घालू नये. दातांनी नखे कुर्तडू नये ही सवय लक्ष्मी ला बाहेर काढते. असा माणूस नेहमी दरिद्री राहतो त्याच्या मागे रोग लागतात. म्हणून दातांनी नखे कूर्तडू नये. स्वयंपाक च तेल म्हणजे गोड तेल खरेदी शनिवारी करणं टाळावं.
शनी देवा ना वाहण्यासाठी हे तेल खरेदी करू शकतो आणि वाहू शकतो. शनिवारी दाढी हजामत करू नये. सोमवारी लोणी कढवण टाळावं. गणपती बाप्पा ना तुळस वाहू नये. गणेश चतुर्थी ला तुळस वाहू शकतो.
<
देव घरातील देवांना नेहमी करांगळीच्या बाजूच्या बोटाने गंध लावावा. मीठ हातावर घेऊ नये. पदराने विस्तावला वारा घालू नये. नवीन कपडे घालून कधीही झोपू नये. प्रेत यात्रा पाहिल्यास आवर्जून नमस्कार करावा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.